- दिप्ती अंगरीश
मेकअप करतानाही सावधपणा बाळगला नाहीत, तर दुर्घटना घडू शकते. याची उदाहरणे आपल्याला आपले फ्रेंडसर्कल व नातेवाइकांमध्ये मिळतील. कंगवा, लिपस्टिक, मस्कारा, काजळ, ब्लशर, फाउंडेशन, आयशॅडोची शेअरिंग अगदी सामान्य आहे. आपली ही सवय सुधारा अन्यथा उशीर केल्यास याचा आरोग्यावर विपरित परिणाम होईल.
ओलाव्यापासून दूर राहा
जिथे ओलावा असतो, तिथे कीटाणू उत्पन्न व्हायला सुरुवात होते, ते आजारपणाला खुलेआम आमंत्रण देतात. हीच गोष्ट आपल्या व्हॅनिटी बॉक्समध्ये उपलब्ध असलेल्या कॉस्मॅटिक्सवरही लागू होते. वापर केल्यानंतर प्रत्येक कॉस्मॅटिकला घट्ट बंद करा. लक्षात ठेवा, ओलावा पोहोचताच, कीटाणूंना कुठेही पोहोचायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्या मेकअप कंटेनरला चांगल्याप्रकारे बंद करायला विसरू नका. जर मेकअपच्या वस्तूंपर्यंत मॉइश्चर पोहोचले, तर कीटाणूंना त्यात घर बनवायला वेळ लागणार नाही आणि हे त्वचेच्या कॅन्सरचे कारण बनू शकते.
व्हॅनिटीची सफाई
आपल्या व्हॅनिटीचा वापर केवळ नटण्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका. आठवड्यातून एक दिवस व्हॅनिटीची सफाई जरूर करा. विशेषत: मेकअपमध्ये उपयोगी पडणारे ब्रश. पाणी आणि डिटर्जंटने ब्रश स्वच्छ करत असाल, तर त्यांना स्वच्छ, कोरड्या कपड्याने पुसल्यानंतर उन्हात जरूर सुकवा. मेकअप ब्रशची ब्रिसल तुटली असेल किंवा ब्रश जुना झाला असेल, तर त्याऐवजी नवीन ब्रशचा वापर करा. वेळेवर मेकअप ब्रश बदलत राहा. लक्षात ठेवा, मेकअप ब्रशबाबत निष्काळजीपणा आपल्याला महागात पडू शकतो. म्हणजेच ओलव्याचा एक कणही फंगल इन्फेक्शनद्वारे गंभीर त्वचारोगाला आमंत्रण देऊ शकतो.
स्पाँजचा मोह चुकीचा
नटण्यासाठी केवळ व्हॅनिटीचा उपयोगच महत्त्वाचा नाहीए. नियमित अंतराने त्यांची स्वच्छताही आवश्यक आहे. मेकअपसाठी ब्रशनंतर स्पाँजचा वापर आपण जरूर करत असाल. लक्षात ठेवा, स्पाँजच्या स्वच्छतेकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कॉम्पॅक्टसाठी वापरात येणारा स्पाँज आणि पावडरसाठी उपयोगात येणारा पफ नियमित कालावधीने बदलत राहा. असे न केल्यास चेहऱ्यावर असलेली धुळ स्पाँज किंवा पफवर चिकटते.
असा करा चेहरा क्लीन
फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेसंबंधी रोगांपासून वाचण्यासाठी चेहऱ्याची डीप सफाई खूप आवश्यक आहे. आपली त्वचा नॉर्मल किंवा तैलीय असेल, तर कोल्ड वाइपअप करा. थंड किंवा बर्फाच्या पाण्यात नॅपकिन बुडवून ठेवा. या नॅपकिनने रात्री मेकअप असलेला चेहरा स्वच्छ करा. अशा प्रकारे रंध्र स्वच्छ होतील आणि घाणही जमा होणार नाही. आपली त्वचा कोरडी असेल, तर रोज चेहरा मॉइश्चरायजरयुक्त क्लिंजरने स्वच्छ करा. त्यामुळे चेहरा रूक्ष राहणार नाही.