* पारूल, पूजा

जर तुम्ही एक बिझी मॉम असाल तर तुमच्यासाठी ब्युटी रुटीन व्यवस्थित ठेवणे कठीण असेल. वेळ कमी असल्यामुळे तुम्ही तुमच्या देखभालीतील छोटयातील छोटया गोष्टीकडेही दुर्लक्ष करत असाल. पण डायरेक्ट ऑफ ऐल्प्स ब्युटी अँड अकॅडमीच्या डॉ. भारती तनेजा तुम्हाला अशा क्विक ब्युटी टीप्स सांगत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये वापरून प्रत्येक सकाळी खूप जास्त वेळ न देताही तुमचे सौंदर्य पूर्वीसारखे चिरतरूण राखू शकाल.

स्किन केअर रुटीन

शुद्ध तूप : शुद्ध तूप कुठल्याही प्रकारच्या त्वचेवर चमत्कार घडवू शकते. तुम्ही सकाळी पराठे किंवा चपाती बनवताना बोटावर तुपाचा छोटा ड्रॉप घेऊन डोळयांभोवती लावा. असे केल्यामुळे डोळयांभोवती सुरकुत्यांसारख्या बारीक रेषा तयार होणार नाहीत.

लेमन स्लाइस : सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करा आणि त्यानंतर लिंबाची साले फेकण्याऐवजी ती हातांचे कोपरे, नखांच्या आजूबाजूला घासा. हे एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे आणि शरीराला काळे होण्यापासून रोखते. ते नखांनाही मजबूत बनवण्यासाठी प्रभावी आहे.

शुद्ध खोबरेल तेल : स्वयंपाकघरात खाण्यायोग्य शुद्ध खोबरेल तेलाची एक बाटली नक्की ठेवा आणि दररोज दोन चमचे घ्या. हे अँटीऑक्सिडंटयुक्त असते. यामुळे सुरकुत्या, ब्रेकआउट्स, पिगमेंटेशन रोखता येते व त्वचा मुलायम होते.

बेसन पॅक : बेसनात थोडीशी हळदीची पावडर व कच्चे दूध मिसळा. हे अंघोळीपूर्वी चेहरा व शरीराला लावा. उन्हाळयात या पॅकमध्ये एका लिंबाचा रस व हिवाळयात एक मोठा चमचा साय घालून लावू शकता. याच्या वापरामुळे मृत त्वचा निघून जाईल व तुम्हाला फ्रेश वाटेल.

हेअर केअर रुटीन

अंडे : सकाळी नाश्त्याला जर अंडे बनत असेल तर तुम्ही आठवडयातून एकदा एका ग्लासात एक अंडे फेटून ते केसांना लावायला विसरू नका. हे तुम्ही काम करता करताही करू शकता. यामुळे तुमचे केस घनदाट व मुलायम होतील.

शुद्ध खोबरेल तेल : शुद्ध खोबरेल तेल सर्वात चांगल्या आणि प्रभावी हेअर सिरमपैकी एक आहे. याने केसांना मालिश करा आणि रात्रभर केस तसेच ठेवा. सकाळी धुवून टाका. यामुळे  तुमचे केस खूपच मुलायम दिसू लागतील.

मेकअप केअर रुटीन

मल्टीटास्किंग प्रोडक्ट खरेदी करा : एक मल्टीटास्किंग प्रोडक्ट वापरल्यामुळे वेळ वाचतो. यासाठी तुम्ही काही उच्च दर्जाचे प्रोडक्ट खरेदी करा, जे वापरण्यासाठी आणि मल्टिपर्पज युजसाठीही सोपे असतात.

मल्टीटास्किंग ब्यूटी प्रोडक्ट हे बीबी किंवा सीसी क्रीम असते, जे एक सनस्क्रीन, मॉइश्चरायजर आणि फाउंडेशनच्या रुपात वापरता येते. तुम्ही तुमचा चेहरा धुवून सीसी क्रीम लावून ब्लश, आयलायनर, लिपग्लॉस आणि पावडरचा वापर करू शकता.

वेळ कमी असल्यास शीर, लाईट कलर्स : तुमच्याकडे भरपूर वेळ असल्यास मेकअपसाठी गडद, चमकदार रंग वापरा, पण वेळ कमी असल्यास सौम्य रंग वापरा. सौम्य रंग तुम्ही हलक्या हातांनी लावू शकता.

