* डॉ. स्नेह ठाकूर

प्रत्येक शहराची स्वत:ची खासियत, वैशिष्टये व स्वत:चं एक आकर्षण असतं. काही स्थळ इतिहासाची गाथा गात तुमचं मन मोहून घेतात, तर काही वर्तमानातील झगमगटामुळे तुमचे डोळे दीपवून टाकतात. असंच नैसर्गिक गोष्टी आणि आधुनिकतेने समावलेला कॅनडातील टोरँटो पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहे.

टोरँटोचा सीएन टॉवर ५५५.३३ मीटर (१८१५ फुट ५ इंच) उंच जगातील सर्वात उंच इमारतीपैकी एक आहे. ६ काचेच्या लिफ्ट्स प्रेक्षकांना २२ किलोमीटर प्रतितास वेगाने ५८ सेकंदात ऑब्जर्वेशन डॅकपर्यंत पोहोचवितात.

जून, १९९४ साली बनलेल्या व जगातील पहिल्या सीएन टॉवरची फरशी काचेची आहे. ही काचेची फरशी पर्यटकांना वर जातेवेळी आपल्या पायाखाली रस्ता पाहण्याची सुविधा देतात.

टॉवरच्या ऑब्जर्वेशन डॅकवरून प्रेक्षकांना १६० किलोमीटर दुरपर्यंत नायगारा धबधबा आणि जर ढग नसतील तर ओन्टॅरियो झिलच्या पलीकडे आसलेलं नुयॉर्क शहर पाहू शकता.

दर ७२ मिनिटात इथल्या ३६० रेस्टॉरंट स्वत:ची पूर्ण परिक्रमा करतात जे तिथे बसलेल्या प्रेक्षकांना १००० फूटपेक्षादेखील खाली टोरँटोची बदलती दृश्य पाहण्याचा आनंद देतात.

असाधारण अनुभव

सेंट लॉरेन्स बाजार : टोरँटोचं एक दुसरं आकर्षण आहे सेंट लॉरेन्स बाजार. इथे ३ ऐतिहासिक इमारती येतात. इथे एंटीक बाजार, फूड कोर्ट आणि पब्लिक प्लेस आहे. बाजारात ५० प्रकारचे फूड जॉइट्स आहेत. इथे २०० वर्षे जुनं शनिवार शेतकरी बाजार आणि रविवारचा एंटीक जुना बाजारदेखील लागतो.

इटन सेंटर १९७९ मध्ये इटलीच्या मिलान शहराच्या ग्लास रुफ गॅलरियाच्या मॉडेल नुसार बनलंय. हे बहुमजली शॉपिंग सेंटर आहे. इथे विविध प्रकारची दुकानें, रेस्टॉरंटस तसंच सिनेमागृहे आहेत. हे टोरँटोचं क्रमांक एकचं टुरिस्ट आकर्षण आहे. यॉर्कविल टोरँटोचं सर्वात प्रसिद्ध शॉपिंग क्षेत्र आहे.

पाण्याच्या किनारी वसलेल्या इतर मोठया शहराप्रमाणे टोरँटो डाऊन टाऊन वॉटरफ्रंटदेखील हळूहळू १० एकर लेक साईड घटना स्थळाच्या रुपात परिवर्तीत होत गेलं. पुरस्कारप्राप्त हार्बरफ्रंट सेंटरमध्ये आर्ट गॅलरीज, सिनेमागृह, क्राफ्ट बुटीक्स, कार्यालये, हॉटेल आणि मरीना पाण्याच्या किनारी सैर करण्याचे सार्वजनिक मार्ग आहेत. टोरँटो हार्बर फ्रंट सेंटर एक सांस्कृतिक संघटना आहे. इथे हिवाळयात स्केटदेखील करू शकता.

रॉयल ओन्टॅरियो संग्रहालंय कॅनडातील सर्वात मोठं संग्रहालंय आहे आणि जगातील १० संग्रहालयात याचा समावेश आहे. प्राचीन इतिहासाबरोबरच संस्कृतीच्या एक सार्वभोमिक संग्रहालयाच्या संयोजनात रॉयल ओन्टॅरियो संग्रहालंय जगभरातील पर्यटक आणि विद्वानांना एक असाधारण अनुभव मिळवून देतो.

१९९० साली स्थापन झालेल्या आर्ट गॅलरी ऑफ ओन्टॅरियो उत्तर अमेरिकेत अग्रणी कला संग्रहालय पैकी एक आहे. ही कॅनडातील सर्वात प्राचीन आर्ट गॅलरी आहे.

सर्वात मोठं आकर्षण

सप्टेंबर १९६९ मध्ये सुरु झालेल्या एक विज्ञान केंद्र पर्यावरण, इन्फॉर्मशन हायवे इत्यादीवर विविध प्रदर्शने आयोजित केले जातात.

इतिहास हा वास्तूकला प्रेमीसाठी कासा लोमा एक रोचक अनुभव आहे.१९०० च्या प्रारंभिक काळात टोरँटोचे श्रीमंत व्यापारी सर हेनरी पॅलेटद्वारे कॅलिफोर्नियाच्या हर्स्टमहलच्या नकाशावर कासा लोमाची निर्मिती झाली.

