* डॉक्टर, सुदीप सिंग सचदेव, नेफ्रोलॉजिस्ट, नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, गुरुग्राम
प्रश्न : मी २२ वर्षांची आहे. काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मला भीती वाटत होती की मला कोरोना तर झाला नसेल, पण तपासणीत माझ्या किडनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनात आले. मला योगा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु मला हे जाणून घ्यायचे आहे की ही समस्या आहाराद्वारे दूर केली जाऊ शकते का?
उत्तर : तुम्ही ज्या समस्येचा उल्लेख करत आहात त्याला हायपरफॉस्फेटमिया म्हणतात. हे फॉस्फरसच्या अतिसेवनामुळे होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी योगासोबतच आहारात बदल केल्यास फॉस्फेटचे प्रमाणही कमी करता येते.
सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट, प्रक्रिया केलेले मांस, प्रक्रिया केलेले चीज, जंक फूड, आईस्क्रीम इत्यादींचे सेवन कमीत कमी करावे. याशिवाय बीन्स, ब्रोकोली, कॉर्न, मशरूम, भोपळा, पालक आणि रताळे इत्यादींचे सेवनदेखील कमी करावे. अगदी मांस, मासे, कॉटेज चीज, मोझरेला चीज इत्यादींचे सेवन महिन्यातून एकदाच करावे.
प्रश्न : मी २६ वर्षांची आहे. बरेच दिवस माझे पोट खालच्या भागात कधीही दुखू लागते. कधीकधी ही वेदना सौम्य असते तर कधी तीक्ष्ण असते. यासोबतच मला रात्री वारंवार लघवी होऊ लागली आहे, त्यामुळे मला जळजळ होण्याची समस्या होते. मला सांगा हे का होत आहे आणि त्यावर उपाय काय आहे?
उत्तर : तुम्ही सांगितलेली लक्षणे मूत्रपिंडाचा आजार दर्शवतात. सुरुवातीला या आजाराची काही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, परंतु तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून असे दिसते की हा त्रास किरकोळ नाही. तथापि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. सर्व प्रथम आपण हे नेफ्रोलॉजिस्टकडून तपासले पाहिजे. जितक्या लवकर समस्येचे निदान होईल तितके चांगले, कारण निदान आणि उपचारात उशीर केल्याने केवळ तुमचा जीवच धोक्यात येऊ शकत नाही, तर तुम्हाला इतर अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो. सर्वात धोकादायक परिणामांपैकी किडनी रोगाची शेवटची पायरी, अशक्तपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या संबंधित रोगांची ओळख आहे.