* जासमीन कश्यप
तसं बघता महिला सर्व प्रकारचे वर्कआउट करू शकतात आणि करतातही जसे अॅरोबिक्स, बॉडी बिल्डिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, झंबा, टबाटा इत्यादी. पण हे सर्व वर्कआउट वय, शरीराची ठेवण, आरोग्यविषयक समस्या, शरीराची गरज लक्षात ठेवून आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करायला हवेत.
येथे आम्ही काही असे वर्कआउट्स सांगत आहोत जे महिलांसाठी खूपच फायदेशीर आहेत :
कार्डिओ वर्कआउट
कार्डिओ फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी बराच उपयोगी आहे. यामुळे तणाव कमी होतो. या वर्कआउटमुळे फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. रक्ताभिसरण चांगले होते. हृदय मजबूत आणि रक्तही शुद्ध होते. कार्डिओ वर्कआउट वजन कमी करून शरीरात जमलेली अतिरिक्त चरबी कमी करतो आणि आजारांपासून वाचवतो. वेगवेगळया प्रकारच्या कार्डिओ वर्कआउटद्वारे तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता.
अॅरोबिक्स
अॅरोबिक्स तुम्ही कुठेही, कधीही एका छोटयाशा जागेतही करू शकता. यात आपल्या आवडीच्या संगीतावर काही स्टेप्स केल्या जातात. ग्रेपवाइन लेग कर्ल जंपिंग जॅक्ससारख्या हालचालींद्वारे संपूर्ण शरीराचे वजन कमी होते. घामाद्वारे शरीरातून बाहेर आलेले टॉक्सिन चरबी आणि आजारांना दूर ठेवतात. फक्त घाम येणेच गरजेचे नाही, कठोर परिश्रमही गरजेचे आहेत. अॅरोबिक्स वर्कआउटमध्ये तुमच्या हृदयातील ठोके हळूहळू वाढवत एका स्तरावर मेंटेन केले जातात, जे वजन कमी करायला मदत करतात.
स्ट्रेंथ वर्कआउट
महिलांसाठी स्ट्रेंथ वर्कआउट खूपच गरजेचाही आहे आणि ट्रेंडमध्येही आहे. यामुळे महिलांमधील ऑस्टियोपोरेसिसची समस्या खूपच कमी होते. हाडांची घनताही वाढते. यातील बायसेप कर्ल, ट्रायसेप एक्स्टेंशन, हॅमर कर्ल, शोल्डर प्रेस, पुशअप्स, ट्रायसेप्स डिप्स इत्यादी महिलांसाठी फायदेशीर आहेत.
डान्स फिटनेस
फिटनेस डान्स महिलांसाठी खूपच चांगला आहे आणि आजकाल तर हा ट्रेंड बनत चाललाय. यात तुम्ही भांगडा, बेली डान्स इत्यादींवर वेगवेगळया प्रकारे थिरकत ३०-५० मिनिटांपर्यंत वर्कआउट करू शकता. मौजमस्ती सोबतच वजनही कमी होते.
किक बॉक्सिंग
किक बॉक्सिंग एक प्रकारचा कार्डिओ वर्कआउट आहे. यात बऱ्याच स्नायूंचा एकत्र वापर होतो. महिलांमध्ये जास्त करून हातांच्या बाह्या आणि पायांना टोन करणे मुख्य असते. तसे तर किक बॉक्सिंग संपूर्ण शरीरासाठी चांगले आहे, पण हे त्या भागाला लवकर टोन करते ज्यामुळे तुम्ही तुमचे आवडते कट स्लीव्स किंवा वनपीस ड्रेस घालू शकता. यात शरीराच्या वरील भागातील मूव्हमेंट्स जेब्स, क्रॉस, हुक व अपरकट्स असतात तर खालील भागातील मूव्हमेंट्समध्ये नी स्ट्राइक, फ्रंट किक, राउंडहाउस किक, साइड किक, बॅक किक इत्यादींचा सहभाग असतो.
हाय इंटेंसिटी वर्कआउट
काही महिला स्वत:साठी वेळ काढू शकत नाहीत, यामुळे जिम किंवा पार्कमध्ये जाऊन वर्कआउट करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी हाय इंटेंसिटी वर्कआउट चांगला पर्याय आहे. हे अन्य वर्कआउट्सपेक्षा थोडे कठीण असते, मात्र यामुळे कमी वेळात जास्त वजन कमी करता येऊ शकते. हे चयापचय प्रक्रिया वेगाने सुधारते. या वर्कआउटमध्ये काही हाय इंटेंसिटी एक्सरसाइजची निवड करून त्यांना क्रमाने लावून सेट्समध्ये केले जाते. जसे जंप, स्विंग, एअर पुशअप्स, रॉक क्लाइम्बिंग स्टार जंप, जंप हायनीज मिळून १ सेट तयार केल्यावर सर्वांचे ३ सेट किंवा ५ सेट केले जातात. प्रत्येक एक्सरसाइज मिनिट किंवा सेकंदांच्या हिशोबाने केली जाते. वेट लॉस आणि बॉडी टोनिंगच्या दृष्टीने कमी वेळात जास्तीत जास्त वजन कमी करण्यासाठी हे चांगले वर्कआउट आहे.
स्टेपर वर्कआउट
हादेखील एक चांगला पर्याय आहे. एक बॉक्स किंवा शिडीचा वापर करून हे वर्कआउट करता येईल.
अॅब्स वर्कआउट
याद्वारे तुम्ही लेग रेज, स्क्वाट्स, क्रंचेस इत्यादी करू शकता. यामुळे पोट, कंबर आणि पायातील चरबी कमी होईल. महिलांमध्ये जास्त करून पोट, कंबर आणि पायांमध्ये चरबी जास्त असते.
महिलांसाठी फ्लँक, सुमो स्क्वाट्स, बॅक लेग किकिंग, वूड चॉपर, रशियन क्रंच, प्लँक, लेग फ्लटर इत्यादी व्यायाम उत्तम पर्याय आहेत.