* गरिमा

जीवनाच्या धावपळीत दिवसभर थकलेली व्यक्ती जेव्हा रात्री अंथरुणावर पडते, तेव्हा तिला सुखद गाढ झोपेची अपेक्षा असते. गाढ आणि आरामदायक झोप दिवसभराचा थकवा दूर करून शरीरात नवीन उत्साह भरते.

एका निरोगी माणसासाठी ५-६ तासांची झोप पुरेशी आहे,  तर लहान मुलांसाठी १०-१२ तासांची झोप पुरेशी असते. प्रौढांसाठी ४-५ तासांची झोप पुरेशी असते.

रात्री चांगली झोप न आल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, घोरणे, चिडचिडेपणा आणि एकाग्रतेत कमतरता, निर्णय घेण्यात अडचण, पोटात गडबड, उदासी, थकवा यासारख्या समस्या डोके वर काढतात.

झोप न येण्याची कारणे

झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. चिंता, तणाव, निराशा, रोजगाराशी संबंधित समस्या, मानसिक आणि भावनात्मक असुरक्षा वगैरे.

याबरोबरच निश्चित वेळी न झोपणे, चहा किंवा कॉफीचं जास्त सेवन, एखादा त्रास किंवा आजार, उशिरा जेवणे किंवा उपाशी झोपणे, रात्री उशिरापर्यंत टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल फोनला चिकटून राहणे, दिवसभर काही काम न करणे इ. कारणेही अनिद्रेची कारणे बनू शकतात.

कशी येईल सुखद झो

* ज्यांना दिवसभर पुन्हा-पुन्हा चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते, ते रात्री लवकर झोपत नाहीत. चहा किंवा कॉफीमध्ये असलेलं कॅफेन झोपेत बाधा निर्माण करतं. म्हणूनच खास करून झोपण्याच्या अगदी आधी त्यांचे सेवन टाळले पाहिजे.

* आपण जर मानसिकरीत्या एखाद्या गोष्टीवरून काळजीत असाल आणि काही निर्णय घेऊ शकत नसाल, तरीही आपल्या झोपेत बाधा येऊ शकते.

* आपण जर झोपण्याचा प्रयत्न करत असाल, पण झोप येत नसेल, तर उठून थोडा वेळ टीव्ही पाहा. एखादे आवडते पुस्तक वाचा किंवा मग हलके संगीत ऐका. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.

* झोपण्यापूर्वी थोड्या वेळासाठी आपले मन एखाद्या खास गोष्टीवर केंद्रित करा. त्यामुळे मनाची चंचलता कमी होईल आणि आपल्याला चांगली झोप येईल.

* रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ फेरफटका मारला पाहिजे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि झोपही आरामदायक येते. डिनरमध्ये जड आहार टाळला पाहिजे.

* जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. झोपण्याच्या ३ तास आधी जेवण घ्या.

* झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने गाढ झोप येते.

* झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. रोज एकाच वेळी झोपल्याने गाढ झोप लागते.

* झोपताना नेहमी सैल कपडे घातले पाहिजेत.

* रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने चांगली झोप येते.

* झोपताना खोलीत हलका प्रकाश असला पाहिजे.

* दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करावे लागते, त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी होते. त्यामुळे रोज व्यायाम जरूर करा. व्यायाम केल्याने वेदना दूर होतील आणि गाढ झोपही येईल.

या टीप्स आजमावल्यानंतरही झोपेची समस्या जशीच्या तशी राहिली, तर डॉक्टरांना भेटा आणि अनिद्रेच्या समस्येवर उपाय करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...