* मोनिका अग्रवाल

लग्न झाल्यापासून नेहा पती रॉकीला इतर कुणासोबत कुठेही जाऊ देत नसे. रॉकीने कुणाशीही बोललेले तिला आवडत नसे. ती नाराज होत असे. माझ्यावर संशय का घेतेस, असे रॉकीने विचारल्यावर माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे ती हळवी होऊन सांगत असे.

काही कालावधी लोटल्यानंतर तर अशी परिस्थिती निर्माण झाली की नेहा रोज दर दहा मिनिटांनी रॉकीच्या ऑफिसमध्ये फोन करून तो काय करतोय याची विचारपूस करू लागली. कधी घरी येताना माझ्यासाठी माझ्या आवडीचे काहीतरी खरेदी करून आण, असे सांगू लागली. मात्र जेव्हा तो तिच्यासाठी काहीतरी खरेदी करून आणत असे तेव्हा तुझ्यासोबत खरेदीसाठी कोण गेली होती, असे ती संशयाने विचारत असे. काही दिवसांनंतर तर ती सर्व काम सोडून रॉकी काय करतोय, कुठे जातोय, याच्यावरच बारकाईने लक्ष ठेवू लागली. तिच्या अशा संशयी वृत्तीमुळे रॉकीसोबतच त्याचे कुटुंबही त्रासून गेले.

रॉकीचे कामातील लक्ष उडाले. त्याने चांगला जम बसवलेल्या व्यवसायालाही याची आर्थिक झळ बसली. तो आपल्या मित्र परिवारापासून दूर होत गेला होता. नेहाच्या अशा संशयी वागण्यामुळे रॉकी घराबोहर जाऊन नातेवाईकांनाही भेटू शकत नव्हता. संशय आणि होणारे वाद यामुळे दोन कुटुंबातील प्रेमळ नात्याची वीण उसवत गेली. रॉकीने नेहाला सोडून दिले. हे कसले प्रेम जे नेहाच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे संशयाच्या अग्निकुंडात स्वाहा झाले आणि जन्मोजन्मासाठी बांधलेली लग्नगाठ कायमची सुटली.

नव्या नात्यातील गुंता

संशोधनानुसार जेव्हा दोन जीव एकत्र येऊन नव्या नात्याची सुरुवात करतात, तेव्हा प्रारंभी एकमेकांना समजून घेण्यात त्यांना बरीच कसरत करावी लागते. यात अपयश आले तर भविष्यात घटस्फोटाची शक्यता निर्माण होते. मात्र, अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वाढत्या वयात घटस्फोट घेणे मनाला पटत नाही.

मनमिळावू स्वभावाचा राघव हा एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली, तेव्हा मंजिरी त्याला तितकीशी आवडली नव्हती. मात्र घरच्यांच्या आनंदासाठी त्याने लग्नाला होकार दिला. घरच्यांनी त्याच्यासाठी देखणी, कुटुंबवत्सल मुलगी पसंत केली होती जेणेकरून ती राघवच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याला प्रेमळ साथ देईल.

मंजिरीला इतरांशी बोलायला आवडत असे. मात्र राघवने इतर कुणाला भेटलेले, बोललेले तिला खटकत असे. राघव हसला तर एवढया मोठयाने का हसतोस, असे विचारायची. त्याची सहज एखाद्या मुलीशी नजरानजर झाली तरी त्या मुलीला पाहून तू लाळ का घोटतोस, असे विचारायची.

राघव मित्रांसोबत गेला की थोडयाच वेळात मंजिरी त्याला फोन करायची. की गप्पा मारून आणि चहाचे घोट घेऊन समाधान झाले नाही, म्हणून अजून घरी आला नाहीस का?

राघव घरी आल्यानंतर ती त्याच्याशी भांडायची. या रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर राघवने मित्र, नातेवाईकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे सोडून दिले. घरून कामावर जायचा आणि आल्यावर खोलीत डांबून घ्यायचा. मंजिरी तासन्तास टीव्ही पाहण्यात मग्न असायची. हळूहळू राघव दारूच्या आहारी गेला. पण तरीही मंजिरी त्याला साथ द्यायची सोडून त्याला सुनवायची की तू नाटक करतोस. मित्रांना भेटण्यासाठी बहाणा बनवतोस.

एके दिवशी तर हद्दच झाली. कुटुंबातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. तेव्हा मंजिरी घरात हिट मारू लागली. हे पाहताच राघव ओरडला आणि म्हणाला काय मूर्ख बाई आहे, सर्वांचा जीव घेणार आहेस का? तिच्यावर मात्र त्याच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही.

राघवने मंजिरीचा स्वभाव बदलण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी काहीच पर्याय न उरल्याने तिच्याशी बोलणे बंद केले. त्याला आता तिच्यासोबत संसार करायचा नव्हता. पण समाज काय म्हणेल? मूल झाल्यावर सर्व ठीक होईल, अशी दरवेळेस आईवडील त्याची समजूत काढत असत.

दिवस कसेबसे जात होते. पाहता पाहता लग्नालाही बरीच वर्षे झाली. मुले झाली. मात्र कालौघात परिस्थिती अधिकच बिघडली. स्वत:चा स्वभाव बदलण्याचा किंवा कुटुंबाचे मन जिंकण्याचा प्रयत्न मंजिरीने कधीच केला नाही. ती कधी सासूला दोष द्यायची तर कधी सासऱ्यांना शिव्या घालायची. एवढेच नव्हे तर मुलांनाही मारायची. एखाद्या नातेवाईक महिलेने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर राघवसोबत तिचे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत तिच्याच चारिर्त्यावर संशय घ्यायची.

परिस्थिती हळूहळू इतकी चिघळली की यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसेनासा झाला. मंजिरीच्या माहेरचेही तिला समजावण्याऐवजी तिच्या सासरच्या मंडळींनाच दोष देत. हार मानून मुलींच्यी आणि बहिणींच्या सल्ल्याने राघव मंजिरीला कायमचे तिच्या माहेरी सोडून आला. आता दोघेही न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

कुटुंब न्यायालयात समुपदेशकाने त्यांच्या मुलींना (यातील एकीचे लग्न झाले आहे) जेव्हा तुम्हाला नेमके काय वाटते, असे विचारले त्यावेळी आईने कधीच घरी परत येऊ नये. तिने वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ती गेल्यापासून घरात शांतता आहे, असे त्यांनी सांगितले.

आता या परिस्थितीचे कारण काय? एका सर्वेक्षणातील अहवालात यासंदर्भात आश्चर्यचकीत करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. घटस्फोट घेण्यामागील एक कारण म्हणजे लहरी, सनकी स्वभाव. मग ती गरजेपेक्षा अति प्रेमाची सनक असो किंवा अति रागाची, ती वाईटच. प्रत्यक्षात जोडीदारापैकी एक जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतो त्यावेळी त्याच्याकडूनही त्याला त्याच निखळ प्रेमाची अपेक्षा असते. हे प्रेम त्याला मिळाले नाही तर मात्र नाते अडचणीत येते. अहवालानुसार अशी स्थिती दोघांसाठीही घातक असते. कारण आपल्यात काहीच कमतरता नाही, आपला जोडीदारच आपल्याशी जुळवून घेत नाही असे एकाला वाटत असते तर, आपण लग्न करून उगाचच फसलो असे दुसऱ्याला वाटत असते. अशावेळी दोघेही काहीतरी नव्याचा शोध घेऊ लागतात.

वय झाल्यानंतर घटस्फोट कशासाठी?

प्रसिद्ध लेखक कोएलो यांचे असे म्हणणे आहे की जर निरोप घेण्याचे धाडस नसेल तर जीवन आपली झोळी संधींनी भरूनही ते आपल्याला कधीच आनंदी ठेवू शकत नाही. त्यांचे हे म्हणणे घटस्फोटितांना तंतोतंत लागू होते.

भारतासारख्या देशात गेल्या १२ वर्षांत घटस्फोटांचेप्रमाण दुपटीने वाढले आहे. अखेरीस परिपक्व किंवा उतार वयात घटस्फोट घेण्याचे नेमके कारण काय?

लेखक जेनिफरचं म्हणणं आहे, ‘घटस्फोटाचा अर्थ म्हणजे जीवनाचा अंत नाही. वैवाहिक जीवन जगताना सतत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा वैवाहिक जीवन जगण्याला काय अर्थ आहे? घटस्फोट घेतला म्हणून कोणाचे जीवन संपत नाही. आरोग्य तर तेव्हा बिघडते जेव्हा आपण अपयशी वैवाहिक जीवन नाईलाजाने जगत असतो.’

२५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाच्या दिशेने

संसारातील २५ वर्षांनंतर जोडीदाराशी विभक्त झाल्यावर कोणतीही जबाबदारी सतावत नाही. लग्न करून त्यांच्या मुलांनी संसार थाटलेला असतो. आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याची त्यांची वेळ त्यांची असते. जोडीदाराची कटकट नसते. प्रत्येक क्षण निश्चिंतपणे जगता येतो आणि याच क्षणांची प्रदीर्घ काळ वाट पाहणारे उतार वयातही कुठलाही संकोच न बाळगता घटस्फोट घेतात.

कुटुंब न्यायालयाचे समुपदेशक सिन्हांचं म्हणणं आहे की नातेसंबंधात कटूता निर्माण झाली आणि नाते चिघळू लागले की अशावेळी विलग होणे अधिक योग्य ठरते. त्यांच्या मते त्यांचा एक मित्र आणि त्याची दोन मुलं आहेत. मात्र पतीपत्नी विलग राहत असूनही कोणतेही वादंग न करता मुलांचं पालनपोषण उत्तमरित्या करत आहेत. मुलंही खुश आहेत.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...