- मी ३१ वर्षांची विवाहित स्त्री आणि ४ वर्षांच्या मुलीची आई आहे. मी एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर जिवापाड प्रेम करतो. मी विवाहित आणि एका मुलाची आई असूनही आम्हा दोघांचे प्रेमसंबंध खूप चांगले आहेत.
आम्ही निर्धास्त होऊन शारीरिकसंबंधही ठेवले आहेत. पण आता अचानक मला असं वाटू लागलं आहे की अशा प्रकारचं वाईट कृत्य मी करायला नकोय. म्हणून मी त्या मुलापासून दुरावा निर्माण केला आहे. पण तरी तो मला वारंवार फोन करत आहे.
तो मला भेटायला बोलवत आहे. मी त्याला एकदा भेटू का? मी काय करू सांगा?
तुम्ही एक विवाहित स्त्री आहात. अशा प्रकारे कोणा दुसऱ्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवून तुम्ही केवळ आपलं वैवाहिक जीवन धोक्यात घालत नव्हतात, तर त्या मुलाचीही दिशाभूल करत होता. हे तर बरं झालं की वेळीच तुम्हाला तुमची चूक कळली आणि तुम्ही तुमचं पाऊल मागे घेतलं. तुमच्यावर केवळ तुमच्या कुटुंबाचीच नव्हे तर तुमच्या लहान मुलीच्या पालनाचीही जबाबदारी आहे. म्हणून आपल्या निर्णयावर ठाम राहा.
तुमच्या प्रियकराला स्पष्ट सांगा की तुम्हाला त्याला भेटायचं नाहीए. म्हणून त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.
- मी ३० वर्षांची विवाहित स्त्री असून एका किशोरवयीन मुलाची आई आहे. अलीकडे मी माझ्या एका कौटुंबिक समस्येमुळे खूप चिंतित आहे. मी शासकीय शाळेत शिक्षिका आहे. मात्र माझ्या पतींची सध्या फार वाईट अवस्था सुरू आहे. ते ज्या खाजगी कंपनीमध्ये आधी काम करायचे तिथून त्यांना अचानक असं सांगून काढून टाकलं गेलं की सध्या कंपनीला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे.
आता समस्या ही आहे की त्यांना आपली पोझिशन आणि पात्रतेनुसार काम मिळत नाहीए. त्यांना आधीच्या कंपनीमध्ये जितका पगार मिळत होता, तितक्याच पगारावर काम करायचं आहे. असं घरातच रिकामं बसून त्यांना दोन महिने झालेत.
मी त्यांना सतत सांगते की पगार कमी मिळाला तरी हरकत नाही, पण त्यांनी नोकरीत रूजू व्हावं. पण ते अजिबात ऐकतच नाहीएत. म्हणतात, जग पुढे चालले आहे आणि मी का म्हणून मागे जाऊ? तुम्हीच सांगा, मी त्यांना कसं समजावू?
तुम्ही तुमच्या पतींना या गोष्टीसाठी तयार करा की त्यांना जर त्यांच्या मनासारखं काम मिळालं असेल आणि कंपनीही चांगली असेल तर त्यांनी पगाराला जास्त महत्त्व देऊ नये. कष्ट केले तर पुढे जाण्याचीही संधी मिळेल. नोकरी करता करता यापेक्षा चांगल्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण सतत जर ते काही काळ रिकामे बसले तर त्यांचा आत्मविश्वासही खचेल आणि मग चांगली नोकरी मिळणंही आणखीनच कठीण होऊन बसेल.
- मी १८ वर्षांची तरुणी असून एका मुलावर खूप प्रेम करते. तोही माझ्यावर खूप प्रेम करतो पण अलीकडे तो माझ्यावर नाराज आहे. त्याच्या नाराजीचं कारणही मी स्वत:च आहे. खरंतर तो जरा संशयी स्वभावाचा आहे. प्रत्येक गोष्टीवर तो संशय घेत असतो. त्याच्या या वागणुकीमुळे मी खूपच त्रस्त झाले होते.
प्रत्येक गोष्टीसाठी तो मला सतत जाब विचारायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी मीही एक मूर्खपणाचं पाऊल उचललं. मी एका मुलाशी मैत्री केली.
पण तो मुलगा खूपच धूर्त निघाला. त्याने मला फूस लावून माझ्याशी शारीरिकसंबंधही ठेवले आणि त्यानंतर माझ्याशी बोलणंही सोडून दिलं. माझ्या या बालिश वागणुकीचा आता मला खूपच पश्चात्ताप होत आहे.
माझा प्रियकर जो माझी इतकी पर्वा करायचा तोही मला भाव देत नाहीए. तुम्हीच सांगा, मी काय करू?
तुम्ही तुमच्या प्रियकराच्या संशयी स्वभावामुळे जर त्रस्त होता तर यासाठी त्याला तुम्ही समजावू शकला असता, की मैत्रीमध्ये एकमेकांवर विश्वास असणं फार जरुरी आहे. नाहीतर मैत्री पुढे जात नाही. तुम्ही अजाणतेपणी जी चूक केली त्याच्यासाठी तुम्हाला आता अपराधी वाटत आहे, हेच पुरेसं आहे. आपल्या प्रियकराला समजावण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्यावर प्रेम करतो तर नक्कीच तुमचं ऐकून घेईल. तुम्ही उगाच काळजी करू नका.
- माझा एक चुलत भाऊ आहे. आम्ही दोघे समवयीन आहोत. आम्ही जेव्हा कधी काकांच्या घरी राहायला जातो तेव्हा रात्रीच्या वेळेस माझा भाऊ माझ्याजवळ येतो. पण त्यावेळेस तो ज्याप्रकारे माझ्यासोबत अश्लील चाळे करतो ते मला आवडत नाहीत. यासाठी मला त्याला अडवताही येत नाही की घरातही मी याविषयी कोणाला सांगू शकत नाही. कृपया तुम्हीच सांगा, मी काय करू?
तुमचा चुलतभाऊ रात्री तुमच्यासोबत अश्लील चाळे करत असेल तर तुम्ही त्याच्या खोलीमध्ये झोपायला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीसोबत झोपू शकता. पण तुम्ही असं काहीच करत नाहीए. तुम्हाला जर त्याची वागणूक खरोखरच आवडत नसती तर तुम्ही पहिल्यांदाच त्याला धमकावलं असतं, म्हणजे त्याने पुन्हा असं करण्याचं धाडस केलं नसतं. पण असं वाटतंय की तुम्हालाही या सगळ्यात मज्जा येते, म्हणून तुम्ही त्याला अडवत नाहीत. अर्थातच, या सगळ्यात तुमची मूक सहमती आहे. पण तुम्हाला हे कळायला हवं की यामुळे पुढे जाऊन तुम्ही अडचणीत सापडू शकता.
म्हणून त्याला यासाठी नकार द्या. तो ऐकत नसेल तर सक्तपणे त्याला धमकी द्या की तुम्ही तुमच्या कुटुंबियांकडे त्याची तक्रार कराल. अशाने तो आपोआपच सरळ होईल.