‘माझी मैना’ गाण्यात झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल

* सोमा घोष

“हो तिची दुनिया ही न्यारी तिची स्टाईल पुराणी जशी आहे मनाची राणी… कधी राऊंड राऊंड फिरे साऊंड लाऊड लाऊड करे ति गाते मर्जिची गानी…आली लाली गाली माझी मैना आहे निराली…” या दोन-तीन ओळीत मैना कशी आहे हे प्रत्येकाला समजलंय, पण या मैनाला पाहण्यासाठी गेले कित्येक दिवस प्रेक्षक आतुर होते. अखेर, ती मनाची राणी, जी गाते मर्जिची गाणी अशी निराली मैना प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली आहे एका नव्या गाण्याच्या माध्यमातून ज्याचे नाव आहे ‘माझी मैना’.

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुरेश गाडेकर निर्मित आणि संदेश गाडेकर सहनिर्मित ‘माझी मैना’ हे मराठी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मैना आहे अभिनेत्री मोनालिसा बागल आणि जो मैनेचं प्रेमाने आणि मनापासून कौतुक करतोय तो आहे AJ (Oye Its Prank).  या गाण्याच्या निमित्ताने मोनालिसा आणि AJ ही नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. मोनालिसाने आतापर्यंत वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत, या गाण्याच्या निमित्ताने पण ती सोज्वळ, गोड अशा भूमिकेत दिसणार आहे. त्यापेक्षा असं म्हणा की, ती ख-या आयुष्यात जशी आहे तशीच या गाण्यात दिसणार आहे.

‘माझी मैना’ गाण्याचे दिग्दर्शन शुभम गोणेकर याने केले असून संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल दाते आणि नितिन कुटे यांनी पेलली आहे.

“दिलफेल सारे मागे माझ्या माझ्या दिलाचा तु रं राजा…. ति सोळा वर्षाची कोवळ्या स्पर्शाची चांदन माखून आली” गाण्याच्या या सुंदर ओळी आणि अर्थात संपूर्ण गाणं ऐकायला फार सुरेख वाटतं त्याचे कारण म्हणजे या गाण्याला लाभलेला आवाज. गायिका योगिता गोडबोले आणि गायक नितिन कुटे यांनी हे डुएट गाणं गायलं आहे. या गाण्यात शब्दांची सुंदर रचना, कानाला ऐकावेसे वाटतील असे गोड शब्द प्रशांत तिडके आणि नितिन कुटे यांनी मिळून लिहिले आहेत. नागेश नितरुडकर आणि राहुल धांडेकर हे या गाण्याचे डीओपी आहेत तर विनित गाडेकर आणि विराज गाडेकर यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

निराळ्या अशा मैनेच्या प्रेमात पडण्यासाठी आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी नक्की ऐका ‘माझी मैना’ साईरत्न एंटरटेनमेंट या युट्युब चॅनेलवर.

मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे या नव्या जोडीमुळे ‘जीव झाला बाजिंद’

* सोमा घोष

टेलिव्हिजनवर आणि सिनेमांत झळकणारी सुंदर, निरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे म्युझिकल भेट ज्यामुळे सर्वजण म्हणणार ‘जीव झाला बाजिंद’…

आतापर्यंत मोनालिसाने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे तिच्या अभिनयातला वेगळेपणा जाणवला आणि तिची मेहनत प्रेक्षकांना दिसली आणि म्हणूनच प्रेक्षक तिच्यावर जीव लावतात. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेल्या ‘जीव झाला बाजिंद’ या गोड आणि नव्या गाण्यात मोनालिसा बागल दिसणार आहे. गावाकडची प्रेम कथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसा सोबत अभिनेते विठ्ठल काळे झळकणार आहेत. हे गाणं एक वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल पण या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे. ८ ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हे गाणं प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे.

एकूणच गावाकडचे वातावरण, दोन कलाकारांमधील केमिस्ट्री, गाणं, आवाज-संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार आहे हे नक्की… नक्की पाहा ‘जीव झाला बाजिंद’ हे गाणं ‘मराठी Originals’ या यूट्यूब चॅनेलवर…

