चटणी आणि सूप असे बनवा चवदार

* ज्योती मोघे
जर तुम्ही चटणी बनवत असाल तर तुम्हाला माहीत आहे का की चटणीची चव
डबल टेस्टी बनविण्यासाठी कोणत्या चटणीत काय टाकायला हवे? जर माहीत
नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो :

  •  जर तुम्ही कोथिंबिरीची चटणी बनविणार असाल तर त्यात दही किंवा लिंबाचा
    रस आणि शेंगदाण्याचे दाणे किंवा काजूची पेस्ट नक्की टाका. यामुळे चटणी
    जास्त चविष्ट होईल.
  •  पुदिन्याची चटणी बनविणार असाल तर त्यात आमचूर पावडर किंवा गुळ
    नक्की घाला. यामुळे चटणीची चव कितीतरी अधिक पटीने वाढेल.
  •  टोमॅटोची चटणी बनविणार असाल तर त्यात लसूण पाकळया नक्की टाका.
    यामुळे चव उत्तम येईल.
  •  कांद्याची चटणी बनविणार असाल तर थोडी हिरव्या कांद्याची पात टाका.
    चव वाढेल.
  •  ओल्या नारळाची चटणी बनविताना त्यात भाजलेली चण्याची डाळ, शेंगदाणे
    आणि कडिपत्ता वापरा. वेगळीच चव येईल.
  •  सुकी चटणी बनविणार असाल तर किसलेले सुके खोबरे, शेंगदाण्याचे दाणे,
    जिरे पावडर, लसूण, मीठ, अख्खी लाल मिरची नक्की वापरा. यामुळे खूप चांगली
    चव येते.
  •  दह्याची चटणी बनविणार असाल तर शेंगदाण्याचा कुट, काळी मिरी, मीठ
    आणि चाट मसाला वापरा. अफलातून चव येईल.
    सूप बनविण्यासाठी काही टीप्स
  •  सूप घट्ट बनवायचे असेल तर त्यात काळी मिरी, काळे मीठ, हिंग वापरून
    फ्रेश क्रीम आणि टोस्टचे तुकडे घाला.
  •  कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून ते वापरू शकता.
  •  तांदळाची पिठी घाला. यामुळेही सूप घट्ट होते.
  •  बटाटा उकडून एकदम बारीक किसून टाका.
  •  मैदा भाजून टाकू शकता.
  •  गव्हाचे पीठ भाजून आणि त्यात पाणी मिसळून टाकू शकता.
  •  सूप तयार झाल्यावर त्यात क्रीम घालू शकता. यामुळेही घट्टसरपणा येईल.
  •  आरारूट पाण्यात घोळवून टाका. यामुळेही सूप घट्ट होईल.
  •  कोबीची बारीक पेस्ट करूनही टाकू शकता.
  •  खसखसची पेस्ट घालूनही सूप घट्ट करता येईल.

हलकेफुलके पदार्थ

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

चणा चाट

साहित्य

* १ वाटी उकडलेले काबुली चणे

* १ उकडलेला बटाटा

* अर्धा वाटी घट्ट दही

* १ लहान चमचा गोड चटणी

* १ लहान चमचा हिरवी चटणी

* पाव चमचा भाजलेले जिरे

* पाव चमचा चाट मसाला

* पाव लहान चमचा लाल मिरची पूड

* १ कचोरी

* थोडी बारीक शेव सजवण्यासाठी

* थोडी कोथिंबीर सजवण्यासाठी

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि बटाटयाचे चौकोनी तुकडे कापून सोनेरी होईस्तोवर तळून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून जिरे घाला. जिरे तडमडले की सगळे मसाले यात घाला. नंतर यात उकडलेले चणे घालून व्यवस्थित मिसळा. प्लेटमध्ये कचोरीचा चुरा ठेवा. त्यावर चणे ठेवा नंतर बटाटे सजवून ठेवा. दही घाला. दोन्ही चटण्या टाका वरून चाट मसाला भुरकवा. शेव आणि कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.

