* मोनिका अग्रवाल

कामसूत्राचे नाव येताच लाज, काहीशी संकोचाची भावना निर्माण होते. प्रत्यक्षात अशी भावना म्हणजे निव्वळ एक दृष्टिकोन आहे. मुळात यावरील २००० वर्षे जुना असलेला हा ग्रंथ स्वत:मध्ये परिपूर्ण आहे. आनंदी जीवन कसे जगायचे ते हे पुस्तक सांगते. सेक्समुळे ऊर्जा, समाधान आणि आनंदाची अनुभूती कशी मिळते हेही स्पष्ट करते.

कामसूत्राचा उद्देश

कामसूत्रात सेक्सशी संबंधित काही भाग सोडला तर यात बहुतांश करून राहणीमान, समाजातील वर्तन, सजण्याच्या आणि आकर्षक दिसण्याच्या पद्धती याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुंदर आणि कर्तबगार तरुण कसा असावा हे यात सांगितले आहे. त्याचप्रमाणे सर्वांच्या मनाला आनंद देणाऱ्या सदगुणी मुलीमध्ये कोणते गुण अपेक्षित आहेत, हेही सांगितले आहे.

हे शास्त्र सांगते की, याचे ज्ञान आत्मसात करून आणि त्याची अंमलबजावणी करून सर्व गुण अंगिकारता येतात. जेव्हा या शास्त्राच्या ज्ञानाचा अधिकाधिक लोकांना फायदा होईल तेव्हा एका व्यक्तीसह एक सुसंस्कृत समाज निर्माण होईल. हा समाज शिक्षण, संस्कृती, उत्सव, कला आणि आनंदाने परिपूर्ण असेल.

सुखी वैवाहिक जीवनाचा पाया

वात्स्यायन ऋषींचा हा प्राचीन ग्रंथ सांगतो की, जीवनातील सृजनता आणि आनंद देणारा सेक्स वाईट नाही. तो सुखी वैवाहिक जीवनाचा पाया आहे. सेक्स करताना पतीपत्नी एकमेकांशी पूर्ण समर्पित होतात. त्यामुळे शरीर आणि आत्म्याचे मिलन होते.

या मिलनातूनच आनंदाची अनुभूती आणि मुलांचा जन्म होतो. कुटुंब वाढते, आनंद मिळतो. एकमेकांप्रती पूर्ण समर्पण आणि आनंद हा पतीपत्नी तसेच कुटुंबाच्या सुखासाठीही महत्त्वाचा पाया ठरतो.

कामसूत्र आणि हिंदू परंपरा

कामसूत्राच्या मुळाशी प्रेम आहे, असे मानले जाते. हिंदू जीवनपद्धतीत धर्म, अर्थ आणि मोक्षासोबत कामुकतेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यापुढील काळात मात्र ही भावना म्हणजेच सेक्सकडे देश, काळ आणि परिस्थितीनुसार लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहिले जाऊ लागले. हिंदू परंपरेत धर्म आणि अर्थ यांच्यानंतर संभोगला विशेष महत्त्व आहे. प्रत्यक्षात ही ती अनुभूती आहे ज्यामध्ये पाचही इंद्रिये सुख अनुभवतात.

केव्हा चुकीचे ठरते सेक्स

तरुण-तरुणीच्या संमतीशिवाय जेव्हा जबरदस्तीने सेक्स केले जाते, तेव्हा ते चुकीचे ठरते. जवळपास सर्वत्र ते गुन्ह्याच्या श्रेणीत ग्राह्य धरण्यात आले आहे. याशिवाय, जेव्हा लैंगिक स्वार्थ, द्वेषाने सेक्स केले जाते, तेव्हाही त्याचा स्वभाव आणि आनंद नष्ट होतो किंवा कमी होतो. खरंतर सेक्स निश्चल आणि निर्मळ आहे. या स्वरूपातच ते आनंदाची अनुभूती देते.

मूल्ये अवश्य लक्षात ठेवा

मूल्यांशिवाय सेक्स पूर्ण होऊ शकत नाही. ही नैतिक मूल्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात. याशिवाय समाजाचीही स्वत:ची मूल्ये असतात. स्त्रीने पुरुषाची तर पुरुषाने स्त्रीची मूल्ये जपली पाहिजेत आणि दोघांनीही समाजाची मूल्ये जपायला हवीत. असे केल्याने शारीरिक आणि मानसिक आनंदाची अनुभूती मिळते. व्यक्ती आणि समाजाची मूल्ये भिन्न असू शकतात, मात्र त्यांचा आदर केला पाहिजे.

गृहसजावटही शिकवते कामसूत्र

घराची सजावट आणि त्याचे महत्त्व यांचे वर्णनही कामसूत्रात करण्यात आले आहे. चांगल्या घरासाठी बाग आणि किचन गार्डनचे महत्त्व सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या बागेच्या सौंदर्याचा व्यक्तीच्या विकासावर आणि मनावर काय परिणाम होतो, हेही सांगण्यात आले आहे. याशिवाय घरातील सजावटीचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे..

