* गरिमा पंकज
लग्न एक सुंदर नातं आहे, जे प्रेम आणि विश्वासावरती टिकून असतं. जेव्हा दोन प्रेम करणारे जीव एकमेकांशी लग्न करतात तेव्हा आयुष्यातील सर्व रंग मिसळतात. आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याची अनुभूती वेगळीच असते. परंतु अनेकदा समाज, कुटुंब खासकरून नातेवाईक प्रेमाच्या बाबतीत थोडे कंजर्वेटिव्ह होतात. जिथे तरुणांना आपला जोडीदार निवडणं आणि प्रेमाच्या आकाशात उड्डाण करण्याची मुक्तता हवी असते, तिथे त्यांचे आई-वडील अनेकदा स्वत:ला समाज, परंपरा, जाती, धर्मासारख्या मापदंडामध्ये अडकलेले दिसतात आणि अगदी तिथेच खरी टक्कर सुरू होते. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की पालकांना या लग्नासाठी कसं तयार करायचं?
जर तुमचं मनापासून कोणावर प्रेम असेल आणि त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं असेल आणि तो देखील तुमच्यावर खूप प्रेम करत असेल परंतु तुमचे पालक या प्रेमाच्या विरुद्ध असतील आणि त्यांना वाटत नसेल की तुम्ही त्या मुलाशी लग्न करावं. पालकांना स्वत:च्या मर्जीने तुमचं लग्न करायचं आहे. अशावेळी तुम्ही काय कराल? शांतपणे आपल्या स्वप्नांचा गळा घोटून पालकांचं म्हणणं ऐकणार की मग पालकांना सोडून त्या मुलासोबत स्वत:चा संसार थाटणार?
जसं की आम्हाला माहित आहे की आजच्या काळामध्ये मुली स्वत:ची स्वप्नं आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगू इच्छितात. अशा अनेक मुली आहेत ज्या स्वत:च्या आयुष्याचे मोठे निर्णय स्वत:च घेतात. जर त्यांना पालकांचं म्हणणं नाही पटलं तर त्याविरुद्ध आवाज उठवतात. अनेकदा अशा परिस्थितीत मुलींना आपल्या पालकांचे घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु काही झालं तरी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वत: होऊन पालकांना या लग्नाला तयार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा.
कोणत्या कारणांमुळे पालक तयार होत नाहीत
कुटुंब : लव मॅरेजसाठी नकार हा कुटुंबामुळे देखील होतो. मुलगी वा मुलाच्या कुटुंबांचा एखादा गुन्हेगारी रेकॉर्ड असेल किंवा मग त्यांना गुंडगिरीसाठी ओळखलं जात असेल तर प्रेमविवाहात अडचणी येऊ शकतात.
वेगळी जात आणि धर्म : भारतामध्ये लग्नपूर्वी जात आणि धर्म प्रथम पाहिला जातो. धर्माचे ठेकेदार आणि धर्म ग्रंथांनी लोकांच्या मनामध्ये वेगळा धर्म वा जातींविरुद्ध लोकांमध्ये कडवटपणा आणि वैमनस्यांची पाळंमुळं एवढी खोल रुजवली आहेत की अनेक लोकं एकमेकांचा राग करू लागलीत आणि शिवाशिवीच्या भिंती मजबुतीने एवढ्या उभ्या करण्यात आल्या आहेत की त्याची नुकसान भरपाई तरुण प्रेमींना भोगावी लागतेय.
समाजाची भीती : अनेक कुटुंबीयांसाठी स्वत:च्या मुलांचा आनंद सर्वाधिक असतो, म्हणून ते जात, धर्म आणि कुटुंबीयांच्या इतिहासाबद्दल जास्त विचार करत नाहीत. परंतु समाजाची भीती त्यांच्या मनामध्ये असते. सामाजिक बहिष्कार आणि बदनामीच्या भीतीने ते आपल्या मुलांच्या प्रेमविवाहाच्या आड येतात.
