* पूनम अहमद

तुम्ही आतापर्यंत सेक्शुआलिटी संबंधी अनेक शब्द ऐकले असतील जसे बायसेक्शुअल, पॅनसेक्शुअल, पॉलिसेक्शुअल, असेक्शुअल, सेपोसेक्शुअल आणि इतर अनेक शब्द. पण आता सेक्शुआलिटी संबंधी एक नवा शब्द नव्या रूपात समोर आला आहे, तो म्हणजे डेमीसेक्शुअल. असे लोक जे असेक्शुआलिटीच्या सीमारेषेवर असू शकतात, पण पूर्णत: अलैंगिक नाही. जर तुम्ही कोणाकडे सेक्शुअली आकर्षित होण्यापूर्वी चांगले मित्र बनू इच्छिता तर तुम्ही निश्चितपणे डेमीसेक्शुअल आहात.

सेक्शुआलिटीची ओळख

तुम्ही डेमीसेक्शुअल आहात की नाही हे अनेक प्रकारांनी ओळखता येते. सर्वात मुख्य म्हणजे, जोपर्यंत तुम्ही कोणाशी भावनात्मक पातळीवर एकरूप होत नाही तुम्हाला सेक्शुअल फिलिंग्स जाणवत नाहीत. तुमच्यासाठी भावना महत्त्वाच्या आहेत.

तुम्ही सेक्शुअल व्यक्ती नाही यात काही वाईट मुळीच नाही. सेक्सच्या मागे लागण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष, वास्तविक बातचीत करणे अधिक रुचते. जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहात आणि त्याच्याशी इमोशनली जोडले गेले आहात तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे सेक्शुअली आकर्षित होता.

ज्याला तुम्ही पसंत करता त्याला भेटल्यावर तुम्ही त्याच्या लुक्सवर प्रभावित न होता त्याच्या व्यक्तित्वावर प्रभावित होता. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीआधी तुमची त्याच्याशी मैत्री होईल. तुम्हाला कोणालाही भेटल्यावर सेक्शुअल होणे किंवा फ्लर्टींग करणे पसंत नसते. जर एखाद्या व्यक्तिने आपल्या व्यक्तित्वाने तुम्हाला प्रभावित केले असेल तर तुम्ही प्रथम मैत्रीचा हात पुढे कराल. काही तास, आठवडे, महिन्यातच डेटिंग करायचा विचारही तुम्ही करू शकत नाही.

आकर्षणाचे प्रकार

आकर्षण २ प्रकारचे असते - प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी आकर्षणात तुम्ही एखाद्याच्या लुक्सवर प्रभावित होता आणि सेकंडरी आकर्षणात तुम्ही एखाद्याच्या व्यक्तित्वावर प्रभावित होता. जर तुम्ही डेमीसेक्शुअल असाल तर निश्चितच तुम्ही सेंकडरी पर्सनॅलिटी टाइपमध्ये फिट बसता. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला कोणाचे आकर्षणच वाटत नाही.

जेव्हा तुमच्या मनात कोणाविषयीतरी फिलिंग्स निर्माण होत असतील, खासकरून सेक्शुअल फिलिंग्स, तेव्हा तुम्ही द्विधा मन:स्थितीत सापडता, कारण तुम्ही तितके सेक्शुअल नसता. तुम्हाला समजत नाही की या फिलिंग्सवर कसे रिअक्ट व्हावे किंवा त्या व्यक्तिशी कशाप्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित करावे. एकदा का तुम्ही भीती आणि द्विधा मन:स्थितीतून बाहेर पडलात की तुम्ही फक्त आपल्या जोडीदारासोबतच सेक्स करण्याची इच्छा बाळगाल आणखी कुणासोबतही नाही. तुम्ही फार भावुक असल्याने मनमोकळया सेक्ससाठी त्या व्यक्तिला सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, यामुळे तुम्हा दोघांसाठी सेक्स खूप कंफर्टेबल होईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...