कोबी रोल

साहित्य

* १ कोबी मध्यम आकाराचा

* २५० ग्राम पनीर

* १ लहान चमचा तंदूरी मसाला

* १ मोठा चमचा मोझरेला चीज

* थोडे आल्याचे उभे काप

* पाव वाटी मटारचे दाणे

* १ मोठा चमचा तेल

* १ मोठा चमचा तांदळाचे पीठ

* १ मोठा चमचा लिंबू रस

* १ वाटी ब्रेडक्रंब्स

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

 

कृती

कोबीची अख्खी पानं वेगळी करून गरम पाण्यात घालून २ मिनिट झाकून मऊ होईपर्यत शिजवा. पाणी काढून ते थंड होऊ द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून सगळे मसाले घाला. त्यानंतर मटर व बारीक चिरलेले पनीर टाकून चांगले एकत्र मिसळा. आच बंद करून त्यात लिंबाचा रस आणि चीज मिसळा. हे सारण तयार झालं. तांदळाचे पीठ भिजवून चांगले मिश्रण तयार करा. एका एका कोबीच्या पानात मिश्रण भरून चारही बाजूनी ते दुमडून रोल तयार करा. तांदळाच्या भिजवलेल्या पिठात हा रोल बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी होईस्तोवर तळा.

हलकेफुलके पदार्थ

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

झटपट गाजर हलवा

साहित्य

* १ किलोग्रॅम गाजर

* १ वाटी साखर

* २ चमचे देशी घी

* २ लहान वेलदोडे

* बदाम, काजू व मगज आवडीनुसार

* २५० ग्रॅम खवा.

कृती

गाजर किसून घ्या. मग साखर आणि गाजराचा किस एकत्र काढीत कढईच्या आचेवर शिजायला ठेवा. ५-७ मिनिटात जेव्हा साखरेचे पाणी आटेल तेव्हा त्यात देशी घी टाकून परतून घ्या. सुका मेवा तळून मिसळा. शेवटी खवा मिसळून काही वेळ परतत राहा. तुमचा गाजर हलवा तयार आहे.

मंचाव सूप

साहित्य

* ४ कप भाज्यांचा स्टॉक

* १ कप बारीक कापलेले कोबी, गाजर, मशरूम, पातीचा कांदा,
पनीर, बीन्स

* ४ टोमॅटो

* १ मोठा चमचा बटर

* १ लहान चमचा चिली सॉस

* एक मोठा चमचा व्हिनेगर

* मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात सगळया भाज्या थोडा वेळ परतून घ्या. आता भाज्यांचा स्टॉक टाका. टोमॅटो उकळून किसून घ्या. त्या उकळलेल्या स्टोकमध्ये टोमॅटोचा गर टाकून थोडा वेळ शिजवा. दोन्ही सॉस आणि मीठ मिसळा. गॅस बंद करून त्यात पातीच्या कांद्याची पात मिसळा. तळलेल्या न्युडल्ससोबत गरमगरम सर्व्ह करा.

शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

रवा कोकोनट बर्फी

साहित्य

* ३ मोठे चमचे तूप

* पाऊण कप रवा

* अर्धा कप किसलेले खोबरे

* २ कप दूध

* पाऊण कप साखर

* १ छोटा चमचा वेलची पावडर

* गार्निशिंगसेठी पिस्ता.

कृती

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा हलका सोनेरी रंगावर परता. आता त्यात खोबरं टाकून ५ मिनिटे परता आणि मग गॅसवरून उतरून एका बाजूला ठेवा. एका दुसऱ्या पॅनमध्ये दूध मंद आंचेवर उकळून त्यात रव्याचं मिश्रण टाकून चांगल्याप्रकारे ढवळा. दूध सुकल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर टाकून चांगल्याप्रकारे ढवळा. हे मिश्रण जोपर्यंत तूप सुटत नाही, तोपर्यंत ढवळत राहा. आता एका ट्रेला तूप लावून स्पॅट्यूलाने मिश्रण पसरवून सेट होण्यासाठी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा बर्फी चांगल्याप्रकारे सेट होईल, तेव्हा आवडत्या आकारात कापून पिस्त्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

