घर जंतूमुक्त करण्याचे ११ उपाय

* गरिमा पंकज

कौटुंबिक आरोग्य आणि आनंदाचा मार्ग स्वयंपाकघरातून जातो. एका संशोधनानुसार घरात सर्वाधिक बॅक्टेरिया असलेली जागा म्हणजे स्वयंपाकघर. किचन टॉवेल्स, डस्टबिन, स्टोव्ह एवढेच नव्हे तर सिंकमध्येही जीवाणू वाढू शकतात. जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर घर रोगांचे मुख्य केंद्र बनेल.

चला स्वयंपाकघर जंतूमुक्त आणि चमकदार कसे ठेवता येईल ते जाणून घेऊया.

टाईल्स साफ करणे

स्वयंपाक करताना गॅस स्टोव्हभोवती आणि मागच्या बाजूला असलेल्या टाईल्सवर घाण जमा होते. जर या टाईल्स दररोज स्वच्छ केल्या नाहीत तर नंतर त्या साफ करणे थोडे अवघड होते. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब हलक्या ओल्या कपडयाने आजुबाजूच्या टाईल्स पुसायला विसरू नका.

बेकिंग सोडा आठवडयातून दोनदा साफसफाईसाठी वापरू शकता. सुमारे अर्धी बादली पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा. आता हे स्पंजवर घेऊन किचन टाईल्स स्वच्छ करा आणि नंतर कोरडया कापडाने पुसून काढा. बेकिंग सोडा स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी होममेड क्लीनर म्हणून कामी येतो.

टाईल्स साफ करण्यासाठी व्हिनेगरचा वापरदेखील करू शकता. दोन कप व्हिनेगर आणि दोन कप पाण्याचे द्रावण बनवून तो स्प्रे बाटलीमध्ये भरा. नंतर टाईल्सवर स्प्रेने फवारणी करा आणि मऊ कापडाच्या मदतीने पुसून काढा.

सिंकची स्वच्छता

सर्वाधिक जीवाणू स्वयंपाकघरातील सिंकमध्ये आढळतात. म्हणून रोज ते स्वच्छ करा. स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम त्यात ठेवलेली भांडी बाहेर काढा किंवा धुवून त्यांना योग्य ठिकाणी ठेवा. मग सिंकमधील कचरा स्वच्छ करा. जर सिंकच्या ड्रेन स्टॉपरमध्ये कचरा अडकला असेल तर तोदेखील स्वच्छ करा. नंतर साबण आणि कपडयाच्या मदतीने कोमट पाण्याने सिंक स्वच्छ करा. गरम पाणी सिंकमध्ये असलेले जीवाणू नष्ट करेल.

स्वयंपाकघरातील सिंक घरगुती पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा लिंबाच्या रसाबरोबर अर्धा कप पांढरा व्हिनेगर मिसळा आणि हे मिश्रण सिंकभोवती पसरवा. असे केल्यावर दहा मिनिटांनंतर टूथब्रशने सिंक स्क्रब करा आणि मग गरम पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. पाण्याने साफ केल्यानंतर कोरडया कापडाने सिंक पुसून टाका.

हे देखील लक्षात ठेवावे की सिंकमध्ये नेहमीच भांडी पडून राहू देऊ नका. प्लेट्स, ग्लासेस, वाटया आणि इतर सर्व भांडी वापरल्यानंतर लगेचच स्वच्छ केली पाहिजेत आणि त्यांच्या जागेवर ठेवली पाहिजेत. घाणेरडी भांडी पडून राहिल्यावर त्यांच्यावर जीवाणू वाढू लागतात. भांडी साफ केल्यावर पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल अवश्य ठेवा.

