– परमजीत सोई, ब्यूटी एक्सपर्ट
- मी २० वर्षीय तरुणी आहे. चेहऱ्यावर व वरच्या ओठांवर लव आहे. वॅक्स केल्यानंतर डाग राहातात. हे हटविण्याचा उपाय सांगा?
अपरलिप्स व चेहऱ्यावरची लव व डाग हटविण्यासाठी हळदीची घट्ट पेस्ट बनवा व त्यामध्ये लिंबाचा रस एकत्रित करून त्या जागी लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळूहळू डाग व लव विरळ होतील.
मी ३० वर्षीय महिला आहे. माझ्या समस्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांबद्दल आहे. ते दूर करण्याचा उपाय सांगा?
डोळ्यांखालची काळी वर्तुळं कम्प्युटर स्क्रीनसमोर अधिक वेळ बसल्याने व झोप पूर्ण न होण्यामुळेदेखील होऊ शकतात. ते काढण्यासाठी झोपतेवेळी डोळ्यांच्या आजूबाजूला बदाम तेल वा अंडर आय जेल लावा. फायदा होईल. यासोबत पौष्टिक आहारदेखील घ्या.
- मी १७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागदेखील पडले आहेत; ज्यामुळे चेहरा खूपच कुरूप दिसतो. मी खूप उपाय केलेत परंतु काहीच फरक पडला नाही. कृपया, मला ही समस्या दूर करण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?
चेहऱ्यावर पिंपल्स हे प्रदूषण व हार्मोनल बदलामुळे होतात. पिंपल्सचे डाग हटविण्यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. याव्यतिरिक्त बटाट्याची सालं चेहऱ्यावर चोळा. दही व बेसनचं उटणे लावा. लिंबाच्या रसात हळद मिसळून पेस्ट बनवा व पिंपल्सवर लावा. या सर्व घरगुती उपायांनी तुमच्या समस्येचं समाधान होईल आणि हळूहळू पिंपल्सचे डागदेखील विरळ होतील. याव्यतिरिक्त अधिक तेलकट अन्न खाऊ नका. जंक फूड खाऊ नका.
- माझं वय २२ वर्षं आहे. माझी समस्या अशी आहे की थंडीत माझी त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेवर अजिबात चमक नसते. त्वचेतील ओलावा कायम राहावा यासाठी मला काय करायला हवं?
त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. कारण पाण्याच्या अभावामुळेदेखील त्वचा कोरडी व रुक्ष होते. याव्यतिरिक्त त्वचेवर अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावा. त्वचेचा थंड वाऱ्यापासून बचाव करा. बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घ्या. त्वचा जर अधिक कोरडी असेल, तर गुलाबपाण्यात ग्लिसरीन एकत्रित करून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळण्याबरोबरच चेहऱ्याचं टोनिंगदेखील होईल.
- मी ३० वर्षीय स्त्री आहे. माझे केस खूपच कोरडे व रूक्ष आहेत. ते सिल्की व शाइनी बनविण्याचा एखादा उपाय सांगा?
खाण्यापिण्यात पौष्टिक तत्त्वांचा अभाव आणि धूळप्रदूषणामुळे केस निस्तेज व रुक्ष दिसू लागतात. त्यांची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या. घरगुती उपायासाठी तुम्ही २ कप गरम पाण्यात १ चमचा मध मिसळून केसांवर लावा आणि अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.
याव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा कोमट खोबरेल तेलाने केसांना मसाज करा व हॉट टॉवेल थेरेपी घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि ते सिल्की व शाइनी बनतील.
- मी ४२ वर्षीय स्त्री आहे. माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, ज्या मी मेकअपने लपविते तरीदेखील त्या दिसतात. सुरकुत्या कमी करण्याचा एखादा उपाय सांगा?
सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही दुधाच्या पावडरमध्ये पाणी आणि मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. असं केल्याने तुमची त्वचा कोमल होईल आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यादेखील दिसणार नाहीत. याव्यतिरिक्त केळं मॅशकडून त्याचा पॅक चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासानंतर चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्यादेखील कमी होतात.
- मी २२ वर्षीय तरुणी आहे. माझ्या चेहऱ्यावर व्हाइटहेड्स आहेत, ज्यामुळे चेहरा खराब दिसतो. ते घालविण्याचे उपाय सांगा?
व्हाइटहेड्स तेलकट त्वचेवर अधिक येतात. यामुळे अशा स्त्रियांनी धूळमाती व प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर राहायला हवं.
तुम्ही भरपूर पाणी प्या. बाहेरून घरी आल्यावर त्वचेचं क्लीजिंग करा. यामुळे मृतत्वचा व रोगजंतू निघून जातील. क्रीमी व ऑइली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा कमीत कमी वापर करा. व्हाइटहेड्सवर लिंबाचा रस व काकडीचा रस लावा. स्टीम घेतल्यानेदेखील फायदा होईल.
- मी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिंनी आहे. माझे हात व चेहऱ्याचा रंग सावळा आहे. त्यामुळे रंग उजळण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?
चेहरा व हातांचा रंग उजळण्यासाठी कच्चं दूध चेहरा व हातांवर लावा. हे टोनरचं काम करेल. कच्चं दूध हात व चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि सुकल्यावर धुऊन टाका. यामुळे रंग उजळेल.
याव्यतिरिक्त पपईचा पल्प मॅश करून चेहरा व हातांवर लावा. यामुळेदेखील रंग उजळेल. घरातून निघतेवेळी चेहरा व हातांवर एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावावं.