* शोभा कटारे
दिर्घकाळ सोबत राहिल्यानंतर पती-पत्नी असो वा लिव इन पार्टनर, दोघे एकमेकांबाबत निष्काळजी होऊ लागतात. निष्काळजीपणा हळूहळू सवयीत बदलतो आणि नात्यांमध्ये दरार बनण्याचं कारण बनतं. अशावेळी समजूतदारपणे काम केलं नाही तर नात्यांची मूळं कमजोर होऊ लागतात. म्हणून नातं नवीन असो वा जूनं वेळोवेळी एकमेकांना स्पेशल फील करत राहणं गरजेचं आहे. यामुळे आपापसातील प्रेम आणि विश्वास वाढतो.
अलीकडच्या काळातील धावपळीच्या आयुष्यात अनेक घरांमध्ये जोडपी ऑफिसमध्ये जातात वा मग वर्क फ्रॉम होम करत आहेत. अनेकदा दोघांच्या ऑफिसच्या वेळा वेगवेगळया देखील असतात. ज्यामुळे त्यांच्या जवळ वेळेचा अभाव राहतो. ते एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. अशावेळी वेळेच्या अभावामुळे हळूहळू जोडप्यांमध्ये दुरावा येऊ लागतो. जो पुढे जाऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो.
लक्षात घ्या की कोणतंही नातं यशस्वी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्यक्तीला योग्य वेळ द्यावीच लागते. जर तुम्ही खूप व्यस्त रहात असाल तर तुमच्या जोडीदारासोबत काही क्षण क्वालिटी टाईम नक्कीच घालवा. वर्क फ्रॉम होममध्ये देखील तुम्ही दोघे सुट्टी घेऊन एकमेकांसोबत एक आठवणीतला काळ घालवू शकता. असं केल्यामुळे तुम्ही त्यांच्या मनात चालणाऱ्या नकारात्मक तसंच त्यांचा एकटेपणा देखील दूर करू शकाल.
दांम्पत्यामधील गोडवा
दांपत्यामध्ये गोडवा कायम राखण्यासाठी काही स्पेशल करा. एकमेकांना स्पेशल फील करविण्यासाठी कुठेतरी बाहेर जाण्याऐवजी घरच्या घरीच जोडीदारासोबत हेल्दी आणि टेस्टी डिश बनवा. अशा डिशची निवड करा जी तुम्ही दोघे मिळून बनवू शकाल. म्हणजे तुम्ही एकमेकांना मदत करू शकाल. तसंच एकमेकांसोबत अधिक काळ आणि आठवणीतला काळ घालवू शकाल. सोबत बसून खाण्याची मजा घेऊ शकता. भलेही तुमच्या घरी खाणं बनवण्यासाठी प्रोफेशनल कूक असला तरी देखील एखाद्या सुट्टीच्या दिवशी पती-पत्नी दोन्ही मिळून जेवण बनवा आणि एकत्र जेवण करा.
जोडीदारासोबत काही देखील बनविण्यापूर्वी एकमेकांशी डिस्कस नक्कीच करा आणि एकमेकांचे सल्ले मागण्यात संकोच करू नका. अशाप्रकारे तुम्ही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवू शकता आणि तुमच्या सुट्टीची खूप मजा घेऊ शकता. जर पत्नीने पतीची आवडती डिश बनवली असेल तर पतीने त्यांच्या पसंतीची एखादी आवडती गोष्ट बनवावी. यामुळे दोघांना स्पेशल फील वाटेल आणि एकमेकांसाठी प्रेम आणि विश्वास वाढेल.
तुमचं नातं मजबूत बनवण्यासाठी एकत्र मिळून जेवण बनविल्यानंतर वा या दरम्यान या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा :
आभार माना
किचनमध्ये त्यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रत्येक मदतीसाठी त्यांचे आभार मानायला विसरू नका. तुम्ही असं केल्यामुळे त्यांना खूप छान वाटेल आणि तुमचं बॉण्डिंगदेखील छान बनेल.
कॉम्प्लिमेंट नक्की द्या
जोडीदाराला दिलेलं तुमचं एक कॉम्प्लिमेंट खूप मोठी जादू करू शकतं. तुम्ही असं केल्यामुळे तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वास वाढेल. ज्यामुळे तुमचं आपापसातील प्रेम अधिक वाढेल.
कौतुक करायला विसरू नका
कौतुकाचे दोन शब्द प्रत्येक नात्याला दृढता देतं. म्हणून जोडीदाराच्या चांगल्या सवयी, चांगलं काम, केअरिंग नेचर आणि सकारात्मक विचारसरणीचं नेहमी कौतुक करा. जेव्हादेखील जोडीदार काही नवीन आणि क्रिएटिव्ह करेल तेव्हा त्यांचं कौतुक करायला विसरू नका. तुम्ही केलेल्या कौतुकाचा प्रत्येक शब्द त्यांना वेगळा आनंद देईल. यामुळे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल आणि तुमच्या नात्याला दृढता मिळेल.