भिंतीची स्वच्छता करणे

स्वयंपाकघराच्या भिंतीवर दोन प्रकारचे डाग असतात. एक तेल-हळदीचे आणि दुसरे वाफेचे व पाण्याच्या शिंतोडयांचे. स्वयंपाकघरातील भिंत स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबणात थोडेसे पाणी घाला. आता या द्रावणात एक कपडा बुडवून तो भिंतीवर फिरवा. सर्व प्रकारचे डाग त्वरित निघून जातील.

फरशी स्वच्छ करण्याची पद्धत

सामान्य फरशी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि कपडयाच्या सहाय्याने फरशी स्वच्छ करा. परंतू जर आपल्या स्वयंपाकघरातील फरशी लाकडाची असेल तर यासाठी आपण एक बादली पाण्यात पांढरा व्हिनेगर मिसळा आणि नंतर त्याने कपडा ओला करून फरशीला चांगल्या प्रकारे रगडून स्वच्छ करा.

डस्टबिन जंतूमुक्त असे करावे

स्वयंपाकघरातील डस्टबिन स्वच्छ करण्यासाठी अर्धा कप पाण्यात व्हिनेगर घाला. व्हिनेगर घातल्यानंतर यासह डस्टबिन स्वच्छ करा. जंतुनाशक मल्टीयूज हायजीन लिक्विड क्लीनरसह डस्टबिनमध्ये लावा आणि त्यामध्ये वापरण्यात येणारी पिशवी दररोज बदला.

मायक्रोवेव्ह साफ करण्याचे उपाय

कधीकधी मायक्रोवेव्ह दुर्गंधीयुक्त होतो. पदार्थ बनवल्याने किंवा गरम केल्यामुळे यातून दुर्गंधी येऊ लागते. लिंबू हा मायक्रोवेव्ह साफ करण्याचा एक सोपा व घरगुती उपाय आहे. रात्रभर मायक्रोवेव्हमध्ये लिंबू कापून ठेवा आणि दार उघडे सोडा. सकाळी मायक्रोवेव्हचा दरवाजा बंद करून याला बॉयलरवर चालवा. मायक्रोवेव्ह जंतूमुक्त ठेवण्यासाठी त्याचा बाह्य भाग जंतुनाशक वाइप्सने पुसून घ्या.

गॅस स्टोव्हची सफाई

गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी सर्वप्रथम त्यावर बेकिंग सोडा आणि गरम पाणी शिंपडा. तेलाचे डाग दूर करण्यासाठी तीस मिनिटांनंतर ते स्क्रब करा. यानंतर पिन किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने बर्नरच्या छिद्रांमधील घाण साफ करा. नंतर पाणी आणि डिटर्जंट किंवा बेकिंग सोडयाची पेस्ट बनवून बर्नर स्वच्छ करा.

दगडांचे स्लॅब स्वच्छ करण्याचे उपाय

आजही बऱ्याच घरांच्या स्वयंपाकघरात दगडी स्लॅब असतात. त्यांच्यावर कॉफी, चहा, ज्यूस इत्यादींचे डाग पडण्याबरोबरच स्क्रॅचेसही पडतात. स्लॅब स्वच्छ ठेवण्यासाठी थोडयाशा पाण्यात हायड्रोजन पेरॉक्सॉईड तसेच अमोनियाचे काही थेंब घाला. आता कपडयाच्या मदतीने हे द्रावण स्लॅबवर लावा, स्लॅब नवा दिसू लागेल.

झ्कॉस्ट फॅनची स्वच्छता

एझ्कॉस्ट फॅनच्या पातींमध्ये तेल गोठल्यामुळे ते कार्य करणे थांबवते. ते साफ करण्यासाठी थोडयाशा पाण्यात बेकिंग सोडा मिसळा. आता त्याच्या मदतीने याला स्वच्छ करा.

कपाट स्वच्छ करण्याची पद्धत

कपाट स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा थोडयाशा तेलात मिसळा. यानंतर स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने हे मिश्रण लाकडी कपाटाच्या ड्रॉव्हर, रॅक आणि दारावर पसरवा. नंतर कोरडया कपडयाने पुसून टाका. काही मिनिटांतच कपाट नवे दिसू  लागेल.

