- पारुल
‘‘रमा घरातील काही कामे करणे शिकून घे, नाहीतर दुसऱ्या घरी जाशील तेव्हा सासरचे हेच म्हणतील की आईने काही शिकवले नाही.’’
‘‘शिल्पा बेटा, अजून किती शिकशील. कुठून शोधू आम्ही एवढा शिकलेला नवरा मुलगा, शिवाय जेवढा शिकलेला मुलगा तेवढाच अधिक हुंडा.’’
‘‘बघ श्रेया अजून दहा वर्षाची आहे. किती चांगल्याप्रकारे घर स्वच्छ करते. खूप चांगली गृहिणी बनेल. सासरी जाऊन आमचे नाव उज्ज्वल करेल.’’
‘‘शिल्पा आता तू बारा वर्षाची झाली आहे. प्रत्येक वेळी खीखी करत जाऊ नकोस. थोडा अभ्यासही कर नाहीतर कोण लग्न करेल तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी.’’
ही सर्व विधाने प्रत्येक मुलगी आपल्या जीवनात आई-वडिलांच्या घरी लहानपणापासून तारुण्यापर्यंत न जाणे किती वेळा ऐकते. हेच ऐकत-ऐकत त्या मोठया होतात. मुलगी सावळी आहे तर तिला डबल एमए शिकवा, जेणेकरून चेहरा नाही तर नोकरी बघून तरी मुलगा लग्नासाठी होकार देईल. कुठली शारीरिक कमी असेल तर हुंडयात जास्त पैसे देऊन सासरच्यांचे तोंड बंद करायचे.
लहानपणापासून त्यांना पुन्हा-पुन्हा अशाप्रकारच्या गोष्टी सांगून आई-वडील ना केवळ त्यांचा आत्मविश्वास कमी करतात, तर असा व्यवहार करतात की जसा त्यांचा जन्मच बस लग्नासाठी झाला आहे. विवाह नव्हे अलादिनचा दीवा असावा. मुली आई-वडिलांच्या गोष्टी ऐकून-ऐकून स्वप्नांचे असे सोनेरी महाल सजवू लागतात की जणू विवाहच त्यांचे शेवटचे लक्ष्य आहे. विवाहासाठी त्या सर्वकाही करू इच्छितात. जगभरातले कोर्सेस, शिक्षण सर्वकाही आणि विवाहानंतर?
हरवून जाते ओळख
लग्नानंतर त्या पूर्णपणे आपले पती, कुटुंब आणि मुलांसाठी समर्पित होतात. कारण त्यांना नेहमी हेच शिकवले गेले आहे. आपल्या आईला त्यांनी नेहमी असच करताना पाहिलं आहे. मग एक वेळ येते जेव्हा त्या एका वळणावर चालता-चालता विचार करण्यास विवश होऊन जातात की शेवटी त्या कुठे स्टॅन्ड करतात? त्या का जगत आहेत? त्यांची ओळख काय आहे?
शिखा सुंदर, शिकली-सवरलेली, चांगल्या कुटुंबातील खूप गुणी मुलगी आहे. खूप चांगल्या कुटुंबात लग्न झाले. पतिही चांगले आहेत. पण घरवाल्यांनी हे सांगून नोकरी करण्यास मनाई केली की तुला कुठल्या वस्तूची कमतरता आहे. नोकरी करशील तर समाज काय म्हणेल...आम्हाला हे सर्व पसंत नाही. पतिनेही आईवडिलांचीच री ओढली. शिखाने आपल्या इच्छा अपेक्षांचा गळा दाबला. कॉलेजमध्ये तिला सर्व लोक किती विचारायचे आणि आज ती बस गृहिणी बनून राहीली आहे.