* इशिका तनेजा एअर ब्रश मेकअप एक्सपर्ट
- मागील कित्येक वर्षांपासून सतत नेलपेण्ट लावल्यामुळे माझ्या नखांवर पिवळेपणा आला आहे. नखं कमकुवत व तुटल्यासारखे दिसतात. कृपया यासाठी काय करावे लागेल ते सांगा?
नखे पिवळी दिसणं हे फक्त आरोग्यासाठी वाईट नाही तर ते दिसायलाही वाईट दिसते. ही समस्या सोडवण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवून नखांवर लावा व टूथब्रशने सॉफ्ट स्क्रब करा. नखांना अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये भिजवणे हासुद्धा उत्तम पर्याय आहे.
केसांसाठी योग्य शाम्पू कसा निवडावा?
हल्ली कंपन्या तऱ्हेतऱ्हेचे शाम्पू बनवत आहेत. शाम्पू निवडण्यासाठी तुमचे केस कशाप्रकारचे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. केस धुतल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात दुसऱ्याच दिवशी व थंडीच्या मोसमात दोन दिवसांनंतर चिकट होऊ लागले आणि धुण्याची गरज वाटत असेल तर तुमचे केस ऑयली आहेत.
जर उन्हाळी दिवसांत २ दिवसांनंतर आणि थंडीच्या दिवसांत ३ दिवसांनंतर धुण्याची गरज वाटली तर तुमचे केस सामान्य आहेत. जर उन्हाळी दिवसांत ३ दिवसांपर्यंत आणि थंडीच्या दिवसांत ४ दिवसांपर्यंत केस धुण्याची गरज पडली नाही तर तुमचे केस कोरडे आहेत.
शुष्क केसांसाठी नेहमी मिल्की म्हणजे कंडीशनर युक्त शॉम्पू वापरा. खूप शुष्क व द्विमुखी केसांना क्रिमी शाम्पूबरोबर एक्स्ट्रा कंडिशनरचा पण वापर करा. ऑयली केसांना जास्त करून डीप क्लीन शाम्पूचा वापर योग्य असतो.
- मी वॉर्म आणि कूल टोनबद्दल खूप वाचले आहे. कसे समजून घेऊ की माझा टोन वॉर्म आहे की कूल? घरी स्वत:च हे जाणून घेणे शक्य आहे का? त्याची काही पद्धत आहे का?
आपली नॅचुरल स्कीनटोन ४ रंगांमध्ये असते. यलो, पिंक, ऑलिव्ह किंवा पीच कलर. यामध्ये २ टोन वॉर्म व २ टोन कूल असतात. भारतीय त्वचा साधारणत: वॉर्म टोनमध्ये असते.
आपली स्कीनटोन वॉर्म आहे की कूल हे आपण घरीसुद्धा माहीत करून घेऊ शकतो. यासाठी उन्हात जाऊन आपले केस वर बांधावेत. मग स्वत:वर गोल्डन किंवा सिल्व्हर कापड ठेवून पाहा. असे केल्याने जर तुम्हाला गोल्ड कलर शोभून दिसत असेल तर तुमची स्कीन टोन वॉर्म आहे. सिल्व्हर कलर सूट होत असेल तर स्कीनटोन कूल आहे.
हिना डाय बनवण्याची चांगली पद्धत सांगा?
हिना एक नैसर्गिक डाय आहे. जिच्या योग्य आणि सततच्या वापराने केसांना उत्तम रंग मिळतो. रात्री २ चमचे चहा पावडर, २ ग्लास पाण्यात घालून उकळून घ्या.
पाणी अर्धे राहील तेव्हा गाळून घ्या. लोखंडी कढईत २ कप मेंदी, अर्धा कर आवळा पावडर, अर्धा कप शिकेकाई पावडर, २ चमचे कॉफी पावडर व अर्धा चमचा कात घालून चहा पावडरच्या पाण्याने पेस्ट बनवून घ्या. सकाळी यात अंडे व मध घालून व्यवस्थित मिसळून घ्या व केसांना लावा. २-३ तासानंतर केस धुऊन घ्या. मग सुकल्यावर केसांना तेल लावा. दुसऱ्यादिवशी शाम्पू लावा. केसांना सुंदर रंग येईल व केस चमकदार होतील.
- मी १८ वर्षांची आहे. माझ्या शरीरावर अनेत ठिकाणी पांढरे डाग आहेत. मला कायमस्वरूपी पद्धतींबद्दल माहिती हवी आहे व हे कुठे करता येऊ शकते? खर्च किती येईल याबद्दलही सांगा?
सफेद डाग लपवण्यासाठी परमनंट कलरिंग पद्धती उपलब्ध आहे. ही फायदेशीर आहे. यामध्ये सर्वात आधी एखादा पांढरा डाग निवडून त्यावर टेस्ट केली जाते. जर त्वचेच्या रंगाने तो रंग स्विकारला तर २-३ महिन्यांनी त्वचेशी मिळता जुळता रंग त्वचेच्या डर्मिस लेयरपर्यंत पोहोचवला जातो. ज्यामुळे डाग दिसत नाहीत.
परमनंट कलरिंगचा परिणाम २ चे १५ वर्षांपर्यंत राहू शकतो. ही सुविधा तुम्हाला प्रसिद्ध कॉस्मेटिक क्लीनिकमध्ये मिळू शकते. याचा खर्च ५ हजार रुपयांपासून सुरू होतो. जो प्रत्येकी इंच स्वेअरच्या हिशेबाने असतो.
- माझी त्वचा खूपच काळवंडली आहे. मुलतानी मातीनेही फायदा होत नाही. काय करू?
तुम्ही एखाद्या कॉस्मेटिक क्लीनिकमधून प्रूट बायोपील करवून घेऊ शकता. या फेशिअलमध्ये इतर फळांव्यतिरिक्त पपईच्या एंजाइम्सचा पण वापर केला जातो. जो स्कीन कलर लाईट करतो. या फेशिअलमुळे टॅनिंग तर दूर होतेच. पण त्वचेची खोलवर स्वच्छता होते. बरोबरीनेच उन्हात बाहेर पडताना चेहरा, हात, पाय, पाठ व इतर उघड्या भागांवर सनस्क्रीन जरूर लावा.
घरी टॅन रिमूव्ह करण्यासाठी चोकरमध्ये दही, थोडा अननसाचा रस आणि थोडी साखर मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि उजळ राहते.