* मोनिका अग्रवाल

जेवण बनवण्यात वापरले जाणारे मसाले लहानसहान आजारांमध्येसुद्धा उपयोगी पडू शकतात. कसे या जाणून घेऊ.

लिंबू

कच्चे लिंबू व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना मानले जाते. हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत आहेत. यात व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असल्याने याचे सेवन करणे इन्फेक्शनमध्ये लाभदायक असते. अस्थमा, टॉन्सिलायटिस आणि गळा खराब होणे यावर लिंबाचे सेवन केल्याने आराम मिळतो. लिंबू पाण्यात असलेला लिंबाचा रस, हायड्रोक्लोरिक अॅसिडच्या निर्मितीत वाढ करतो, जो पचनासाठी आवश्यक असतो.

लिंबू पाण्याने रक्तदाब आणि ताण कमी होतो. लिव्हरसाठी टॉनिक म्हणून काम करतो.

डायरीयासारख्या आजारांमध्येसुद्धा परिणामकारक असतो. हे एक ब्लिचिंग एजंट आहे, जे चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो आणि डाग नाहीसे होतात.

आले

आल्याला महाऔषधसुद्धा म्हणतात. हे ताजे आणि सुके दोन्ही स्वरूपात वापरले जाते. यात आयर्न, कॅल्शियम, आयोडीन, क्लोरीन आणि व्हिटॅमिन व इतर अनेक पौष्टीक पदार्थ असतात. जर मॉर्निंग सिकनेसने त्रस्त असलेली एखादी गर्भवती महिला याचे सेवन करत असेल तर आल्याचा फायदा नक्कीच होईल.

हे पचनसंस्थेला मजबूत करते. आल्यासोबत ओवा, सैंधवमीठ, लिंबाचा रस एकत्र करून खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते. याच्या सेवनाने पोटात गॅस धरत नाही. आंबट ढेकर येणे बंद होते. सर्दीपडसे, डोकेदुखी आणि मासिकपाळीत हे घेतल्याने फायदा होतो. आले खाल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

ओवा

नियमित ओवा खाल्ल्यास पचनशक्ती चांगली राहते. पोटदुखी, अॅसिडिटी झाल्यास बरे वाटते. हवे असल्यास ओवा ५ मिनीटे चावा आणि मग गरम पाणी प्या. ओवा, सेंधव मीठ, हिंग आणि सुका आवळा किसून समसमान प्रमाणात मधासोबत सकाळ संध्याकाळ चाटण घेतल्यास आंबट ढेकर येणे थांबते. डोके दुखत असेल तर ओवा खाल्ल्याने बरे वाटते.

खाजखुजली होत असलेल्या जागेवर ओवा बारीक करून त्याचा लेप लावा. कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब कानात टाकल्याने बरे वाटते. ओवा कानाच्या इन्फेक्शनलाही दूर ठेवण्यात सहाय्य्क ठरतो. पाण्यासोबत ओवा सकाळ संध्याकाळ घेतल्याने अस्थमासारखे आजार बरे होतात.

मुलाच्या पोटात जंत झाल्यास अर्धा ग्राम ओवा आणि काळे मीठ मिसळून पाण्यासोबत दिल्यास लाभ होतो. डोक्यात उवा झाल्यास चमचा तुरटी आणि २ चमचे ओवा बारीक करून एक कप चहात मिसळून केसांच्या मुळांना रात्री झोपताना लावा. सकाळी केस धुवा, उवा मरून जातील.

मोठा वेलदोडा

मोठया वेलदोडयाला काळा वेलदोडा, लाल वेलदोडा या नावानेसुद्धा ओळखले जाते.  याला मसाल्याची राणीसुद्धा म्हटले जाते. हा नियमित खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रक्त गोठण्याच्या क्रियेला कमी करते. श्वासासंबंधित गंभीर आजार असेल तर हे खाल्ल्याने लाभ होतो. याने फक्त युरीनेशनच सुधारत नाही तर किडनीशी संबंधित आजार दूर होतात. याचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

हा तणाव आणि थकवा दूर पळवतो, इतकेच नाही तर यामुळे शरीरातील बॅक्टेरियल, व्हायरल इन्फेक्शनसुद्धा दूर होते. यात पोटॅशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...