आर्थिक स्थिती : श्रीमंत कुटुंबातील मुलगा वा मुलगी स्वत:हून कमी पैशेवाल्या कुटुंबातील मुलगा वा मुलीशी प्रेम करतात तेव्हा देखील पालक त्यांच्या लव मॅरेजसाठी तयार होत नाहीत.
वयाचं अंतर : प्रेम विवाहात एक समस्या वयातील अंतरसुद्धा आहे. जर तुमच्या वयाचं अंतर प्रेम विवाह करणाऱ्यापेक्षा जास्त वा कमी असेल तरी देखील आई-वडील प्रेम विवाह करण्यास राजी होणं कठीण असतं.
पालकांना कसं कराल राजी
काही काळापूर्वी ‘टू स्टेट्स’ हा सिनेमा आला होता, जो चेतन भगतने लिहिलेल्या ‘टू स्टेट्स’ या कादंबरीवर आधारित होता. या सिनेमात हीच समस्या होती. आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर दोन वेगळी राज्य, वेगळी संस्कृती आणि भाषा असणाऱ्या घरातील असतात. आलिया भट्ट साउथ इंडियन तर अर्जुन पंजाबी. दोघांना आपल्या पालकांना राजी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. परंतु शेवटी दोन्ही कुटुंबीय या नात्यांना होकार देतात. तुम्ही देखील प्रयत्न करा, कदाचित तुमचे पालकदेखील लग्नासाठी तयार होतील. परंतु यासाठी तुम्हाला प्रयत्न खूप करावे लागतील. तुमच्या आई-बाबांना प्रेम विवाहासाठी तयार करण्यास काही टिप्स आणि ट्रिक्स अशाप्रकारे आहेत :
तुमच्या नात्याबाबत आश्वस्थ व्हा
प्रेम विवाहसारख्या मोठ्या निर्णयाबाबत तुमच्या आई-वडिलांशी बोलण्यापूर्वी तुमच्या नात्यांबद्दल सुनिश्चित होणं खूपच गरजेचं आहे. तुमच्या जोडीदाराशी याबाबत चर्चा करा आणि विचारा की तुमच्या दोघांचं स्वत:चं नातं आणि लग्नबद्दल एकमत आहे का? जर तुमच्यापैकी कोणी कमिटमेंटला घाबरत असेल तर तुमच्या आई-वडिलांना तयार करण्याचे सर्वच प्रयत्न बेकार होऊ शकतात.
योग्य वेळ पाहून आई-वडिलांना सांगा
तुमच्या साथीदाराला तुमच्या घरी बोलावून आणि त्याला तुमचा खास मित्र म्हणून ओळख करून द्या. तुमच्या आई-वडिलांना प्रेमविवाहच्या तुमच्या विचारासाठी तयार करा. सणवार आणि खास प्रसंगी अनेकदा भेटल्यास मदत होते. छोट्या छोट्या भेटी तुमचे आई-बाबा आणि जोडीदाराला एकमेकांशी एकत्रित येण्यास वेळ देईल. ज्यामुळे असहजता दूर होईल. एकदा जर का ते एकमेकांसोबत मिसळले तर त्यांच्यामधील अडचण दूर करणं सहजसोपं होईल.
यशस्वी प्रेम विवाहतील उदाहरणं
जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना तयार करू इच्छित असाल तर त्यांना यशस्वी प्रेमविवाहाची ताजी उदाहरणं दाखवा. तुमच्या ज्या मित्राने असं केलंय त्याच्याबद्दल सांगा. त्यांना समजवा की जेव्हा तुम्ही लग्नाबद्दल विचार करता तेव्हा तुमच्यासाठी सर्वात जास्त काय महत्त्वाचं आहे जसं की त्याचा स्वभाव, उदारता, शिक्षण, योग्यता, अनुकूलता इत्यादी.