फ्रिज साफ करणे

ठराविक काळाने फ्रिजही साफ करणे आवश्यक आहे. ते साफ करण्यासाठी कापसाचे गोळे लिंबाच्या रसात बुडवा आणि काही तास फ्रीजमध्ये ठेवा. फ्रिजमधील डाग साफ करण्यासाठी लिंबाचा अर्धा भाग कापून घ्या. त्यावर थोडे मीठ लावून डागाळलेल्या जागेवर चोळा. अशाप्रकारे डाग तर दूर होतीलच शिवाय लिंबाच्या रसामुळे फ्रिजमधील दुर्गंधीदेखील दूर होईल.

आता फ्रिजच्या आतील कप्ये मऊ कापडाने पुसून घ्या आणि पडलेल्या कोणत्याही चिकट पदार्थाला घासून स्वच्छ करून घ्या. कालबाह्य झालेल्या वस्तू किंवा भाज्या फ्रिजमधून काढा. यांमुळे देखील जंतू सक्रिय होऊ लागतात.

शेल्फची स्वच्छता

आपण स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी वापरत असलेला शेल्फ काही दिवसांच्या अंतराने साफ करा. आपण यासाठी डिटर्जंट वापरू शकता. शेल्फच्या जागी भिंतीत स्टेनलेस स्टीलचा रॅकदेखील लावू शकता. तो केवळ सुंदरच दिसत नाही तर त्याला स्वच्छ करणेदेखील सोपे असते.

आता भांडी धुणार डिशवाशर

* शकुंतला सिन्हा

अलीकडे डिशवॉशर म्हणजेच भांडी धुणाऱ्या मशीनची मागणी वाढू लागलीय. तुमची मोलकरीण आली नसेल वा तुमच्याकडे नसेल तर दोन्ही परिस्थितीत ही खूपच कामाची वस्तू आहे.

किती प्रकारे

डिशवॉशर प्रामुख्याने २ प्रकारचे असतात -एक म्हणजे फ्री स्टँडिंग जे वेगळं लावू शकता आणि दुसरं बिल्ट इन जे किचनच्या ओट्याखाली कायमचं लावू शकता. बिल्ट इन डिशवॉशर लावून घेणं अधिक सुविधादायक आहे.

साधारणपणे डिशवॉशर १२ ते १६ प्लेस सेटिंगचे असतात. भारतात १२ प्लेस सेटिंग असणाऱ्या मशिन्स मिळतात. एक प्लेस सेटिंग म्हणजे १-१ मोठ जेवणाचं ताट व नाश्ता प्लेट, बाउल, ग्लास, चहा वा कॉफी कप व प्लेट, सुरी, काटे आणि २-२ चमचे आणि सलाड फोर्क लोड करू शकता. याव्यतिरिक्त काही रिकाम्या जागा असतात, ज्यामध्ये जेवणाची भांडीदेखील ठेवू शकता.

भारतीय बाजारात डिशवॉशर

भारतात सीमेन्स, व्हर्लपुल, एलजी आणि आयएफबी ब्रँडचे डिशवॉशर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत साधारणपणे २४ हजारापासून ४० हजारच्या मध्ये आहे. सध्या आयएफबी ब्रँडच मार्केट शेयर सर्वाधिक आहे आणि याच्या किमतीदेखील इतरांपेक्षा कमी आहेत. २०१७ साली डिशवॉशरचं मार्केट ३०० लाख डॉलरचं होतं म्हणजे २१० कोटीचं.

डिशवॉशर लावण्यापूर्वी

डिशवॉशरसाठी ४ गरजा – ठेवण्यासाठी योग्य जागा, विजेची सुविधा, पाण्याचा पुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था. साधारणपणे डिशवॉशर २४×२४चं असतं आणि याची उंची ३५ इंच असते आणि यामध्ये अडजस्टेबल लेग्स असतात.

अलीकडे मोड्युलर किचन केलं जातंय आणि यामध्ये बिल्ट इन डिशवॉशर सहजपणे लावता येऊ शकतं. ज्यांचं स्वत:चं घर आहे वा जे नवीन बनविणार आहेत त्यांच्यासाठी बिल्ट इन मॉडेल उत्तम आहे. तुमचं घर भाडयाचं असेल तर फ्री स्टँडिंग डिशवॉशर तुम्ही घेऊ शकता, ते लावण्यात वा घेऊन जाताना तोडफोड करण्याचीदेखील गरज लागत नाही. किचन जुनं असेल तर डिशवॉशर लावण्यासाठी थोडीफार तोडफोड करावी लागेल. ओटयाखाली पुरेशी जागा बनवून तिथपर्यंत पाण्याचा पुरवठा आणि ड्रेनेजची व्यवस्था करावी लागणार.

डिशवॉशरबाबत गैरसमज

डिशवॉशरबाबत लोकांमध्ये जागरूकता अधिक नाहीए. एक समज आहे की यामध्ये विजेचं बिल आणि पाणी अधिक खर्च होतं, खरंतर असं अजिबात नाहीए. सुरुवातीला खर्च थोडा अधिक येतो. सर्वसाधारण समज आहे की यासाठी खास किचन प्लॅन लागतो, परंतु अलीकडे जे अपार्टमेंटस बनत आहेत त्यामध्ये मॉड्युलर किचनच असतात आणि त्यामध्ये डिशवॉशर सहजपणे लावू शकता. यामध्ये डिशबरोबरच वेगवेगळी जेवणाची भांडीदेखील धुतली जातात.

सेटिंग्स : तुमचं डिशवॉशर ऑटोमॅटिक असेल तर एकदा भांडं ठेवून तुमची सायकल निवडून चालू केल्यावर भांडयांच्या स्वच्छेतेनंतर ते आपोआप बंद होईल. साधारणपणे ४ वॉश प्रोग्राम असतात. यामध्ये दिलेडं स्टार्टचीदेखील सुविधा असते म्हणजे तुम्हाला हवं असल्यास तुमच्या सुविधेनुसार २, ४ तास वा यापेक्षा जास्त वेळेनंतरदेखील सुरु होणारा प्रोग्रॅम निवडू शकता. यामध्ये चाईल्ड सेफ्टी लॉकचीदेखील सुविधा आहे.

काही मॉडेल्समध्ये एक्वा आणि लोड सेन्सर्सदेखील असतात, जे पाणी आणि विजेची बचत करतात. एक्वा सेन्सर्स मशीनच्या लोडनुसार पाण्याचं तापमान आणि वॉशिंग टाईम निवडतात.

डिशवॉशरचे फायदे

सुविधादायक : डिशवॉशरची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे खूपच सुविधादायक आहे आणि यामध्ये वेळेची बचत होते. भांडयांच्या स्वच्छतेसाठी अधिकवेळ सिंकजवळ उभं राहण्याची गरज नाहीए. तसंच किचनदेखील उठून दिसतं.

जर मोलकरणीवर अवलंबून रहायचं नसेल आणि आणि तिच्या अटींपासून वाचायचं असेल तर हा खूपच छान पर्याय आहे. तसंही शहरामध्ये आणि मोठया अपार्टमेंटसमध्ये मोलकरणींचे भाव दिवसेंदिवस वाढतंच चाललेत.

वीज आणि पाणी : अलीकडचे डिशवॉशर वीज आणि पाण्याच्या बाबतीत खूपच इकॉनॉमिकल आहेत. साधारणपणे एक इकॉनॉमिक वॉश सायकलमध्ये १ युनिट वीज खर्च होते. भांडी लवकर सुकविण्यासाठी हिटर चालू केला तर २ युनिट प्रति वॉश वीज जाळली जाते म्हणजेच वीज ८-१० लिटर प्रति वॉश सायकल होते, याउलट हाताने धुतल्यास यापेक्षा अधिक पाणी लागतं.

फक्त डिशेसच धूत नाही : डिशवॉशरमध्ये केवळ डिशच नाही तर तुम्ही किचनमध्ये लागणारी सर्व भांडी धुवू शकता. फक्त एक लक्षात घ्या की तुमची प्लास्टिक, काचेची आणि चिनीमातीची भांडी डिशवॉशर सेफ असावीत. अनेकदा अशी भांडी बनविणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनावर असं लिहून देतात.

डिशवॉशरचं लोडिंग : डिशवॉशरचे उत्पादक त्यांच्या माहिती पुस्तिकेत वॉशर लोड करण्याची योग्य पद्धत सचित्र समजावतात. त्यांच्या सूचनेनुसार भांडी लोड करतेवेळी वेळेची बचत आणि लोडिंग व अनलोडिंगची सुविधा असते. डिश व इतर भांडयांना उलट करून ठेवा म्हणजे पाण्याची वेगवान धार मलिन जागी पडेल आणि भांडी व्यवस्थित स्वच्छ होतील.

गरम पाण्याचा वापर : जर गरम पाणी हवं असेल तर तुमच्याजवळ हॉट वॉटरचा पर्याय आहे. वॉशर लावण्यापूर्वी तुमच्या किचन सिंकमधील गरम पाण्याचा नळ चालू करा. जेव्हा गरम पाणी येऊ लागेल तेव्हा पुन्हा बंद करा. त्यानंतर वॉशरमध्ये गरम पाणी जाऊ द्या. असं केल्याने वॉशर थंड पाण्याने धुण्याऐवजी सरळ गरम पाण्याने धुवेल.

प्रिवॉश गरजेचं नाही : अनेकदा उत्पादक प्रिवॉश करण्याचा सल्ला देतात परंतु असं करणं गरजेचं नाहीए. यामध्ये वेळ, वीज आणि पाण्याची नासाडी होते. वॉशरला लोड करून रीन्स ओन्ली सायकल निवडू शकता.

स्वच्छता : डिशवॉशरची वेळोवेळी स्वच्छता करायला हवी. वरच्या रॅकच्या मधोमध एका कपात अर्धा कप पांढरं व्हिनेगर टाकून मशीन चालू केल्याने मशीन स्वच्छ होईल आणि दुर्गंधीदेखील दूर होईल. याव्यतिरिक्त वॉशरच्या फिल्टरची स्वछता करत रहायला हवी यामुळे ड्रेन लाईन चोक होणार नाही.

काही भांडी हाताने धुवा : डिशवॉशर सेफ नसणारी भांडी हातानेच धुवा. याव्यतिरिक्त कॉपर आणि एल्युमिनियम भांडयांचा रंग खराब होऊ शकतो. लाकडाची भांडी क्रॅक होण्याची शक्यता असते.

फुली इंटिग्रिटेड डिशवॉशर लावा : तुम्ही वेगळा डिशवॉशरदेखील लावू शकता परंतु इंटिग्रिटेड वॉशर अधिक योग्य आहे. हे तुमच्या किचनच्या ओटयाखाली एकसमान असेल आणि त्याचं ऑपरेटिंग पॅनेल तुमच्या समोर असेल. वॉशरचं ड्रेन किचनच्या ड्रेनला मिळालेलं असेल.