माझ्या आईचा शॉटकट कामास कायमच विरोध होता – मोनालिसा बागल

* सोमा घोष

लहानपणापासूनच क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करायचं स्वप्न पाहणारी मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल ‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रसिद्ध झाली. लहान वयातच तिचे वडील आणि आता वर्षभरापूर्वीच तिची आई मीनाक्षी राजेश बागल यांचं निधन झालं. मोनालिसा आता तिची मोठी बहीण अश्विनी बागलसोबत मुंबईत राहते, तिची बहीणदेखील मराठी चित्रपटात अभिनय करते. अभिनयाव्यतिरिक्त मोनालीसाची एक सिनेवितरक कंपनीदेखील आहे, हा सर्व  डोलारा ती स्वत: सांभाळते. तिच्याशी तिच्या एकूण प्रवासाबद्दल बोलणं झालं. सादर आहेत याचे खास अंश :

अभिनयाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती या क्षेत्रात नाहीए. मात्र, माझ्या आईला अगदी लहानपणापासून अभिनयाची आवड होती, मात्र कुटुंबियांच्या दबावामुळे तिला काम करता आलं नाही. तिची ही आवडच मला या क्षेत्रात घेऊन आली आणि आज मी जी काही आहे ती तिच्यामुळेच होऊ शकले.

कुटुंबीयांचं किती सहकार्य मिळालं?

माझा पहिला चित्रपट आल्यानंतरदेखील मी या क्षेत्रात येण्याबद्दल काही ठरवलं नव्हतं. मी माझं शिक्षण लोणावळामध्ये पूर्ण केलं आणि मी अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे मला चार्टड अकाउंटंट व्हायचं होतं. बारावीला असताना एके दिवशी मला चैतन्य देशमुख भेटले आणि त्यांनी माझा फोन नंबर घेऊन ठेवला. काही दिवसानंतर त्यांनी मला मराठी चित्रपटात अभिनयाची ऑफर दिली. मी अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना ऑडिशन दिली. त्यात  मला सई ताम्हणकरच्या लहानपणीची भूमिका करायची होती. त्यावेळी मी १७ वर्षाची होती. माझी निवड झाली आणि माझ्या कामाचं कौतुकदेखील झालं. त्यानंतर मी अनेक चित्रपट केले, परंतु चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत.

अभिनयाचा प्रवास पुढे कसा सुरू झाला?

यादरम्यान अनेक मोठया चित्रपटातून मला नकार मिळाला. कारण म्हणजे माझी गावाकडची भाषा आणि माझी शारीरिक सुदृढता. यामुळे मला खूपच नैराश्य आलं होतं. असं वाटू लागलं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाहीच आहे. परंतु माझी आई आणि मोठया बहिणीने मला समजावलं आणि अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मी पुन्हा अभ्यासात मन रमवलं. मात्र काही दिवसातच मला दिग्दर्शक प्रदीप जगदाळेंचा फोन आला. एक टिनएजर मुलीची भूमिका होती. मी ऑडिशन दिली आणि निवड झाली. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी सगळयांच्या नजरेत आली. हळूहळू मी पुढे जात राहिले.

पहिला ब्रेक केव्हा मिळाला?

मराठी चित्रपट ‘झाला बोभाटा’साठी मला पहिला ब्रेक मिळाला. यानंतर तर माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. अलीकडेच मी एक वेब सिरीज आणि चित्रपट केलाय, जो प्रदर्शनासाठी तयार आहे. करंट चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरु आहे.

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनय करण्याची इच्छा आहे का?

हिंदी चित्रपटासाठी मी स्वत:ला तयार करतेय. एखादी चांगली कथा मिळाली तर मी नक्कीच काम करेन. हिंदीमध्ये धर्मा प्रोडक्शन आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आहे.

कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतील?

सध्या माझ्याकडे अनेक चांगल्या स्क्रिप्ट येत आहेत आणि मला निवडक काम करायचं आहे, कारण लोकांनी मला लक्षात ठेवायला हवंय. याव्यतिरिक्त मला चांगल्या लोकांसोबत काम करायचंय, यामुळे बरंचसं शिकायची संधी मिळते.

अभिनयात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे?

अभिनयाच्या जगतात धैर्य आणि संयम यांची खूप गरज आहे. कोणतीही व्यक्ती सर्वगुण संपन्न नसते, परंतु जी प्रतिभा तुमच्यामध्ये आहे, ती जाणून घेऊन पुढे गेल्यास कधीच मागे पडणार नाही.

नेपोटीज्मचा कधी सामना करावा लागला का?

मला नाही अनुभव आला असा कधी. परंतु मी अनेकदा ऐकलंय की चित्रपट निर्माते त्यांच्या मुलांना अभिनय येत नसतानादेखील प्रमुख भूमिका देतात आणि चांगल्या कलाकाराला दुय्यम भूमिका करावी लागते. अशावेळी कलाकाराने तो या भूमिकेसाठी तयार आहे की नाही याचा स्वत: निर्णय घ्यायला हवा.

