* प्रतिनिधी
मी १८ वर्षीय मुलगी आहे. मी गेल्या ३ वर्षांपासून एका मुलावर प्रेम करते. मी आतापर्यंत त्याला कधी भेटले नाही, पण व्हॉट्सअॅपवर त्याचा चेहरा पाहिला आहे. आम्हा दोघांमध्ये तासन्तास गप्पागोष्टी होतात. अलीकडे काही दिवसांपासून तो मला टाळण्याचा प्रयत्न करतोय. फोन केला, तर कट करतो आणि कधी बिझि असल्याचा बहाणा करून बोलत नाही. त्याने मला खूप वचने दिली होती. मला जाणून घ्यायचं आहे की तो असं का करतोय? मी खूप त्रस्त आहे. कृपया उचित सल्ला द्या? मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या मुलाशी माझं बोलणं फोनवर एकदा राँग नंबर लागून सुरू झालं होतं.
तुम्ही ३ वर्षांपासून एका अनोळखी माणसाशी बोलत होता, ज्याला आपण कधी भेटलाही नाहीत, ही आश्चर्याची गोष्ट आहे. बोलता बोलता दरम्यान आपलं त्याच्यावर प्रेमही बसलं, तेही व्हॉट्सअॅपवर डीपीला लावलेला फोटो पाहून.
तुम्ही सांगितलं की आता तुमचं वय १८ वर्षे आहे. म्हणजे जेव्हा त्या अनोळखी माणसाशी बोलणं सुरू झालं, तेव्हा आपलं वय १६ वर्षांचं असेल.
खरं तर नैसर्गिकरीत्या आपले अपरिपक्व वय होते आणि या वयातील भोळेपणामुळेच आपण फोनवरच मन देऊन बसलात.
आपल्या प्रश्नात आपण हे सांगितलं नाही की त्या मुलाने किंवा आपण कधी भेटण्याबाबत बोलला होतात की नाही? जर मुलाने आपल्याला भेटायचा हट्ट केला असेल आणि काही कारणामुळे आपण त्याला भेटू शकला नसाल, तर शक्यता आहे की त्याने दुसऱ्या कोणाला तरी निवडलं असेल.
तसेही, सोशल मिडिया, उदा. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर चुकीचा नंबर आणि आयडी बनवूनही लोक गैर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.
अशी अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. जेव्हा या माध्यमांचा चुकीचा वापर करून मुलींना फसवण्यात आलं आणि मग मैत्रीच्या बहाण्याने चुकीची कृत्ये केली गेली.
नुकतेच दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्येही एक असेच प्रकरण समोर आले होते, जेव्हा फेक आयडी बनवून कुणी व्यक्तिने अनेकांना मूर्ख बनवलं होतं.
त्यामुळे शक्य आहे की आपला हा मित्र फेक आयडी अथवा नंबरने आपल्याशी बोलत असेल आणि आपला फायदा उठवण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित, तो लग्न झालेलाही असेल, जो आपल्याकडून त्याच्या अयोग्य इच्छा पूर्ण न झाल्याने अन्य शिकारीच्या शोधात असेल.
त्यामुळे हे प्रेम या वयातील चूक समजून विसरून जाणे उत्तम ठरेल आणि सध्यातरी आपल्या करियरकडे लक्ष द्या. योग्य आणि उचित वेळी आपल्याला योग्य जोडीदार जरूर मिळेल.
मी २५ वर्षीय विवाहिता आहे आणि ३ वर्षीय मुलाची आईही आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. परंतु लग्नाला ४ वर्षे होऊनही त्यांची रोज सहवास करण्याची इच्छा असते. पतिची इच्छा असते की सहवासापूर्वी मी मुखमैथुनात सहकार्य करावे, पण भीती वाटते की त्यामुळे मला कुठला लैंगिक रोग तर होणार नाही ना. मी नकार दिल्यास ते माझ्यावर नाराज होतात. मला जाणून घ्यायचं आहे की मुखमैथुन किती सुरक्षित आहे? ही एक असामान्य प्रक्रिया आहे का?
जसं की आपण सांगितलं आहे की पतिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि सुखी दाम्पत्य जीवनाची निशाणीही आहे.
सेक्स संबंधाच्या वेळी मुखमैथुन म्हणजेच ओरल सेक्स एक सामन्य प्रक्रिया आहे, जी समागमापूर्वी फोरप्लेमध्ये रोमांच आणण्यासाठी, त्याला आनंददायक बनवण्यासाठी केली जाते. अर्थात, हायजिन म्हणजेच स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे.
‘कामसूत्र’मध्येही या मजेदार क्रीडेचं वर्णन केले जाते आणि अजिंठा-वेरूळ गुंफेतील मूर्तींमध्येही या क्रीडेचे मोकळेपणाने चित्रण केले गेले आहे. म्हणजेच मुखमैथुनाचे वेड प्राचीन काळापासूनच राहिले आहे.
जर तुम्ही आणि तुमचे पती शारीरिक स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेत असाल, तर मुखमैथुनापासून कोणतेही नुकसान नाही. पतीसोबत सेक्ससंबंधांचा मनमुराद आनंद घ्या जेणेकरून परस्पर प्रेम कायम राहिल.
मी १९ वर्षीय तरुणी आहे आणि पीजीमध्ये राहते. मला रात्री पॉर्न म्हणजेच ब्लू फिल्म पाहण्याचे व्यसन लागले आहे. रोज रात्री मोबाइलवर पॉर्न व्हिडिओ किंवा फिल्म पाहिली नाही, तर मला बेचैनी होऊ लागते. मला या सवयीपासून सुटका करून घ्यायची आहे. कृपया उचित सल्ला द्या?
आपण मॅच्युअर आहात. आतापासून असं व्यसन लागलं तर आपण आपल्या करियरपासून दूर होऊ शकता. आपण आपलं लक्ष चांगलं साहित्य, मासिके वाचण्यावर केंद्रित करा. काही दिवसांतच आपल्याला जाणवेल की चांगले साहित्य व मासिके वाचल्यामुळे केवळ आपलं ज्ञानच वाढणार नाही, तर आपल्याला आनंदही मिळेल.
रात्री झोपण्यापूर्वी मासिके किंवा जेही चांगले वाटेल, ते वाचण्याची सवय लावून घ्या.