महिलांसाठी जागा

कामसूत्र प्राचीन असूनही आजही अतिशय समर्पक आहे. या ग्रंथात स्त्रियांच्या सुखाकडे जास्त लक्ष दिले गेले आहे. आदर्श घर असे असावे की, ज्यामध्ये स्त्रियांच्या वैयक्तिक क्षणांसाठी स्वतंत्र जागा असेल. तेथे पती, घरमालक आणि राजालासुद्धा जाण्यापूर्वी संबंधित महिलेची परवानगी घेणे आवश्यक असेल.

महिलांना स्वातंत्र्याचे क्षण मिळावेत म्हणून ही तरतूद आहे. त्या क्षणांदरम्यान कोणीही कुठलाच हस्तक्षेप करू नये. त्यावेळी त्या त्यांच्या इच्छेनुसार साजशृंगार करू शकतात, कपडे घालू शकतात, अंघोळ करू शकतात किंवा कुठल्याही अवस्थेत वावरू शकतात. त्यावेळी त्यांना रोखण्याचा अधिकार कोणालाच नसतो.

दिनचर्येचेही वर्णन

कामसूत्रातही एका चांगल्या दिनचर्येचे वर्णन करण्यात आले आहे. त्यानुसार धार्मिक विधी, पूजा, त्यानंतर स्वच्छता, अंघोळ इत्यादीने दिवसाची सुरुवात करावी, त्यानंतर राज्य किंवा व्यावसायिक कार्ये करावीत, अशी दिनचर्या यात सुचवण्यात आली आहे. दुपारच्या जेवणानंतर मनोरंजनाची इतर साधने, घोडे किंवा अन्य आवडत्या प्राण्यांसोबत सहलीचाही उल्लेख आहे. यानंतर संध्याकाळचे स्नान, सुगंधी द्र्रव्यांचा वापर, संगीत, स्तोत्र इत्यादीमध्ये वेळ घालवणे चांगले आहे, असे सांगण्यात आले आहे.

स्पर्धाही महत्त्वाच्या

कामसूत्रानुसार, जीवन जगण्यायोग्य करण्यासाठी संगीतासोबतच खेळ, सामान्य ज्ञान आणि खेळांना विशेष स्थान असते. या स्पर्धांमुळे पाहणाऱ्यांचे मनोरंजन होतेच, शिवाय त्यातील विजेत्यांना समाजात सन्मानही मिळतो. तरुण किंवा तरुणीचे नावलौकिक होते. त्यांचे प्रशंसक वाढतात.

लैंगिक जीवन सुधारण्याचे मार्ग

कामसूत्राच्या दुसऱ्या भागात, सेक्सद्वारे लैंगिक जीवन कसे सुधारता येऊ शकते, याचे मार्ग सांगितले आहेत. जसे की, स्त्री-पुरुष किंवा पतीपत्नीने एकमेकांकडे पाहणे, स्पर्श करणे, एकमेकांना आकर्षित करणे, अत्तराचा वापर आणि नैसर्गिक संगीताद्वारे अंतर्मन, शरीराला जास्तीत जास्त आनंदी  ठेवण्याचे प्रकार सांगण्यात आले आहेत.

मंदिरातील कलाकुसरही सांगते महत्त्व

मध्य प्रदेशातील खजुराहोसह अनेक प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर विविध प्रेम मुद्र्रांमधील पुरुष आणि महिलांची रेखाटलेली चित्रे, कलाकुसर ही सेक्सप्रती भारतीय समाजात असलेली निर्मळ आणि स्वीकार्य वृत्ती दर्शवते. मंदिरांमधील या प्रतिमा याची साक्ष देतात की, सेक्स हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते समर्पण आणि जबाबदारीने पार पाडून प्रापंचिक तसेच अध्यात्मिक आनंद मिळवता येतो.

सुयोग्य पती किंवा पत्नीची निवड कशी करावी

उत्तम जीवन जगण्यासोबतच सुयोग्य जोडीदाराची निवड आणि मनासारखा जीवनसाथी मिळावा यासाठी काय करायला हवे ते कामसूत्र सांगते. हा ग्रंथ विभिन्न स्वभाव आणि वर्तन असलेल्या स्त्री-पुरुषांसाठी त्यांना अनुरूप अशा जोडीदारात कोणती वैशिष्टये असायला हवीत, हे सांगतो. यासोबतच आपल्या आवडीचा तरुण किंवा तरुणीचे मन जिंकण्यासाठी आणि लग्नानंतर कायमचे एकमेकांचे होण्यासाठी तरुण किंवा तरुणीने कसे वागावे, तेही हा ग्रंथ सांगतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...