रंगरंगोटीची ही शैली वेगळी आहे

– रेशम सेठी

आज घर केवळ राहण्याची जागा नाही, तर आपल्या स्थितीचे प्रतीक आणि स्वप्न बनले आहे. प्रत्येकाची इच्छा असते की त्याचे घर त्याच्या स्वप्नातील घरासारखेच आकर्षक आणि अद्वितीय असावे. या विचारसरणीने आपण घराची रंगरंगोटी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता पूर्वीसारखे राहिले नाही की संपूर्ण घर एकाच रंगात रंगवले, आत आणि बाहेरून समान रंग रंगविला गेला पाहिजे, आजकाल असा ट्रेंड आहे की खोलीची प्रत्येक भिंत वेग-वेगळया रंगात रंगवलेली असते. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर इतर रंगांचे काही पॅटर्न आणि टेक्सचरही लावण्यात येतात. त्याचप्रमाणे बाह्य पेंटिंगमध्येही जो नवीन ट्रेंड चालू आहे, त्यात बरेच रंग एकाच वेळी वापरले जातात. आतील आणि बाह्य पेंट पूर्णपणे भिन्न-भिन्न असतात.

अंतर्गत पेंटिंग

आपल्या घराच्या भिंतींनुसार रंग, पोत आणि नमुने निवडा. आपण वेगवेगळया खोल्यांसाठी भिन्न-भिन्न थीम निवडू शकता. आपण एका खोलीसाठी एकच रंगीत थीम निवडू शकता. यामध्ये आपण खोलीला एक वेगळा देखावा देण्यासाठी एका रंगाच्या वेगवेगळया छटा वापरू शकता. दुसऱ्या खोलीसाठी मिश्रित रंगाची थीम निवडा. वेगवेगळया भिंती आणि छतासाठी भिन्न-भिन्न रंग निवडा. लिव्हिंगरूमसाठी काही नवीनतम टेक्सचरचे ट्रेंड निवडा.

अंतर्गत पेंटिंगचे नवीन ट्रेंड

आजकाल आतील भागात थीमनुसार रंग निवडले जातात. आपण समकालीन मॉडर्न थीम निवडल्यास या रंगांचा ट्रेंड चालू आहे- पांढरा, पिस्ता ग्रीन, हलका राखाडी, सॉफ्ट क्ले, हलका निळा, मोहरी, मिस्ट (पेस्टल ब्लू आणि ग्रीन यांचे मिश्रण), मशरूम कलर, लाईट ग्रे, ग्रीन इ. तसेच गडद रंगदेखील बरेच लोकप्रिय आहेत. आपण आपल्या घराला किंवा कार्यालयाला थोडेसे सजीव रूप देऊ इच्छित असाल तर गडद रंग निवडण्यास अजिबात संकोच करू नका. गडद रंग खोल्यांना डेप्थ आणि पोत देतात. आजकाल इंटिरियर पेंटिंगमध्ये काळा, तपकिरी आणि बेज रंगदेखील ट्रेंडमध्ये आहेत.

आपण एखादी बोहो थीम निवडल्यास आपण त्यात बरेचसे वाइब्रंट रंग निवडू शकता. आजकाल रस्टिक, धातूमय व वालुकामय पोत असलेले पेंटदेखील उपलब्ध आहेत.

आपण जे काही पेंट कराल त्याची फिनिशिंग चांगली असावी. आजकाल ग्लॉसी, सॅटिन, मॅट पोत चालू आहेत. जर आपण जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी राहत असाल तर ग्लासी आणि सॅटिन पोत निवडा.

या गोष्टीही लक्षात ठेवा

* पेंटिंग करण्यापूर्वी पेंटसाठी भिंती तयार करणे महत्वाचे आहे.

* सर्वप्रथम भिंतींमध्ये ओलावा, बुरशी आणि भेगा नसल्याचे तपासा, जर त्या असतील तर प्रथम ते दुरुस्त करा.

* जर भिंतींवर नवीन प्लास्टर केले असेल तर ते कमीतकमी ६ महिने कोरडे राहू द्या.

* ज्या भिंती कोरडया असतात, ज्यांवर धूळ, घाण आणि ग्रीस नसते, त्यांच्यावर पेंट चांगले होते.

* जुना पेंट व्यवस्थित काढल्यानंतरच नवीन पेंट करा.

