* सोमा घोष

मृदू स्वभाव आणि सुंदर बांधा असलेली २३ वर्षीय विजया बाबर ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे. तिने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. मुंबईतील विजयाने अभिनयासोबतच म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. ती एक अतिशय आकर्षक तरुणी आहे आणि तिने ‘मिस मुंबई’ चा किताबही जिंकला आहे. ‘शिकस्त ए इश्क’ हे तिचे मराठी नाटक होते, ज्यात तिने खूप सुंदर अभिनय केला होता. त्यानंतर तिने ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत चंदाची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली, पण कोविड काळातील लॉकडाऊनमुळे मालिका बंद झाली.   विजयाच्या यशात तिच्या भावा-बहिणींचा मोठा वाटा आहे, दोघेही इंजिनीअर आहेत, पण सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते नेहमीच एकत्र असतात. विजयाच्या आईचे नाव नीलम बाबर तर वडिलांचे नाव आनंदा बाबर आहे. सध्या विजया सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मध्ये बयोची मुख्य भूमिका साकारत आहे. तिने खास ‘गृहशोभिका’सोबत गप्पा मारल्या. त्यातीलच हा काही मनोरंजक भाग...

ही भूमिका करण्यामागचे काही विशेष कारण आहे का?

यात मी बयोची भूमिका साकारत आहे, जी मूळची कोकणातील एका छोटया गावातली आहे. गावात रुग्णालय नसल्याने तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या आईचे स्वप्न आहे की, तिच्या मुलीने डॉक्टर व्हावे. मी मोठया बयोची भूमिका साकारत आहे. बयो एकटीच मुंबईत येते आणि वैद्यकीय महाविद्यायात प्रवेश     घेते, इथे आल्यानंतर तिला सावत्र आई-वडील भेटतात, जे आजारी आहेत आणि         त्यांच्या उपचाराची जबाबदारी तिने स्वीकारली आहे.

ही भूमिका तुझ्या वास्तव जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

ही भूमिका माझ्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी लहानपणापासून अभिनयाचे स्वप्न पाहिले आहे. आज त्याच स्वप्नाच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला आहे. शाळेत असल्यापासूनच मला अभिनय करण्याची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यायात असल्यापासूनच मी रंगभूमीवर काम करू लागले. मी प्रायोगिक, मोनो अभिनय, स्किड्स इत्यादी सर्व प्रकारचा अभिनय केला आहे. प्रायोगिक नाटकातूनच मला अभिनयाची पहिली संधी मिळाली. मी स्वामी समर्थचे ७५० भाग पूर्ण केले. त्यानंतर मला ही मालिका मिळाली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...