* गरिमा पंकज

क्रॉप टॉप म्हणजे हाफ शर्ट, बॅली शर्ट वा कट ऑफ शर्ट. हा एक असा टॉप आहे जो कंबर आणि पोटाच्या आकर्षणाला सर्वांसमोर आणतो. तुम्ही असं म्हणू शकता की क्रॉप टॉप शरीराच्या मध्य भागावर लक्ष आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. ज्या मुलींना आपला हा भाग हायलाईट करायचा असतो त्या बिनधास्त क्रॉप टॉप वापरू शकतात. १९८० च्या दशकापासून क्रॉप टॉप फॅशनच्या जगतात स्टाईलचं प्रतिक राहिलंय. गायिका मॅडोनाने तिच्या ‘लकी स्टार’ गाण्यात जाळीचा क्रॉप टॉप घातला होता.

वापरायला सुरुवात

हे वापरण्याची सुरुवात अशा महिलांनी केली होती ज्या बिनधास्त होत्या आणि त्यांना स्वत:चं स्वातंत्र्य दाखवायचं होतं. १९७० आणि ८० च्या दशकात पॉप कल्चरच्यावेळी क्रॉप टॉपची फॅशन होती. सुरुवातीच्या काळात पुरुष पोटाचे सिक्स पॅक दाखविण्यासाठी याचा वापर जिममध्ये करत असत. जिममध्ये काही मुलं शर्ट न वापरता वर्क आउट करत असत. त्यांना असं करण्यापासून रोखण्यासाठी शर्टचा खालचा भाग कापून थोडा छोटा केला जायचा. ज्याने नंतर फॅशनचं रूप घेतलं आणि महिलांनी याचा व्यापकरित्या वापर केला.

हिंदी सिने जगतातदेखील क्रॉप टॉपची फॅशन जुनी आहे. १९७३ साली रिलीज झालेल्या ‘बॉबी’ सिनेमात डिम्पल कपाडियानेदेखील काळापांढरा नॉट वाला क्रॉप टॉप घातला होता, जो त्यावेळी लोकांना खूपच आवडला होता. फॅशन पुन्हा काही बदलासोबत परत येत असते. असंच काहीसं क्रॉप टॉपसोबत झालं आहे. आज हा तरुणी आणि महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ड्रेस आहे.

किती प्रकारचे असतात क्रॉप टॉप

रुपये २०० ते रुपये ८००च्या प्राईज रेंजमधील क्रॉप टॉप्स तुम्हाला सगळीकडे मिळू शकतात. तुमच्या शहरातील एका छोट्याशा दुकानापासून जगातील सर्वात मोठया फॅशन ब्रँडपर्यंत. हे विविध डिझाईन्सचे मिळतात. उदाहरणार्थ, स्लीवलेस क्रॉप टॉप, लॉन्ग स्लीव क्रॉप टॉप, बॅकलेस क्रॉप टॉप, बॅगी क्रॉप टॉप, ऑफ शोल्डर क्रॉप टॉप, विंटर क्रॉप टॉप व टर्टल क्रॉप टॉप इत्यादी. याव्यतिरिक्त हाफ क्रॉप टॉप ज्यामध्ये कंबरेचा बराचसा भाग दिसून येतो तर त्रिकोणी ट्रायन्गल क्रॉप टॉपमध्ये खालचा शेप त्रिकोणी असतो. काव्ल नेक क्रॉप टॉपच्या गळ्याच्या चारी बाजूंनी कपडा असतो. डीप नेक क्रॉप टॉप म्हणजेच खोलगट गळ्याचे क्रॉप टॉप आणि डेनिमने बनलेले क्रॉप टॉप देखील असतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...