कोरोनाकाळात चित्रीकरण करणं किती कठीण आहे?

कोरोनाकाळात चित्रीकरण करणं खूपच कठीण होऊन राहिलंय. सर्व नियम आणि टेस्ट नंतरच काम करावं लागतंय. मलादेखील सर्वांना सांगायचंय की तुम्ही सर्वांनी मास्क घाला आणि गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी.

इंटिमेट सीन करताना तू किती सहज असतेस?

अजिबात सहज नसते, मी दोन चित्रपटात अधिक इंटिमेट सीन होते म्हणून सोडले आहेत. एका चित्रपटात मात्र मी इंटिमेट सीन मोठया मुष्किलीने दिला होता कारण मी त्यातील अभिनेत्याला ओळखत होती. आपण सहज नसू तर ते मोठया पडद्यावर दिसून येतं.

तू किती फॅशनबल आणि फुडी आहेस?

सुरुवातीला मी फक्त सलवार सूट घालायची, परंतु हळूहळू मला बदलावं लागलं. आता मी प्रसंगानुरुप पेहराव करते.

मी खूपच खाण्याची खूपच शौकीन आहे, परंतु महाराष्ट्रीयन पदार्थ अधिक आवडतात.

तुझ्या स्वप्नातील राजकुमार कसा असायला हवा?

मला आईवडिल नाहीएत आणि जबाबदाऱ्यादेखील अधिक आहेत. कोणावर फारसा विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे माझं काम माझ्यासाठी सर्वकाही आहे.

उन्हाळयात तुझ्या त्वचेची निगा कशी राखतेस?

मी दररोज फेसवॉश वापरते. याव्यतिरिक्त त्वचा निरोगी असावी यासाठी घरी असल्यावरदेखील सनस्क्रीन लोशन लावते. खाण्यात द्रवपदार्थांचा अधिक समावेश करते, यामध्ये टरबूज खास आहे. व्हिटॅमिन सीदेखील घेते.

चाहत्यांना काय सांगशील?

माझी आई कायम सांगायची की आपल्याला एकच आयुष्य मिळतं, त्यामुळे जे काही ठरवलंय ते कर, परंतु कोणतंही काम शॉर्टकटने करू नकोस. हेच मला सगळया तरुणाईला सांगावंसं वाटतंय.

आवडता रंग – काळा आणि लाल.

आवडता पेहराव – सिल्क आणि कांजीवरम साडी.

आवडतं पुस्तक – छावा

(कादंबरी) लेखक – शिवाजी सावंत.

फावला वेळ मिळतो तेव्हा – गाणं, नृत्य आणि प्रवास.

आवडता परफ्यूम – धाराचे सर्व परफ्यूम्स.

नवीन सिनेमाच्या निमित्ताने मोनालिसा बागलने केले वजन कमी

*सोमा घोष

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. घरी बसल्या आपल्याला आवडेल त्या गोष्टी करून आपलं मन गुंतवून ठेवू शकतो. अनेक ठिकाणी कामांना पुन्हा ब्रेकलागला आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेकांना घरून काम करावे लागतेय त्यामुळे जग थांबलंय ही भावना पुन्हा एकदा बऱ्याच जणांच्या मनात सतत येतेय हे सोशल मीडियावरून लक्षात येते. यासाठी एकच उपाय म्हणजे संयम सर्व काही सुरळीतपणे पुन्हा सुरू होईल असा विश्वास बाळगा, असं अभिनेत्री मोनालिसा बागल सांगतेय.

सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते, नवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती आणि असं असताना सिनेसृष्टीला देखील ब्रेक लागला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागलने पुरेपूर वापर केला, स्वतःला वेळ दिला आरोग्याची काळजी घेतली. नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होते, त्यावेळी तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले. एका सिनेमासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला… पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देत, योग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिच्या फोटोंवरून, इंस्टाग्राम रिल्सवरून तिचा Fit & Fine लूक तिच्या चाहत्यांच्या लक्षात आला होता. वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो मोनालिसाने शेअर केले होते. अर्थात, तिचे नवीन फोटोज् आणि तिच्या या नवीन लूक साठी त्यांनी तिच कौतुक केले.

पाहा मोनालिसाचे नवीन फोटो:-https://www.instagram.com/p/COHaeLpr2VB/?igshid=1hwedki3jodcc

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें