* शकुंतला सिन्हा

अलीकडे डिशवॉशर म्हणजेच भांडी धुणाऱ्या मशीनची मागणी वाढू लागलीय. तुमची मोलकरीण आली नसेल वा तुमच्याकडे नसेल तर दोन्ही परिस्थितीत ही खूपच कामाची वस्तू आहे.

किती प्रकारे

डिशवॉशर प्रामुख्याने २ प्रकारचे असतात -एक म्हणजे फ्री स्टँडिंग जे वेगळं लावू शकता आणि दुसरं बिल्ट इन जे किचनच्या ओट्याखाली कायमचं लावू शकता. बिल्ट इन डिशवॉशर लावून घेणं अधिक सुविधादायक आहे.

साधारणपणे डिशवॉशर १२ ते १६ प्लेस सेटिंगचे असतात. भारतात १२ प्लेस सेटिंग असणाऱ्या मशिन्स मिळतात. एक प्लेस सेटिंग म्हणजे १-१ मोठ जेवणाचं ताट व नाश्ता प्लेट, बाउल, ग्लास, चहा वा कॉफी कप व प्लेट, सुरी, काटे आणि २-२ चमचे आणि सलाड फोर्क लोड करू शकता. याव्यतिरिक्त काही रिकाम्या जागा असतात, ज्यामध्ये जेवणाची भांडीदेखील ठेवू शकता.

भारतीय बाजारात डिशवॉशर

भारतात सीमेन्स, व्हर्लपुल, एलजी आणि आयएफबी ब्रँडचे डिशवॉशर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत साधारणपणे २४ हजारापासून ४० हजारच्या मध्ये आहे. सध्या आयएफबी ब्रँडच मार्केट शेयर सर्वाधिक आहे आणि याच्या किमतीदेखील इतरांपेक्षा कमी आहेत. २०१७ साली डिशवॉशरचं मार्केट ३०० लाख डॉलरचं होतं म्हणजे २१० कोटीचं.

डिशवॉशर लावण्यापूर्वी

डिशवॉशरसाठी ४ गरजा - ठेवण्यासाठी योग्य जागा, विजेची सुविधा, पाण्याचा पुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था. साधारणपणे डिशवॉशर २४×२४चं असतं आणि याची उंची ३५ इंच असते आणि यामध्ये अडजस्टेबल लेग्स असतात.

अलीकडे मोड्युलर किचन केलं जातंय आणि यामध्ये बिल्ट इन डिशवॉशर सहजपणे लावता येऊ शकतं. ज्यांचं स्वत:चं घर आहे वा जे नवीन बनविणार आहेत त्यांच्यासाठी बिल्ट इन मॉडेल उत्तम आहे. तुमचं घर भाडयाचं असेल तर फ्री स्टँडिंग डिशवॉशर तुम्ही घेऊ शकता, ते लावण्यात वा घेऊन जाताना तोडफोड करण्याचीदेखील गरज लागत नाही. किचन जुनं असेल तर डिशवॉशर लावण्यासाठी थोडीफार तोडफोड करावी लागेल. ओटयाखाली पुरेशी जागा बनवून तिथपर्यंत पाण्याचा पुरवठा आणि ड्रेनेजची व्यवस्था करावी लागणार.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...