टेकडीवर स्थित गर्वाने शहराकडे पाहणारा ५ एकर मध्ये वसलेला हा प्रसिद्ध महाल यूरोपियन वैभव दाखवतं. राजेशाही शानशोकत व आधुनिक सुविधानीं सजलेल्या खोल्या, गुप्त गल्ल्या, ८०० फुट भुयार, टॉवर, तबेला, सुंदर बागबगिचे सर्वांचं मनमोहून घेतात.

ओन्टॅरियो प्लेस ९६ एकरमध्ये अत्याधुनिक सांस्कृतिक तसंच मनोरंजनासाठी बनलेलं आंतरराष्ट्रीय जगप्रसिद्ध पार्कलँड आहे. द रश रिव्हर राफ्ट राईड सर्वांसाठी जल, थल मनोरंजनाचं सर्वात मोठं आकर्षण आहे.

कॅनडाचं राष्ट्रीय प्रदर्शन कॅनडियन जे सीएनई नावाने ओळखलं जातं. १३० वर्षापासून १८ दिवसांसाठी मुलं, वृद्ध सर्वांचं मनोरंजन करतं त्याचबरोबर इथे विविध प्रकारच्या शिक्षण संस्थादेखील आहेत. कॅनडा तसंच जगभरातून २ मिलियन पर्यटक इथे येतात. हे जगातील सर्वात मोठं वार्षिक प्रदर्शन स्थळ आहे.

ओन्टॅरियो सरोवराच्या किनारी ३५० एकरमध्ये असलेलं हे ‘एक्स’ आनंदोत्सव मनोरंजन, सवारी, क्रीडा आणि कृषी इत्यादीनी परिपूर्ण आहे. इथे दरवर्षी नोव्हेंबरमध्येदेखील हिवाळा रॉयल कृषी जत्रेचं आयोजन केलं जातं.

जर तुम्ही टोरँटो शहरातील डाऊन टाऊनमध्ये असाल आणि शहरातील झगमगटापासून दूर जाऊन काही क्षण शांततेत घालवायचे असतील तर त्यासाठी ऐतिहासिक डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट एक छान जागा आहे. इथे केवळ पायीच फिरता येतं. इथे सर्वात मोठं विक्टोरियन औद्योगिक वास्तूकला संग्रहालंय आहे, जे कला आणि संस्कृतीला पाठिंबा देण्यासाठी समर्पित आहे. या क्षेत्रातदेखील आरोग्य केंद्र, रेस्टॉरंट आणि पबच्या विविध सुविधा आहेत. इथे दरवर्षी जूनमध्ये ‘ब्ल्यूज फेस्टिवल’देखील भरतो.

रोमांचक वातावरण

उत्तर अमेरिकेत दुसरं सर्वात मोठं चायना टाऊन टोरँटोमध्ये आहे. लोकं इथे विविध प्रकारचे दागिने, कपडे आणि घरगुती वस्तू स्वस्त किंमतीत मिळतात. याशिवाय इथे चविष्ट चायनीज जेवणदेखील मिळतं. चायनीज खाण्याबरोबरच आशियाई खाणंदेखील मिळतं.

रोजर्स सेंटर पूर्वी स्काय डोम नावाने ओळखलं जायचं. हे त्याच्या अनोख्या रिटरेक्टबल छतासाठी प्रसिद्ध आहे. यावरचं छत चांगल्या मोसमात खोललं जातं आणि थंडी वा पावसाळयात बंद केलं जातं. एवढं मोठं छत खोलणं वा बंद करणं चकित करणारं आहे. इथे मोठया प्रमाणात मनोरंजन शो देखील होतात.

कॅनडातील वंडरलँड शहराच्या उत्तर भागात स्थित आहे. हे कॅनडातील सर्वात मोठं थीम पार्क आहे. इथल्या रोमांचक वातावरणात २०० पेक्षा अधिक आकर्षणं आणि ६५ पेक्षा अधिक राईड्स व रोलर कॉस्टर्स आहेत. इथे स्पलाश बरोबरच २० एकरचं वॉटर पार्कदेखील आहे.

रमणीय स्थान

२० कारंजे आणि झगमगीत प्रकाश असणारं यंग डंडस स्ववेयर या भागातील एक अद्वितीय केंद्र्बिंदू आहे. ही जागा एक सार्वजनिक ठिकाणी आहे. जनमेळावे, नाट्य, संगीत इत्यादीसाठी या व्यासपीठाचा वापर केला जातो.

टोरँटो आईसलँड टोरँटो डाउनटाऊन यंग स्ट्रीट पासून फक्त १० मिनिटांच्या होडी प्रवासात ३ आईसलँड आहेत, ज्यामध्ये आयलँड सर्वात प्रसिद्ध आहे.

सेंटर आयलँड खूपच रमणीय स्थान आहे. हे सिटी स्काय लाईनच पॅनोरोमिक दृश्य सादर करतं. सेंटर आयलँड जलतटासहित ६०० एकरच्या पार्कलँडमध्ये आहे. इथे अग्निपीट इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

ब्लॅक क्रिक पायनियर गावाचा प्रवास तुम्हाला १,८०० च्या काळात घेऊन जातो. इथे  जेव्हा तुम्ही ४० योग्य प्रकारे स्थापन केलेली वडिलोपार्जित घरे, दुकाने आणि बगीचामधून जाल तेव्हा तुम्ही इतिहासाबरोबरच बरंच काही शिकाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...