कॅरामल कस्टर्ड

साहित्य

* अर्धा कप साखर

* ३ फेटलेली अंडी

* दीड छोटे चमचे व्हॅनिला

* २ कप उकळलेले दूध
* जायफळ

* गार्निशिंगसाठी मिंट स्प्रिंग.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात साखर घालून ती कमी हीटवर ओव्हनमध्ये सोनेरी होईपर्यंत वितळवा. मग हे सीरप चार मोल्डमध्ये भरून ओव्हनमध्ये १० मिनिटे कडक होण्यासाठी ठेवा. एका मिडियम बाउलमध्ये फेटलेली अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स आणि जायफळ घालून चांगल्याप्रकारे मिसळा. हे मिश्रण चाळणीने गाळून मोल्डमध्ये तीन चतुर्थांश भरा. मग ओव्हन रॅकवर रॅक्टँग्यूलर पॅन घेऊन त्यात भरलेले मोल्ड्स ठेवा. (पॅनमध्ये गरम पाणी ठेवा). मग ते जोपर्यंत चाकू सहजपणे बाहेर येत नाही, तोपर्यंत शिजू द्या. मग स्पॅटयूलाच्या मदतीने कस्टर्ड काठाने बाहेर काढा आणि मोल्डवर प्लेट ठेवून त्यावर डिश पलटा. आता तयार कॅरेमल सीरप सॉसप्रमाणे कस्टर्डच्या काठावर ओतून मिंट स्प्रिंगने गार्निश करून सर्व्ह करा.

शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

राजगिरा हलवा

साहित्य

* १ कप राजगिरा पीठ

* अडीच कप दूध

* ८ मोठे चमचे साजूक तूप

* अर्धा कप साखर

* थोडीशी वेलची पावडर

* थोडेसे काप केलेले काजू व बदाम.

कृती

एका पॅनमध्ये मंद आंचेवर दूध तापवा. तापल्यानंतर त्यात साखर घालून चांगल्याप्रकारे ढवळा. आता आणखी एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात राजगिरा पीठ घालून सोनेरी होईपर्यंत ढवळत राहा. मग यात हळूहळू दूध घालत मंद आंचेवर थोडा वेळ ढवळा. दूध सुकले आणि तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची पावडर व ड्रायफ्रूट्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

बेसनचे लाडू

साहित्य

* १ कप बेसन

* थोडीशी वेलची पावडर

* पाव कप तूप

* अर्धा कप पिठीसाखर

* गार्निशिंगसाठी थोडेसे काप केलेले पिस्ते.

कृती

बेसन चाळा. जाड बुडाच्या कढईमध्ये तूप गरम करून बेसन हलक्या सोनेरी रंगावर भाजा. तयार मिश्रण ताटात काढून थोडं थंड करा आणि मग यात वेलची पावडर व साखर चांगल्याप्रकारे मिक्स करा. मिश्रणाचे लाडू बनवून पिस्त्यांनी सजवून सर्व्ह करा.

शेफ स्टाईल स्वीट्स

* पाककृती सहकार्य : सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार

मोदक

सारणाचे साहित्य

*  थोडेसे पाणी

* १ कप किसलेला गूळ

* २ कप किसलेले खोबरे

* थोडीशी वेलची पावडर

* २ मोठे चमचे तूप

* थोडेसे बारीक कापलेले काजू.

पिठाचे साहित्य

* १ कप पाणी

* १ छोटा चमचा तूप

* १ कप तांदळाचे पीठ

* चवीनुसार मीठ.

कृती

एका पॅनमध्ये पाणी आणि गूळ टाकून मिडियम आंचेवर शिजवा. मग यात खोबरं टाकून १० मिनिटे चांगल्याप्रकारे ढवळा. मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स झाले की त्यात तूप, वेलची पावडर आणि काजू घालून चांगल्याप्रकारे ढवळा व आंचेवरून उतरून एका बाजूला ठेवा. पीठ तयार करण्यासाठी १ कप पाणी गरम करून त्यात तूप व मीठ टाका. पाणी जेव्हा चांगल्याप्रकारे उकळू लागेल, तेव्हा त्यात तांदळाचे पीठ टाकून चांगल्याप्रकारे ढवळत राहा, म्हणजे गठ्ठे बनणार नाही. मग ते झाकून १ मिनीट वाफवा आणि गॅस बंद करा. आता हे मिश्रण गरमागरमच चांगल्याप्रकारे मिक्स करत १० समान गोळे बनवून पुरीच्या आकारात लाटा. लाटल्यानंतर खोबऱ्याचे सारण भरून त्याच्या पाऱ्या बनवून बंद करा. मग स्टीमर प्लेटवर केळीचे पान ठेवून१०-१५ मिनिटे उकडून गरमागरम सर्व्ह करा.

 

स्टफ्ड मावा लाडू

साहित्य

* १ कप खवा किंवा मावा

* अर्धा कप पिठी साखर

* अर्धा मोठा चमचा तूप

* पाव कप मिक्स ड्रायफ्रूट्स

* ४ मोठे चमचे किसलेले खोबरे

* थोडेसे पिस्ते.

कृती

एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून मावा घालून २ मिनिटे परता. मग त्यात साखर मिसळून गॅसवरून उतरून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हाताला तूप लावून या मिश्रणाचे स्मूद बॉल्स बनवा. ते सपाट करून मध्ये खड्डा करून ड्रायफ्रूट्स भरून ते कडेने बंद करून पुन्हा स्मूद बॉल्स बनवा. मग पिस्ते आणि खोबऱ्यात लपेटून थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवा आणि मग सर्व्ह करा.

गोडगोड दिवाळी

* प्रतिनिध

काजू-मँगो फज

साहित्य

* १ कप जाडसर वाटलेले काजू

* १०० ग्रॅम गोड आंबापोळी

* पाव कप साखर

* १ मोठा चमचा नारळाचा कीस

* सजावटीसाठी काप केलेले मेवे.

कृती

एका पॅनमध्ये साखर विरघळा. आंबापोळीचे छोटे तुकडे कापून घ्या. साखरेच्या मिश्रणात काजू आणि आंबापोळी मिसळा व चांगल्याप्रकारे ढवळा. हे मिश्रण एका तूप लावलेल्या ताटात काढा. थोडं थंड झाल्यावर चमच्याने घेऊन थोडं-थोडं मिश्रण प्लेटमध्ये ठेवा. वरून नारळाचा कीस आणि मेव्याचे काप पेरा. थंड करून वाढा.

 

रताळ्याची खीर

साहित्य मॅरिनेट

* ५०० ग्रॅम उकडलेली रताळी

* २ लीटर दूध

* १ कप कंडेस्ड मिल्क

* अर्धा कप मेव्याचे काप

* सजवण्यासाठी थोडेसे पिस्ते व गुलाबाच्या पाकळ्या

* चिमूटभर छोटी वेलची पावडर.

कृती

रताळी सोलून कुस्करून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा दूध उकळून अर्धे राहील, तेव्हा त्यात कुस्करलेली रताळी व वेलची पावडर टाका. दूध दाट होईपर्यंत शिजवा. मग मेवे व कंडेस्ड मिल्क घालून सतत ढवळत राहा. उकळी आल्यानंतर गॅसवरून उतरवा. गरम खीर सर्व्हिंग डिशमध्ये घ्या. वर पिस्ता व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.

उत्सवी स्वाद -2

* प्रतिनिधी

1) अक्रोड चाप्स

साहित्य

* १ कप वॉलनट तुकडे
* २ कप उकडलेले बटाटे मॅश करून
* २ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
* १ छोटा चमचा बारीक कापलेले आले
* १ छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची
* १ छोटा चमचा धने पावडर
* १ छोटा चमचा लाल मिरची पावडर
* पाव छोटा चमचा आमचूर
* अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा चाट मसाला
* १ छोटा चमचा जाडसर डाळिंबाचे दाणे
* १ कप तेल
* चवीनुसार मीठ.

कृती

तेल सोडून बाकी सर्व साहित्य मिसळा. मग या तयार साहित्याचे चाप्स बनवून हार्ट शेपच्या कटरने कापा. सर्व चाप्सला तव्यावर थोडे-थोडे तेल घालून शॅलो फ्राय करून हिरव्या चटणीसोबत वाढा.

2) वॉलनट पराठा

साहित्य

* २ कप मल्टिपर्पज पीठ
* १ कप जाडसर बारीक केलेले अक्रोड
* १ छोटा चमचा जिरे
* १ मोठा चमचा धने पावडर
* चवीनुसार मीठ
* १ छोटा चमचा डाळिंबाच्या दाण्याची पावडर
* १ छोटा चमचा चाट मसाला
*अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा जाडसर काळीमिरी
* आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.