तुमच्या बोलण्याचा अंदाज बदला
जर तुमच्या जोडीदाराच्या कोणत्या कामाचा त्रास होत असेल वा त्यांची कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्यांना वाईट वाटेल अशा शब्दात सांगू नका. जसं की, जोडीदाराचं कोणतं काम आवडत नसेल तर त्यांना हे सांगू नका की हे काम तुम्ही चांगलं केलं नाही वा तुम्हाला नाही येत. याउलट असं सांगा की तुम्ही मला खूप मदत केली आहे यासाठी खूप आभार. त्यांना शिकवा की पहा असं करतात म्हणजे पुढच्या वेळी ते नक्कीच तुमच्या आवडीनुसार काम करू शकतील.
तुम्ही हवं असल्यास एकमेकांच्या मदतीने व्हेज पुलाव आणि रायत डिशची निवड करू शकता. या डिशमध्ये तुम्ही भाजी कापणं आणि रायत बनवणं जसं की दही घोटणं, बुंदी तसंच मसाले टाकणं, मिक्स करण्यासाठी पतींची मदत घेऊ शकता. इतर डिशची तयारी तुम्ही करू शकता. जसं की, भात बनवणं, तळणं इत्यादी डिश तयार झाल्यानंतर ती टेबलवर सजविण्यासाठीदेखील सांगू शकता. तर चला आज स्वयंपाक घरात तुमच्या जोडीदारासोबत बनवा वेजिटेबल पुलाव आणि रायतं म्हणजेच एक हेल्दी आणि टेस्टी डिश.
प्रमुख साहित्य
१ कप तांदूळ, ५ छोटे चमचे रिफाइंड तेल, अर्धा कप मटरचे दाणे, अर्धा कप बटाटे, अर्धा कप फ्लावर, १०-१५ बीन्स, २-३ गाजर, २ कांदे मोठे, १ चमचा जिरा, ३ मोठे चमचे बिर्याणी मसाला वा हवं असल्यास खडे मसाले जसं की लवंग, काळी मिरी, वेलची, तमालपत्र, जायफळ इत्यादी देखील घेऊ शकता. यांना थोडंसं परतवून घ्या आणि नंतर बारीक वाटून घ्या. मीठ चवीनुसार.
साहित्य रायत्याचं
५०० ग्रॅम दही, २०० ग्रॅम बुंदी, १ हिरवी मिरची, पाव चमचा लाल तिखट, १ चमचा भाजलेलं तसंच वाटलेलं जिरं, पाव चमचा काळी मिरी, काळ मीठ, पांढरं मीठ चवीनुसार. तुम्ही हवं असल्यास रायत्याच्या मसाल्याचा देखील वापर करू शकता.
कृती
तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. ३ कप पाण्यात तांदूळ टाकून एका भांडयात शिजण्यासाठी ठेवा. जेव्हा तांदूळ ८० टक्के शिजतील तेव्हा पाणी काढून एका चाळणीमध्ये टाका आणि पसरवा.
एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे टाका व कांदा टाका. जेव्हा कांदा गुलाबी होईल तेव्हा कापलेल्या भाज्या टाका आणि मीठ टाकून शिजवा. जेव्हा भाज्या शिजतील तेव्हा बिर्याणी मसाला वा घरच्या घरी बनलेला मसाला टाका आणि थोडा वेळ परतवा.
आता कढईत शिजलेला भात टाका आणि भाज्यांसोबत व्यवस्थित एकत्रित करून थोडावेळ आणखीन शिजवा. व्हेजिटेबल पुलाव तयार आहे.
तयार व्हेजिटेबल पुलाव सर्व्हिंग बाऊलमध्ये टाका आणि कोथिंबीर, खोवलेला नारळ टाका आणि सजवा. तुम्ही हवं तर सजविण्यासाठी तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता.
रायताची कृती
तुम्ही हवं असल्यास रायतं बनविण्यासाठीदेखील तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता. एका बाऊलमध्ये फेटलेलं दही घेऊन त्यामध्ये बुंदी आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्या. कोथिंबीरने सजवा. रायतं तयार आहे. अशा प्रकारे तुमच्या जोडीदारासोबत व्हेजिटेबल पुलाव आणि रायत्याची मजा घेऊन नात्यांचा गोडवा अधिक गोड करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत बनवा खाण्याचे फोटो घ्यायला विसरू नका म्हणजे हे क्षण तुमच्यासाठी आठवणीतले बनतील.
दांपत्य जीवनात गोडवा कायम राखण्यासाठी वेळोवेळी एकमेकांना स्पेशल फील करणं गरजेचं असतं. छोटया छोटया गोष्टींनीदेखील एकमेकांबाबत प्रेम दाखवून आपापसातील नात्यांमध्ये गोडवा घोळवून नात्यांमधील कडवटपणा दूर केला जाऊ शकतो.