* आतील पेंट असे असावे की ज्याला डाग लागू नये आणि जो सहजतेने साफ केले जाईल.

* भिंतींवर काहीही रंगवण्याआधी प्राइमर अवश्य लावावे.

बाह्य रंगरंगोटी

आपले घर आपली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्याला नवीन रंग काही वर्षांनी करणे आवश्यक आहे. याद्वारे ते केवळ चांगलेच दिसणार नाही तर ते सुरक्षितही राहील. आपल्या घराला एक नवीन शैली (फ्रेश स्टाइल) आणि रिलुक देण्यासाठी बाहेरील पेंटची निवड विचारपूर्वक करावी. बाह्य पेंटला अंतर्गत पेंटपेक्षा अधिक हवामानाचा सामना करावा लागतो. ऊन, पाऊस, वारा इत्यादींचा सामना करण्यासाठी बाह्य पेंटला थोडीशी खडबडीत फिनिशिंग द्यावी.

बाहेरील पेंटिंगचे नवीन ट्रेंड

बाह्य पेंटिंगमध्येदेखील फक्त एकच रंग वापरला जात नाही. कॉन्ट्रास्ट आणि जुळणारे रंग वापरले जात आहेत. मॅचिंग रंगात गडद आणि फिकट छटा वापरल्या जातात. याशिवाय बरेच पॅटर्न आणि टेक्सचरही जोडले जातात जेणेकरून घर बाहेरूनही आकर्षक दिसेल. बाह्य पेंटिंगमध्ये पूर्वी क्रीम, पांढरा आणि इतर हलके रंग बहुतेक वेळा वापरले जात होते, परंतु आजकाल चमकदार रंगांचा कल वाढला आहे. क्रीम, ऑफ व्हाईट, सीग्रीन, मिस्टीरियस ग्रे, ब्रिक रेड, सँडी, नेव्ही ब्लू, पर्पल इत्यादी शेड्स ट्रेंडमध्ये आहेत.

बाह्य पेंटिंगमध्ये एक ग्रिटचे चलनदेखील वाढले आहे. यात पेंटमध्ये थोडीशी बारीक वाळू मिसळली जाते. बऱ्याच कंपन्या अशी उत्पादनेदेखील तयार करीत आहेत, ज्यात आधीच ग्रिट मिसळलेले असते.

या गोष्टीही लक्षात ठेवा

* पेंट ओल्या आणि खडबडीत पृष्ठभागावर चांगले चिकटत नाही. घराला बाहेरून धुण्यासाठी प्रेशर वॉश वापरा, कारण जास्त दाबाने धुतल्याने धूळ व घाण दूर होते.

* घराच्या भिंती पेंटिंग करण्यापूर्वी चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे यासाठी महत्वाचे आहे की पाणी आणि बुरशीचा प्रभाव भिंतींवर जोपर्यंत राहील तोपर्यंत नवीन पेंट व्यवस्थित बसणार नाही.

* भिंतींवर जे काही नुकसान झालेले असेल ते व्यवस्थित करा.

टीप्स

जेव्हा आपण आपले घर किंवा कार्यालय रंगविण्याचा विचार करता, तेव्हा या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या :

* आतील पेंट असो किंवा बाहेरील पेंट असो संपूर्ण घराची पेंटिंग करण्यापूर्वी वॉल पुट्टी करणे आवश्यक आहे, कारण ते भिंतींच्या भेगा भरते आणि पेंटिंगनंतर त्याचा लुक चांगला दिसतो.

* पेंटिंगची योजना बनवण्यापूर्वी कृपया इंटिरियर डिझायनरचा सल्ला अवश्य घ्या.

* स्थानिक हवामान लक्षात घेऊन घर रंगवा. भिंती पेंटिंग करण्यापूर्वीच कोरड्या असाव्यात आणि पेंटिंगनंतरही त्यांना सुकण्यास पूर्ण वेळ दिला जावा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें