* शैलेंद्र सिंह

फेस्टिव्हल आता पूर्णपणे मॉडर्न स्टाईलमध्ये बदलला आहे. जे लोक वर्षभर आपल्या कपड्यांबरोबर काही प्रयोग करू इच्छित नाही, ते लोकसुद्धा सणांच्या काळात वेगळ्या रंगात ढंगात दिसू इच्छितात. असू पण का नये, यावेळी सणांत रेड, मजेंटा, ऑरेंज, रॉयल ब्ल्यूसारखे रंग, शीमर एलीमेंटबरोबर पसंद केले जात आहेत.

‘कारनेशंस’ नावाने लखनौमध्ये आपला डिझायनर ब्रॅन्ड चालवणारी शिखा सुरी सांगते, ‘‘फेस्टीव्हल ड्रेसमध्ये प्रत्येक जण असं काहीतरी नवीन करू इच्छितो की जे प्रत्येकाला गर्दीत वेगळं दिसायला मदत करेल. ड्रेसमध्ये ट्रेडिशनल लुकबरोबर मॉडर्न स्टाइलची फॅशन लोकांची आवड बदलत आहे. केवळ स्त्रियाच नाही तर पुरूषही पूर्णपणे आपल्या ड्रेसमध्ये बदल करू इच्छितात. भारतीय ड्रेसवर इंडोवेस्टर्न ड्रेस प्रभावी ठरत आहे.’’

बनारसी ओढणी, मिरर वर्क, फुलकारी वर्कची एम्ब्रॉयडरी इत्यादीला खूप पसंती मिळत आहे. स्कर्ट आणि कुर्ते फेस्टीव्हल सीझनमध्ये खूप फॉर्ममध्ये आहेत.

ममता ब्युटीकची ममता सिंह सांगते, ‘‘फेस्टिव्हल सीझनमध्ये लहेंगा आणि टॉपच्या फॅशनला पसंती मिळत आहे. हा एक प्रकारचा एवरग्रीन ड्रेस आहे. त्यात कलर, फॅब्रिक, डिझाइन, विणकाम आणि स्टाइल वापरून विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत.’’

इंडोवेस्टर्नमध्ये नवीन प्रयोग

धोती भारतीय पोशाखात सगळ्यात जास्त पसंतीस पडणारा पोशाख आहे. भारतात धोती महिलांच्या ड्रेसचा भाग कोणत्या ना कोणत्या रूपात राहिली आहे. याचं रूप जागेनुरूप बदलत गेलं आहे. हेच कारण आहे की धोती आणि साडी वेगवेगळ्या रूपात नेसले जातात. एक प्रकारे बघितलं तर हा केवळ फेस्टीव्हलमध्येच नाही, तर धोती आपल्या संस्कृतीचा प्रमुख पेहराव राहिला आहे. इंडोवेस्टर्न ड्रेसमध्ये धोती एका वेगळ्या परिवेशात सादर केली जात आहे.

शिखा सुरी सांगते, ‘‘धोती ड्रएपमध्ये लांबट टॉपसोबत लेगिंग्स घातली जाते. साडीची ओढणी बरोबर घेतली जाते. ओढणी साडीची असल्याकारणाने साडी वेगळ्या पद्धतीने ड्रेप केल्याचे दिसते.

वेलस्लीवची फॅशन या वर्षी पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त एथनिक लुकच्या स्कर्टबरोबर क्रॉप टॉप वापरले जात आहेत. हे फेस्टिव्हलमध्ये एक वेगळा लुक देतात. लाँग केप एकप्रकारे फ्रंट ओपन जॅकेटसारखं असतं. ३ पीसमध्ये तयार होणारा हा ड्रेस पेंट, स्कर्ट, जंपसूटसारख्या कोणत्याही कॉम्बिनेशनबरोबर वापरला जाऊ शकतो. सलवारसोबतही नवीन प्रयोग होत आहेत, ज्यात धोती स्टाईलचा सलवार बनतो. या पटियाला असतात. स्टाइलबरोबर घेर अधिक असतात. याबरोबर शॉर्ट कुर्ता बिना दुपट्ट्याचा वापरला जातो.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...