* प्रतिनिधी
जर तुम्ही मुगाची डाळ केवळ आजारी पडल्यावरच खात असाल तर मुगाचे हे फायदे समजल्यावर मुगाला दैनंदिन आहारातील एक घटक बनविणे तुम्हाला भाग पडेल :
* मूग डाळीत फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लोह आणि इतर बऱ्याच जीवनसत्त्वांसह झिंकही असते, जे पचनक्रिया नीट पार पाडण्यासह रोग प्रतिकारशक्तीही वाढवते. मोड आलेले मूग खाणे अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यात कमी कॅलरीज आणि फ्री अमिनो अॅसिड तसेच अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात.
* मोड आलेल्या मुगात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्याच्या नियमित सेवनामुळे मधुमेह, हृदयविकार आणि काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो..
* यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाणही खूप जास्त असते. काही संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की, मूग असलेल्या पदार्थांचे सेवन हे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
* मूग डाळीत पेक्टिन नावाचे सोल्युबल फायबर असते, जे पचन क्रिया निरोगी ठेवते तसेच वजन नियंत्रित ठेवते. याचे नियमित सेवन आतडयांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढविण्याचेही काम करते.
* यात लोहाचाही समावेश असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार गर्भधारणेदरम्यान मुगाचे सेवन नक्की करा.