* प्रतिनिधी

मान्सून काळात त्वचेत संक्रमण, चेहऱ्यावरची त्वचा फाटणे, शरीरावर चट्टे येणे, पाय अथवा नखांना बुरशी येणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. सादर आहे, या सर्व समस्यांपासून दूर राहण्याचे उपाय :

* त्वचेला स्वच्छ करण्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि नंतर मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. केसांना गुंतण्यापासून आणि रुक्ष होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना पौष्टीकतेचा पुरवठा करणं गरजेचे आहे.

* घराबाहेर जाण्याआधी केसांवर अँटिपोल्युशन स्प्रे वापरा. त्वचेलासुद्धा सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. म्हणून सनस्क्रीन व एलोवेरा जेल आणि सुरक्षित ठेवणाऱ्या स्किन प्रोटेक्टर्सचा आपल्या त्वचेवर सुरक्षित थर तयार करून त्वचेसंबंधी समस्यांपासूनसयाचा वापर करू शकता. हे स्किन प्रोटेक्टर्स तुमच्या त्वचेच्या रोमछिद्रांना ६-७ तास बंद ठेवतात आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसान नियंत्रित करण्यात मदत करतात.

* त्वचा हायड्रेटेड आणि रिजूव्हिनेट ठेवण्याकरीता नियमितपणे एक्सफौलिएशन आणि स्क्रबिंग करणे तसेच ग्लो पॅक लावणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही घराबाहेर निघाल तेव्हा विषारी प्रदुषणाचा सामना करण्याकरिता घरी बनवलेले पॅक वापरणे चांगले असते.

* मान्सूनच्या या काळात भिजल्याने केस अस्वच्छ आणि अनहेल्दी होतात, कारण पावसाच्या पाण्यात अनेक प्रकारची रसायनं व विषारी घटक मिसळलेले असतात. अशावेळी चांगल्या शाम्पू व कंडिशनरचा वापर करावा. हे केसांना मुलायम ठेवतात आणि त्यांचा दमटपणा बाहेर जाऊ देत नाही. केसांना नियमित तेलाने मालिश करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण पावसाळी वातावरणात दमटपणाचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे केसांची मुळं बंद होतात.

* तेल लावल्यावरसुद्धा केसांचे स्टीमिंग आणि मास्किंग करायला हवे. जर तुम्हाला घरीच मास्क करायचा असेल तर सर्वात उत्तम पर्याय आहे एवोकाडोसोबत केळे आणि ऑलिव्ह ऑइल किंवा आवळा, रिठा आणि शिकेकाईसारखे साहित्य वापरायला हवे.

* मान्सून काळात सिथेंटीक व घट्ट कपडे वापरणे टाळा. सैल आणि सुती कपडे घाला अन्यथा तुम्हाला स्किन इन्फेक्शन आणि चट्टे येणे यासारख्या त्रासांचा सामना करावा लागतो. सर्वात महत्वाचे हे की आपल्या त्वचेवर सगळया किटाणुनाशक उत्पादनांचा जसे साबण, पावडर, बॉडी लोशन वगैरेंचा वापर करा, ज्यामुळे घाम आला तरीही त्वचेला सर्व प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यात मदत करतो.

* मुरूम आणि चट्टे येणे थांबवण्यासाठी चेहरा नेहमी स्वच्छ ठेवा. जास्त ऑयली मेकअप उत्पादनांचा वापर टाळा. तुमची मेकअप उत्पादनं पावडर बेस्ड असायला हवीत, जी स्किन फ्रेंडली असतात. याशिवाय चांगली गुणवत्ता असलेलीच मेकअप उत्पादनं वापरा, कारण त्वचा अति तापमान व दमटपणा यामुळे लवकर इन्फेक्शनचे भक्ष्य ठरते.

* फास्ट फूड अथवा अनहेल्दी आहार घेऊ नका, जर  तुम्ही फास्ट फूड खाऊ इच्छित असाल किंवा खाण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्ही ताजे आणि गरम भोजनाचे सेवन करणे आवश्यक आहे.

* आपले शरीर निरोगी राहावे यासाठी रोज १० ते १२ ग्लास पाणी अवश्य प्या, जेणेकरून शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर पडतील. शरीर स्वच्छ ठेवा. यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा अंघोळ करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...