कृती

पिठात चवीनुसार मीठ मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी मिसळून मऊ मळून घ्या. अक्रोडसोबत सर्व मसाले मिसळा. पिठाचे गोळे बनवा. ते लाटून तूप लावा. अक्रोडचे सारण पसरवून काठाकडून बंद करत पुन्हा गोळा बनवा. आता हलक्या हातांनी पराठा लाटा. दोन्ही बाजूला तूप लावून सोनेरी रंगावर भाजून घ्या.

3) रवा केशरी

साहित्य

* पाव कप बादामचा चुरा
* १ कप रवा
*२ मोठे चमचे तूप
* २ मोठे चमचे तूप
* ४ मोठे चमचे पिठीसाखर
* अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
* २ छोटे चमचे बदामाचे काप.

कृती

पॅन गरम करून तूप टाकून रवा घालून सोनेरी रंगावर भाजा. आता यात १ कप पाणी व साखर मिसळा. सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मग वेलची पावडर आणि बदामाचा चुरा टाकून २-३ मिनिटे अजून परता. आता हे आवडत्या आकाराच्या बाउलमध्ये ओता. थंड झाल्यावर काढून घ्या आणि बदामाचे काप पेरून सर्व्ह करा.

उत्सवी स्वाद – 1

* प्रतिनिधी

1) बादाम कटलेट

साहित्य

* १ मोठा कप उकडलेले बटाटे मॅश करून
* १ कप बदामाचा चुरा
* १ छोटा चमचा आलं बारीक कापून
* १ छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
* १ कप रवा
* १ कप ब्रेडक्रंब्स
* अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर
* अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर
* तळण्यासाठी पुरेसे तेल
* चवीनुसार मीठ.

कृती

बदाम व तेल सोडून बाकी सर्व साहित्य चांगल्याप्रकारे मिसळा. तयार मिश्रणाचे गोळे बनवा. प्रत्येक गोळा हातावर थापून बदामाचा चुरा भरा. पुन्हा गोळ्याचा आकार द्या. आता हे दाबून हार्टशेप आकारात कापा. कढईमध्ये तेल गरम करून सर्व कटलेट तळून घ्या. हिरव्या चटणीसोबत वाढा.

2) बादाम कुकीज

साहित्य

* २०० ग्रॅम मैदा
* दीड छोटा चमचा बेकिंग पावडर
* २५ ग्रॅम पिस्ते तुकडे केलेले
* ५० ग्रॅम बदाम
* २०० ग्रॅम पिठीसाखर
* २ मोठे चमचे दूध
* २०० ग्रॅम लोणी.

कृती

मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून २-३ वेळा चाळा. लोणी हलके गरम करून वितळून घ्या. साखर मिसळून चांगल्याप्रकारे फेटा. आता यात मैदा मिसळा. आवश्यकतेनुसार दूध मिसळून मळा. बेकिंग ट्रेला तूप लावून घ्या. तयार मिश्रणाचे बॉल्स बनवून हाताने दाबा आणि हार्टशेपच्या कटरने कापा. बिस्किटांवर बदाम, पिस्ता पेरून दाबा. आता हे तूप लावलेल्या ट्रेमध्ये ठेवून १८०० सें.ग्रे.वर प्रीहीटेड ओव्हनमध्ये १५ मिनिटे ठेवा. हलके ब्राउन झाल्यानंतर काढून घ्या. थंड झाल्यानंतर एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा.

3) मेवा लाडू

साहित्य

* ५०० ग्रॅम गूळ (छोटे छोटे तुकडे केलेला)
* अर्धा कप बदामाचे तुकडे
* १ कप काजूचे तुकडे
* १ मोठा चमचा पिस्त्याचे तुकडे
* १ कप किसलेले खोबरे
* १ छोटा चमचा वेलची पावडर
* पाव कप मावा
* अर्धा कप तूप.

कृती

मावा कुस्करून जाड बुडाच्या कढईमध्ये मध्यम आचेवर ब्राउन होईपर्यंत भाजून प्लेटमध्ये काढून घ्या. कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. गरम तुपात गुळाचे तुकडे वितळवा व चमच्याने सतत ढवळत राहा. गुळाचा पाक बनल्यानंतर तो गॅसवरून उतरवा आणि यात मेवे, मावा तसेच खोबरे मिसळा. तयार मिश्रणाचे मनपसंत आकारात लाडू बनवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें