* गरिमा पंकज
लग्नानंतर सृष्टीची पहिलीच दिवाळी होती. तिचे सासूसासरे आणि दिर जाऊ जवळच दुसऱ्या फ्लाटमध्ये राहत असत. सृष्टीचे पती मनीष यांना कंपनीतर्फे वेगळा फ्लॅट मिळाला होता. त्यात दोघे पतिपत्नी एकटे राहत असत. सृष्टीही नोकरी करत असल्याने घराला दिवसभर कुलुप असे.
ऑफिसमध्ये दिवाळीची सुट्टी एकच दिवस होती पण सृष्टीने २ दिवस सुट्टी घेतली होती. तिला तिची दिवाळी अविस्मरणीय बनवायची होती. दिवाळीच्या दिवशी मनीषला महत्त्वाच्या मिटींगसाठी बाहेर जावे लागले. मिटींग लांबली. परतताना सायंकाळ झाली. मनीषने सृष्टीला फोन केला तर तिने उचलला नाही. घरी परतताना मनीष विचार करत होता की आज नक्कीच सृष्टी त्याला टोमणे देईल किंवा मग निराश तरी झालेली असेल.
गोधंळाच्या मन:स्थितित त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला, पण आत अंधार होता. तो क्षणात एकदम घाबरला आणि जोरात ओरडला, ‘‘सृष्टी, कुठे आहेस गं, आय एम सॉरी.’’
तितक्यात अचानक सृष्टी आली आणि त्याला बिलगून हळूच म्हणाली, ‘‘आय लव यू डिअर, हॅप्पी हॅप्पी दिवाली.’’
तितक्यात दोघांवरही फुलांची बरसात होऊ लागली. पूर्ण खोलीत रंगबेरंगी मेणबत्ती जळू लागल्या आणि मनमोहक संगुधाने वातावरण भरून गेले. समोर खूपच आकर्षक आणि सांजश्रृंगार केलेली सृष्टी उभी राहून हसत होती. मनीषने पटकन् तिला उचलून कवेत घेतले. सर्व घर व्यवस्थित सजवलेले होते. टेबलावर खूप मिठाया आणि फायरक्रॅकर्स ठेवले होते. सृष्टी हळूच हसत होती.
दोघांनी १-२ तास आतषबाजीची मजा लुटली. तोपर्यंत मनीषचे आईवडिल, भाऊवहिनी आणि त्यांची मुलेही आली. सृष्टीने सर्वांना आधीच आमंत्रित केले होते. पूर्ण कुटुंबाने एकत्रित दिवाळी साजरी केली. मनीष आणि सृष्टीसाठी ही दिवाळी आयुष्यभारासाठी संस्मरणीय ठरली होती.
मनंही प्रकाशाने उजळू दे
याला म्हणतात दिवाळीचा आनंद ज्यामुळे घरासोबतच मनंही उजळून निघतात. लग्नानंतरच्या दिवाळीचं विशेष महत्त्व असते. जर हा दिवस भांडणं, वादावादी किंवा तणावात घालवलात तर समजा तुम्ही मौल्यवान क्षण वाया घालवले. आयुष्य आनंद साजरे करण्याचेच नाव आहे, तर मग दिवाळीसारख्या विविधरंगी आणि प्रकाशाच्या क्षणाने आपले तनमन का बरे उजळू नये?
लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी पहिली दिवाळी साजरी करते तेव्हा तिला होम सिकनेस आणि तिच्या घरच्यांची कमतरता जाणवते. असे होणे स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असा नाही की दिवाळीसारखा क्षण वाया घालवावा. त्यापेक्षा नवे वातावरण, नवी माणसे यांच्यासोबत प्रेमाने दिवाळी साजरी करावी. ती ही इतकी आनंदात की येणारा काळही नवीन आनंदाने उजळून निघेल.
सासूसासऱ्यांसोबत खरेदी करावी
हे प्रसंग अविस्मरणीय बनवायचे असतील तर तुमची सासू किंवा नणंदेसोबत खरेदी करावी. सर्व कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी कराव्यात. कोणासाठी काय खरेदी करायचे याची यादी बनवावी. याकामी सासूची मदत घेऊ शकता. तुम्हांला सर्वांची आवडनिवड सांगू शकतात. सर्व भेटवस्तू आकर्षकपणे रॅप कराव्यात आणि सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. भेटवस्तूशिवाय मिठाया, चॉकलेट्स, फायरक्रॅकर्स आणि सजावटीच्या शोभेच्या सामानाचीही खरेदी करावी.
उजळू द्या घरातील कोपरा न् कोपरा
दिवाळी प्रकाशाचा सण आहे. म्हणून पूर्ण घर दिवे मेणबत्त्या आणि इतर डिझायनर बल्बने सजवावे. लाइट अॅरेजमेंट अशी करावी की तुमचे घर वेगळेच झगमगताना दिसेल.
घरी बनवा मिठाई
ही एक जुनी व अगदी समर्पक अशी म्हण आहे की कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचायचे असेल तर तो मार्ग त्यांच्या पोटातून जातो. लग्नानंतर तुमच्या सासरच्या मंडळींच्या व पतीच्या हृदयापर्यंत याच मार्गाने जाऊ शकाल. यासाठी तुम्हाला पाककुशल व्हावे लागेल. चविष्ट सणाचे जेवण आणि रूचकर मिठाया बनवाव्या लागतील. जास्त माहिती नसेल तर आई किंवा सासूकडून माहिती घ्यायला घाबरू नका. मासिकांमध्येही अनेक प्रकारच्या रेसिपी प्रकाशित होत असतात.
दिवाळी पार्टी
तुमची पहिली दिवाळी अविस्मरणीय बनवण्यासाठी आजूबाजूचे लोक व नातेवाईंकांना समजून घेण्याची आणि नाती जपण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. घरात दिवाळी पार्टीचे आयोजन करा आणि लोकांना बोलावून धमाल मजामस्ती करा.
विभक्त कुटुंब
जर तुम्ही लग्नानंतर काही कारणास्तव सासरच्यांपासून वेगळे राहत असाल तर तुमची आव्हाने काही वेगळी असतील. तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवे की तुम्हाला ज्याप्रमाणे होमसिकेनस जाणवतो, त्याप्रमाणे तुमच्या पतिलाही जाणवत असणार. अशात तुम्ही तुमच्या पतिला विशेष महत्त्व द्या आणि त्यांच्यासाठी विशेष सरप्राइज तयार करा.
या संदर्भात तुम्ही तुमच्या आईला विचारू शकता की तिने काय विशेष केले होते. दिवाळी साजरी करताना तुमच्या सासूला फोन करून सांगा की तुम्ही काय सरप्राईज तयार केले आहे. त्यांना सांगा की तुमच्यापेक्षा त्या पतिला अधिकिने ओळखतात. म्हणून त्यांनी तुमची मदत करावी. तुमच्या सासूला हे जाणून आनंद होईल की तुम्ही त्यांच्या मुलाच्या जीवनात त्यांचे विशेष स्थान असण्याला दुजोरा देत आहात. महत्त्व देत आहात. त्या तुमची मदत करतील. आंनदी होतील.
आपल्या पतिसाठी काही विशेष भेटवस्तू खरेदी करा. एखादे गॅद्ब्रोट किंवा नवा डे्स किंवा तुमच्या बजेटनुसार अन्य काही खरेदी करा. त्यांच्या आवडीच्या मिठाया, आवडते पदार्थ बनवा. त्यांच्यासाठी छान शृंगार करा. रात्री घराचा कोपरा न् रोपरा उजळून टाका.
हल्लीच्या काळात स्काईप व फेसबुकच्या माध्यमातून हा खास क्षण तुम्ही संस्मरणीय बनवू शकता व हे क्षण इतरांशी शेअरही करू शकता.