* अनुराधा
फॅशनेबल दिसण्यासाठी इनरवेअर्सची योग्य निवड खूप गरजेची आहे. कारण इनरवेअर्समुळेच ड्रेसची फिटिंग व्यवस्थित दिसते. जर योग्य इनरवेअर्स नसतील तर तुमचा बांधाही शेपमध्ये दिसणार नाही.
मग या जाणून घेऊया, कोणत्या ड्रेससोबत कोणते इनरवेअर घालावे.
* मिनिमायझर ब्रा स्लिम फिट टॉपसाठी आहे. तुम्हाला जर तुमच्या हेवी ब्रेस्टची साइझ कमी दाखवायची असेल तर ही जरूर घाला.
* टीशर्ट घालत असाल तर टीशर्ट ब्रा घाला. ही ब्रा तुमच्या ब्रेस्टला योग्य आकार देईल.
* पॅडेड ब्रा त्या ड्रेससाठी योग्य आहेत जे खूपच पातळ फॅब्रिक जसं की सिल्क, कॉटन आणि लिनेनपासून बनलेले असतात.
* जर डीपनेक ड्रेस घालायचा असेल तर डॅमी ब्रा घाला. ही ब्रा ऑफशोल्डर आणि ट्यूब टॉपच्या खालीही घातली जाऊ शकते.
* हाल्टरनेक ब्रा सैलसर स्पोर्टवेअरच्या खाली घालावी. ही ब्रा तुमच्या ब्रेस्टला केवळ स्थिरच ठेवत नाही, तर घामही शोषून घेते.
फॅशन एक्सपर्ट विनीता सांगते की, ‘‘ब्रेस्ट आणि बम्प्स स्त्रियांच्या शरीराचे फारच महत्वाचे अवयव असतात. हे दोन्ही अवयव स्त्रियांना चांगली फिगर देतात आणि ड्रेसलाही चांगला शेप. जर एखाद्या स्त्रीच्या ब्रेस्टची साइझ कमी असेल तर ती आर्टिफिशियली वाढवण्यासाठी पॅडेड ब्रा घातली जाऊ शकते. ब्रासारखंच बम्प्स वाढवण्यासाठीही पॅडेड पॅण्टीज मिळतात.’’
टीनएजर्सचे इनरवेअर्स
खरंतर आजच्या तरुण पिढीला इनरवेअर्सशी निगडित योग्य माहितीचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. विशेष म्हणजे जेव्हा आपण टीनएजर्सची चर्चा करतो तेव्हा तर हा खूपच महत्त्वाचा विषय ठरतो. हे असं वय असतं जेव्हा अनेक मुलींना या गोष्टीची कल्पनाही नसते की त्यांच्या स्तनांमध्ये उभार येत आहे आणि ते आकार घेत आहेत. अशात एक आईच आपल्या मुलीला ब्रेस्ट केअर आणि ब्राची योग्य निवड करण्याबाबत माहिती देऊ शकते.
सादर आहे याबाबतची विशेष माहिती जी आईने आपल्या वाढत्या मुलीला जरूर द्यायला हवीय :-
* जेव्हा मुलीचे स्तन आकार घेऊ लागतील तेव्हा लगेच आपल्या मुलीला या होणाऱ्या बदलाबद्दल समजावून सांगा आणि तिला ट्रेनिंग किंवा स्पोर्ट ब्रा घालायला द्या.
* विकसित होणाऱ्या स्तनांचा आकार थोडा अजब दिसतो म्हणून अशावेळी मुलीला कप्ड ब्रा घालण्याचा सल्ला द्या. अशा ब्रा स्तनांच्या आकाराला पॉइंटेड दाखवत नाहीत. त्यांना गोल आकार देतात. या ब्रामध्ये असलेले अंडरवायरदेखील स्तनांना चांगला सपोर्ट देतात.
* शाळेमध्ये अनेक अॅक्टिव्हिटिज होत राहातात ज्यामध्ये शारीरिक क्षमतेचा बराच वापर करावा लागतो. अशावेळी हे आईचं कर्तव्य ठरतं की तिने मुलीला समजवावं की तिने आपल्या विकसित होणाऱ्या स्तनांची काळजी घ्यायला हवीय. आणि एखादी चांगली स्पोर्ट ब्रा घालून ती याची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. स्पोर्ट ब्रा घातल्याने स्तनांच्या टिशूजवर प्रभाव पडत नाही. म्हणून ही ब्रा एखाद्या स्पोर्टमध्ये भाग घेताना किंवा व्यायाम करताना मुलीला घालायला सांगा.
* या वयात जेव्हा मुलगी पहिल्यांदा ब्रा घालत असते तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्न असतात. जसं की फिटिंग, साइझ आणि ब्रा घातल्यानंतर किती कम्फरटेबल वाटेल इत्यादी. मुलीच्या मनात उठणाऱ्या या प्रश्नांना एखादी चांगली फिटेड ब्रा देऊन एक आईच संपवू शकते.
* मुलीला गडद रंगाच्या ब्राऐवजी फिकट रंगाची आणि शक्य झाल्यास स्किन टोन मॅच करणाऱ्या रंगाची ब्रा घालण्याचा सल्ला द्या. खरंतर गडद रंगाची ब्रा कपड्यांमधून झळकू शकते मात्र स्किन टोन कलरच्या ब्रामध्ये ही समस्या उद्भवत नाही.