– पारुल भटनागर

उत्सवापूर्वीच्या तयारीत काही दम असेल तेव्हाच तर उत्सवाच्या दिवसांत तुमच्या स्किनवर ग्लो दिसून येईल. उत्सवादरम्यान इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी जाणून घेऊ कॉस्मेटोलॉजिस्ट आणि आल्प्स कॉस्मेटिक क्लिनिकच्या फाउंडर डायरेक्टर भारती तनेजा यांच्याकडून काही खास मेकअप टीप्स. या टीप्स आजमावल्यास सणासुदीत जेव्हा तुम्ही शृंगार करून घराबाहेर पडाल लोक तुम्हाला पाहतच राहतील.

फेशिअल चार्म

आपल्या त्वचेची चमक उत्सवाच्या झगमगटीसह मॅच व्हावी यासाठी वेळोवेळी स्किननुसार फेशिअल करून घ्या. या दिवसांत गोल्ड फेशिअल छान दिसते.

या टेक्निकमध्ये एका विशेष स्क्रबर मशीनच्या सहाय्याने डेड सेल्स रिमूव्ह केले जातात आणि मग मशीनद्वारे फळांचा रस आणि गोल्ड सोल्युशन त्वचेत खोलवर पोहोचवले जाते. असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि रक्तातील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे फेशिअल फेस्टिव्हल सुरू होण्याआधी काही दिवस करून घ्या म्हणजे संपूर्ण फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमचा चेहरा चमकत राहील.

घरगुती उपाय : १ चमचा रवा घेऊन तो गरम दुधात मिसळा व चांगले फेटून घ्या. दाट झाल्यावर या मिश्रणात २ थेंब लिंबाचा रस आणि २ थेंब मध मिसळून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर पाण्याने धुवून टाका. थोडयाच वेळात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला जाणवेल.

बॉडी ग्लो

एकीकडे जिथे उत्सवाच्या खरेदीसाठी मन उत्साहित झालेले असते तिथे दुसरीकडे या उत्सवाच्या तयारीत शरीर पूर्णपणे थकून गेलेले असते. दिवसभर प्रखर उन्हात राहून त्वचा टॅन होते म्हणूनच टॅन फ्री आणि रिलॅक्स होण्यासाठी बॉडी स्क्रबिंग करून घेणे उत्तम असते. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्याचबरोबर टॅनिंगही निघून जाते. यामुळे त्वचा सॉफ्ट तर होतेच पण खुलूनही येते.

घरगुती उपाय : १ चमचा बेसन आणि २ चमचे व्हीट ब्रान घेऊन त्यात चिमूटभर हळद, लिंबाचे काही थेंब आणि साय मिसळा. दररोज अंघोळ करण्याआधी ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावा. सुकल्यावर हलक्या हातांनी ती काढा. हळूहळू बॉडीवर ग्लो आलेला दिसून येईल.

शायनिंग केस

रुक्षपणामुळे केस निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे त्यांना सॉफ्ट आणि सिल्की लुक देण्यासाठी हेअर स्पा करणे जरुरी आहे. हेअर स्पा केल्याने स्कॅल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढते. डिटॉक्सिफिकेशन होते, हेअर फॉल थांबतो आणि त्याचबरोबर केसांना भरपूर पोषणही मिळते, जे केसांसाठी खूप आवश्यक असते.

घरगुती उपाय : घरगुती कंडिशनर म्हणून अंडयात लिंबाचा रस मिसळून त्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळावे. हे मिश्रण केसांना अर्धा तास लावून ठेवावे. मग शॅम्पू करावे, मग पाहा तुमचे शायनी केस कसा तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात.

सॉफ्ट हॅन्ड आणि फूट

सणासुदीच्या काळात फक्त आपला चेहराच महत्वाचा नसतो तर आपले हात आणि पायही तितकेच आकर्षणाचे केंद्र असतात. म्हणूनच त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनिक्युअर आणि पॅडीक्युअर करत रहा. यामुळे तुमच्या हात आणि पायांचे सौंदर्य तर वाढेलच आणि त्याच बरोबर ते सॉफ्टसुद्धा होतील.

