– डॉ. पीएन गुप्ता, चीफ नॅफ्रोलॉजी, पारस हॉस्पिटल, गुरुग्राम

डोळा हा शरीरातील सर्वात नाजूक हिस्सा असतो. त्यांचे आरोग्य हे आपली लाइफस्टाइल आणि आरोग्यावर अवलंबून असते. क्रॉनिक किडणी डिसीज, हायपरटेंशन, डायबिटीस यासारख्या अनेक आजारांचा संबंध आपल्या दृष्टीशी असतो.

किडणीचे आजार आणि डोळे

किडणी फेल्युअरमुळे दृष्टी धूसर होऊ शकते. असे झाल्यास डोळयांच्या डॉक्टरना दाखवून औषधे घेतली पाहिजेत आणि चष्मा लावण्याविषयी विचारले पाहिजे.

जर किडणीच्या आजाराचा इलाज केला गेला नाही तर पूर्ण अंधत्वही येऊ शकते. जरी हे किडणीच्या आजाराच्या लास्ट स्टेजला होत असले तरी या प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून आधीच खबरदारी घेतली पाहिजे.

किडणीच्या आजाराची लक्षणे

किडणीचे आजार काही एकाएकी उत्पन्न होत नाहीत. दीर्घकालीन चुकीच्या लाइफस्टाइलचा हा परिणाम असतो. किडणीच्या आजारांपासून बचाव करण्याची उत्तम पद्धत म्हणजे लक्षणांवर नजर ठेवून वेळीच इलाज करवून घेणे. किडणीच्या आजाराची काही सामान्य लक्षणे पुढे दिली आहेत :

थकवा : व्यवस्थित खाणेपिणे असूनही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्हाला किडणीच्या समस्येचा धोका असू शकतो. जर किडणी योग्यरीतीने कार्य करत नसेल तर रक्तात असंख्य टॉक्सिन्स तयार होतात. ज्यामुळे आपल्याला सारखा थकवा जाणवतो.

झोपेच्या समस्या : शरीरात असलेले टॉक्सिन्स किडणीच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम करतात. यामुळे शरीरातून मूत्राद्वारे उत्सर्जित होणारे टॉक्सिन्स शरीरातच राहतात आणि मग झोपेच्या समस्या उद्भवतात.

मूत्रसंबंधी समस्या : किडणीच्या समस्येचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थोडया थोडया वेळाने लघवीला होणे. जर तुम्हाला दिवसातून बऱ्याचदा लघवीकरता जावे लागत असेल तर हीच डॉक्टरांना भेटण्याची योग्य वेळ आहे असे समजावे. किडण्या माणसाच्या शरीरातील मूत्र प्रक्रियेला नियंत्रित करतात. जर यात काही समस्या निर्माण झाली तर मूत्राच्या सवयीही बदलतात.

मूत्राच्या टेक्श्चर, रंग, गंध इ. मध्ये झालेले बदल हे निश्चितच किडणीच्या समस्येशी निगडित असू शकतात. जर तुम्हाला लघवी करताना खूप बुडबुडे दिसले तर त्वरित डॉक्टरकडे जा.

पायावर सूज : जर एखादी किडणी योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू लागते. यामुळे पाय, घोटा यावर सूज येऊ शकते. असेही जर तुम्हाला तुमच्या चपला, बूट घट्ट होऊ लागले तर समजावे की किडणीची काही तरी समस्या असू शकते.

डोळे आणि त्वचेला खाज : आपल्या शरीरात खनिजांचे योग्य प्रमाण राखण्याचे कामही किडणी करत असते. जेव्हा किडणीत काही समस्या उद्भवते तेव्हा या प्रक्रियेवरही परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे डोळयांसहित संपूर्ण शरीरभर खाज येऊ लागते.

डोळे लाल होणे : डोळे लाल होण्याचे सर्वसाधारण कारण आहे अॅलर्जी आणि इन्फेक्शन, पण किडणीची काही समस्या असल्यासही डोळे लाल होणे, सतत हलकेच दुखणे असे होऊ शकते.

डोळे रुक्ष होणे : हा एक क्रॉनिक सिंड्रोम आहे. जो कालपरत्वे अधिक जोमाने वर येतो. तुम्ही डोळे जेवढे अधिक रगडाल तेवढे ते अधिक रुक्ष होतील. रुक्ष डोळे चांगल्याप्रकारे काम करू शकत नाहीत, यामुळे नीट दिसतही नाही. किडणीची काही समस्या असल्यास डोळयात खूप कॅल्शिअम आणि फॉस्फेट जमा होऊ लागते. यामुळे डोळे अधिकच रुक्ष होतात. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

डोळयांची जखम : डोळयांची जखम हा एक वेदनेचा सिंड्रोम आहे. याची अनेक कारणे असू शकतात, ज्यातील एक किडणीचा आजारही आहे. जर तुम्हाला डोळयात सारखी जखम होत असेल तर अवश्य डॉक्टरना भेटा. जखमेमुळे डोळे लाल होऊ शकतात आणि डोळयात खाजही येऊ शकते. यामुळे डोळयाच्या कॉर्निया, कंजंक्टिवा आणि स्लेअर म्हणजे सफेद भागाचे नुकसानही होऊ शकते.

रेटिनोपॅथी : हासुद्धा एक डोळयांचा आजार आहे, जो किडणीच्या समस्येमुळे होऊ शकतो. या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे दृष्टी अधू होऊ लागणे.

या सर्व लक्षणांवर लक्ष द्या जेणेकरून किडणी आणि डोळयांच्या समस्या वेळीच ओळखून त्यावर इलाज करणे शक्य होईल. लक्षात ठेवा हेल्दी लाइफ इज हॅप्पी लाइफ.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...