योग्य टूल वापरा : ब्यूटी टूल्स स्वस्त नसतात, पण तुम्ही जर ते नीट हाताळल्यास दीर्घ काळ टिकतात. उच्च दर्जाचे मेकअप ब्रश खरेदी करा, जे वापरण्यास सोपे असते आणि तुम्ही नक्कीच वेळ वाचवू शकाल.

पावडर फाउंडेशन आहे उत्तम : तुम्ही मेकअप करता, तेव्हा सर्वात आधी बेस बनवण्यासाठी फाउंडेशन वापरत असाल, पण क्रीम बेस्ड फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी वेळ लागतो. सोबतच संध्याकाळ होताच चेहरा तेलकट दिसू लागतो. म्हणूनच कमी वेळेत चांगला लुक हवा असेल तर पावडर फाउंडेशन वापरणे योग्य ठरेल.

ब्लश एक काम अनेक : हा मेकअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. ब्लश केल्यानंतर संपूर्ण चेहरा ताजातवाना आणि चमकदार होतो, शिवाय हे लावायला जास्त वेळही लागत नाही. ब्लशसाठी तुम्ही गुलाबी किंवा पीच कलरची निवड करू शकता.

आयलायनर, आयलॅशेज, आयब्रोज : हे केलेत म्हणजे तुमचा मेकअप पूर्ण झाला. आयलायनरसाठी तुम्ही पेन्सिल आयलायनर किंवा जेल लायनर वापरू शकता. प्रत्यक्षात कमी वेळेसाठी पेन्सिल आयलायनर जास्त योग्य आहे, कारण हे सुकवण्याची कटकट नसते. आयलॅशेजवर मस्करा लावल्यानंतर तुमच्या पापण्या मोठया आणि खूप सुंदर दिसू लागतात. तुम्हाला हव्या तितक्या तुमच्या पापण्या घनदाट नसतील तर त्यासाठी आयब्रो पेन्सिलचा वापरा करा. यासाठी तुम्ही तपकिरी किंवा काळया रंगाची आयब्रो पेन्सिल वापरू शकता.

लिपग्लॉस, लिपबाम आणि लिपस्टिक : मेकअप याशिवाय अपूर्ण आहे. लिपस्टिक लावताच चेहरा चमकतो. नॅचरल लुक हवा असल्यास तुम्ही लिपग्लॉस लावू शकता. हे बाजारात मोठया रेंजमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते खरेदी करू शकता. हे लावणेही अतिशय सोपे आहे. क्विक मेकअपसाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे आणि याच्या वापरामुळे ओठ केवळ गुलाबीच दिसत नाहीत तर मुलायमही राहतात.

९ महत्त्वाच्या टीप्स

* तुमच्याकडे मेकअपसाठी वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळेतही चांगला मेकअप करू शकता. तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही तुमच्या स्कीनटोननुसार बीबी किंवा सीसी क्रीम लावू शकता. डोळयांखाली काळी वर्तुळे असतील तर फक्त लायनर वापरा.

* मेकअप करण्यापूर्वी मेकअपचे सर्व सामान एकत्र ठेवा, जेणेकरून मेकअप करताना शोधाशोध करावी लागणार नाही आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही.

* मेकअप सौंदर्यात भर घालतो, परंतु मेकअपनंतर त्वचेची विशेष काळजी घेणेही गरजेचे आहे. म्हणून झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. असे केल्यामुळे तुमचा सकाळचा वेळ वाचेल.

* दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी तुम्ही सिरमसोबत कैफीन वापरू शकता.

* डोळयांच्या आसपासचा भाग आकर्षक बनवण्यासाठी आयब्रोज शेपमध्ये ठेवा.

* रिफ्रेश लुकसाठी डोळयांच्या कॉर्नरला आयशॅडो वापरू शकता.

* तुम्ही खूपच घाईत असाल तर आयब्रोज पेन्सिल, मस्करा आणि लिपग्लॉसचा वापर करून १० मिनिटांपेक्षाही कमी वेळेत आकर्षक लुक मिळवू शकता.

* तुम्ही पटकन मेकअप करून वेळ वाचवू इच्छित असाल तर ब्लश, ब्रोंजर आणि आयशॅडो वापरू शकता.

* वाटल्यास तुम्ही केवळ आयलायनर आणि ब्राइट कलरची लिपस्टिकही वापरू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...