घरगुती उपाय : सर्वप्रथम नेलपॉलिश काढून टाका. त्यानंतर अर्धा टब कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा शँम्पू, १ चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड आणि थोडेसे अँटिसेप्टिक लोशन टाकून त्यात आपले हात ५ मिनिटे डिप करून ठेवा. स्क्रबरच्या मदतीने डेड स्किन काढून टाका. शेवटी मॉईश्चरायजिंग क्रीमने हातांना मसाज करा.

घरीच पेडिक्युअर करण्यासाठी अर्धा टब कोमट पाणी घेऊन त्यात १ चमचा शॅम्पू, १ चमचा मीठ आणि थोडेसे अँटिसेप्टिक लोशन टाकून त्यात आपले पाय १० मिनिटे डिप करून ठेवा. असे केल्याने नखे मऊ होतील. आता स्क्रबर घेऊन डेड स्किन रिमूव्ह करा आणि नखांना कापून फाइल करा. यानंतर क्युटिकल पुशरने क्युटिकल्सना पुश करून क्युटिकल कटरने काढून टाका. शेवटी मॉईश्चरायजिंग क्रीमने पायांना मसाज करा.

मेकअपच्या आधी क्लिनिंग

चांगल्या मेकअपसाठी स्वच्छ आणि चमकदार त्वचा ही पहिली आवश्यकता आहे. यासाठी सर्वप्रथम त्वचा क्लीन करा. त्वचा क्लीन करायला तुम्ही क्लिंझिंग मिल्कचा वापर करू शकता. कापसावर क्लिंझिंग मिल्क घेऊन चेहरा, मान आणि जवळचा एरिया क्लीन करा. क्लिनिंग नंतर टोनिंग करणे अतिशय आवश्यक आहे. टोनिंगसाठी चांगल्या क्वालिटीचा टोनर वापरा.

टोनिंगसाठी बर्फाचा वापरही करू शकता. मग चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून मेकअप करायला सुरुवात करू शकता. फेस्टिव्ह मूड एक्साइटमेंटने भरलेला असतो, ज्यामुळे घामही पुष्कळ येतो. त्यामुळे मेकअप हा वॉटरप्रुफ असणे आवश्यक असते. यासाठी आपल्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावा आणि ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्टचा वापर जरूर करा.

ओठांना द्या सुंदर टच

जर ओठ गुलाबांच्या पाकळयांप्रमाणे असतील तर चेहरा अतिशय मोहक दिसतो. जर तुम्हालाही आपले ओठ सुंदर दिसावेत असे वाटत असेल तर ओठांना लिप लायनरने शेप द्या. जर ओठ जाड असतील तर लायनर नॅचरल लायनिंगपासून थोडे आत लावा आणि जर ओठ पातळ असतील तर नॅचरल लाइनच्या थोडे बाहेर लावा.

आय मेकअप

आय मेकअपसाठी फक्त वॉटरप्रुफ प्रॉडक्टचाच वापर करा. चांगल्या मेकअपसाठी बेस सर्वप्रथम आवश्यक असतो. जर तुमच्या त्वचेवर एखादा डाग असेल तर त्यावर कंसीलर लावून तो कंसील करा. जर डोळयांखालील काळी वर्तुळे लपवायची असतील तर एक शेड डार्क कंसीलर लावा.

उत्सवाच्या वेळेस डोळे आकर्षक वाटण्यासाठी रेड किंवा मरून आयशॅडो डोळयांच्या जवळ थोडा लाइट आणि बाहेरच्या बाजूस थोडा डार्क लावा. तुम्हाला हवे असल्यास रात्रीच्या वेळेस तुम्ही गोल्डन कलरची स्पार्कल डस्टही वापरू शकता. आयब्रोजच्या खाली हायलाइटर लावा. शेड्सनुसार हायलाइटर गोल्डन किंवा सिल्व्हर निवडू शकता. आता आयलाइनर लावा. मग पापण्यांना कर्ल करा.

जर तुम्ही रात्री मेकअप करत असाल तर मस्कारा डबल कोटमध्ये लावणे उत्तम. मग आयब्रोजना आयब्रो पेन्सिलने शेप द्या. जर तुम्हाला आयशॅडो लावायचा नसेल तर डोळयांना कलरफुल लायनरने सजवा. शेवटी काजळ लावून डोळयांना द्या एक आकर्षक लुक.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...