* किरण अहुजा

काव्या आयटी कंपनीत काम करते. वय वर्षे २८. अविवाहित आहे. लॉकडाऊन नंतर कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरू केलं. सुरुवातीला जी परीस्थिती होती ती पाहता असं वाटलं की २-३ महिन्यात पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू होईल, परंतु करोना वाढतच गेला आणि परिस्थिती सामान्य होण्याऐवजी अधिकच अवघड होत गेली. काव्याच्या कंपनीने सर्वांनाच वर्षाच्या शेवटपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला.

सुरुवातीला घरी रहात असली तरी अॅक्टिव्ह होती. सकाळी ६ वाजता उठायची. वॉकसाठी जायची. वॉकसाठी जाता आलं नाही तर ती घरच्या घरी अर्धा तास व्यायाम करायची. खाण्यापिण्याकडे तिचं व्यवस्थित लक्ष होतं. मात्र जसजसा काळ सरकत गेला तसा घरच्या घरी राहून देखील काव्याने आळशीपणा करायला सुरुवात केली. ऑफिसला जायचं नसल्यामुळे ती उशिरा सकाळी ८-९ वाजेपर्यंतदेखील झोपून राहायची. वॉकला जाणं बंद झालं, कारण दहा वाजेपर्यंत तिला ऑफिस कॉलवर लॅपटॉप समोर बसावं लागायचं. तेलकट आणि अन् हेल्दी खाण्याची तिला जास्तच चटक लागली होती. वेळेचं तसं काही बंधन नसल्यामुळे वेळीअवेळी ती खात राहायची.

पूर्वी ती ९ वाजता रात्रीचे जेवण जेवून अकरा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत झोपी जायची, परंतु आता रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली नसायची. रात्री उशीरापर्यंत ती वेब सिरीज पाहून स्वत:ची झोप खराब करायची आणि मग सकाळी उशिरा उठायची.

आता मात्र अनेकदा तिचं पोट खराब राहू लागलं होतं. काही दिवसापासून तिला वाटू लागलं होतं की एखादं मेहनतीचं काम करताना तिला अधिक थकायला व्हायचं.

एका रात्री जेव्हा ती झोपायला गेली, तेव्हा अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं आणि मग हळूहळू वाढत गेलं. कशीबशी तिने रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरला दाखवलं. तपासणी केल्यानंतर कळलं की तिला अपेन्डिस झालंय. आजार तसा प्राथमिक स्तरावर होता, म्हणून सर्जरीनंतर काव्या लवकरच बरी झाली.

परंतु हे सगळं कशामुळे झालं? काव्याने विचारल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तिला हा आजार झाला होता. काव्या तिचं खाणं-पिणं आणि आरोग्याच्या बाबतीत खूपच निष्काळजी झाली होती. काही आजार होतात, परंतु काही आजारांना आपण

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...