तुमची परिपक्कता सिद्ध करा
तुमच्या आई-वडिलांसाठी तुम्ही नेहमीच लहान मूल असणार, मग तुम्ही कितीही मोठे व्हा. त्यांना हे सिद्ध करून दाखवा की तुम्ही लहान नाही आहात आणि कुटुंबासाठी योग्य निर्णय आणि जबाबदारी घेऊ शकता. कौटुंबिक समस्यांमध्ये सहभागी व्हा. त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करा. जबाबदारी आणि समजूतदारपणे काम करा. असे निर्णय घ्या ज्यामुळे तुमची परीपक्कता सिद्ध होईल. यामुळे तुमचाच फायदा होईल आणि तुमच्या आई-बाबांना वाटेल की तुम्ही खूप परिपक्व आहात आणि तुमच्या आयुष्यासाठी चांगले निर्णय घेऊ शकता.
आईबाबांचं म्हणणं ऐका
जर तुम्हाला वाटत असेल की आई-बाबांनी तुमचं ऐकावं तर त्यांना देखील त्यांचे विचार मांडण्याची संधी द्या. त्यांचे विचार आणि चिंता ऐका. याबाबत घाई करू नका. त्यांना पूर्ण परिस्थिती समजण्यासाठी थोडा वेळ द्या आणि त्यांनी घातलेल्या अटींशी सहमत होण्याचा प्रयत्न करा.
जोडीदाराचे चांगले गुण सांगा
आई-वडिलांना तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी चांगलं होण्यामागची कारणं सांगा. नात्यांबाबत त्याची प्रामाणिकपणा आणि कमिटमेंटचा उल्लेख करा. जोडीदाराच्या चांगल्या गुणांबद्दल सांगत समजवा की तुम्ही आणि तुमचा जोडीदार हरप्रकारे एकमेकांसाठी अनुकूल का आहे, मग भलेही तुमची जात वा धर्म वेगळा असेल.
मित्र आणि नातेवाईकांची मदत घ्या
तुमच्या आईबाबांना प्रेमविवाहासाठी राजी करण्यास तुम्हाला एका अशा व्यक्तीच्या मदतीची गरज आहे जे त्यांना आवडतात आणि ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. हे तुमचे कुटुंबीय वा नातेवाईकांपैकी कोणीही एक असेल. तुमचा कोणी मित्रही असू शकतो, जो त्यांचा आवडता असेल वा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती ज्याचा ते खूप मान राखतात.
पालकांना समजवण्याचा प्रयत्न करा
ही लक्ष देण्याची आणि पाहण्याची वेळ आहे की तुमच्या आई-वडीलांपैकी कोण तुमच्याशी जास्त ओपन आणि फ्रेंडली आहे म्हणजे ते आई बाबा तुमच्यासाठी निवडलेल्या जोडीदारासोबत तुमच्या लग्नामध्ये मध्यस्थ होण्याची भूमिका साकारतील. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आई-बाबांपैकी एकाला तुमच्या प्रेमविवाहासाठी राजी करणं सोप आहे, तर त्या पालकावरती जास्त लक्ष द्या आणि त्यांना पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न करा.
दोन्ही कुटुंबांची भेट घडवा
तुम्ही दोन्ही कुटुंबांमध्ये भेट ठरवा आणि तुमच्या सासरच्यांना भेटणं, त्यांच्या परंपरा संस्कृती आणि मूल्यांबद्दल जाणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील परंपरा, कौटुंबिक पृष्ठभूमी आणि संस्कृतीसोबतच तुमच्या आई-बाबांबद्दल त्यांना समजवा.
पालकांवर दबाव टाका
पालकांवर दबाव टाकण्यासाठी तुम्ही तीन दिवस भुकेले राहू शकता. आपल्या मुलांनी भुकेलेलं पाहणं कोणत्याही पालकांसाठी सोपं नाहीये. अशा प्रकारे तुम्ही पेरेंट्सना बोलू शकता की या मुलाशी जर माझं लग्न झालं नाही तर मी कोणाशीच करणार नाही. तुम्ही पालकांशी बोलणं बंद करू शकता. तुम्ही घरातून बाहेर पडणं बंद करू शकता.





