३०-३५ वर्षांपूर्वीची घटना आहे. चांगलं घरदार बघून खूप आधीच माझं लग्न झालं. मनात शिक्षण घेण्याची इच्छा दाबून १०वीसुद्धा पास करू शकले नाही. कारण आमच्या गावात मुलीचं लग्न लवकर करणं चांगलं मानलं जायचं.

सासरी खूप मोठा परिवार होता, पण इतकी शिस्त की आपलं अस्तित्व खुंटीवर टांगून ठेवावं लागलं. सासूबाई शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाच्या होत्या आणि माझ्या पुढील शिक्षणाच्या विरोधात होत्या. माझ्या पतीशीसुद्धा मला फार बोलायला वेळ मिळत नसे. पण माझ्या शिकायच्या इच्छेबाबत त्यांना नक्की माहीत होतं.

काही महिन्यांनी मी माझ्या माहेरी आले. माझ्या वाढदिवशी मी माझ्या पतिची व्याकुळ होऊन वाट बघत होते. ते रात्री साधारण १० वाजता आले. माझा चेहरा उतरला होता. जेवणही थंड झालं होतं. गरम होता तो माझा मूड. त्यामुळे ते येताच मी संतापले, ‘‘आत्ता आठवण आली वाढदिवसाची? इतके घाबरट होतात तर लग्न कशाला केलं?’’

ते गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘‘भेट नाही बघणार का?’’ भेट बघून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी १०वीच्या वर्गाचा अॅडमिशन फॉर्म आणला होता. ते म्हणाले, ‘‘खूप मुश्किलीने मनवलं सगळयांना.’’

‘‘माझ्या इच्छेचा तुमच्या मनात इतका मान आहे, हे तर मला माहीतच नव्हतं.’’ असं म्हणून मी त्यांना मिठीच मारली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...