* गृहशोभा
सातत्याने वाढणारे वजन शरीराला कित्येक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त करू शकते. जर तुम्ही कायम हेल्दी आणि फिट राहू इच्छिता, तर आपल्या डाएटमध्ये या गोष्टी सामील करायला विसरू नका :
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या अथवा पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. याव्यतिरीक्त अशा भाज्यांत भरपूर व्हिटॅमिन, आयरन आणि प्रोटीनसुद्धा असतं. या सर्व घटकांची वजन कमी करण्यास खुप मदत होते. हे घटक शरीरातील विषारी पदार्थांचा नाश करून शरीरात असलेले फोलेट, पोटेशियम आणि फायबर बूस्ट करतात.
गाईच्या दुधाचं पनीर
गाईच्या दुधापासून बनवण्यात आलेल्या पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते, तसेच फॅट आणि कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असतात. यात असलेला कॅल्शिअम फॅट बर्नच्या प्रक्रियेत मदत करतो. तुम्ही दुपारच्या जेवणात सलाड आणि पाण्याचा समावेश करून तुमचा कॅलोरी इंटेक मोठ्या प्रमाणात कमी करू शकता.
टोमॅटो
टोमॅटो वजन कमी करण्यास खूप मदत करतात. टोमॅटोमध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडंट नावाचा घटक असतो, जो वजन कमी करण्याच्या कामी येतो. हा घटक ना केवळ फक्त वजन कमी करण्यास मदत करतो, तर इतर कित्येक रोगांशी लढण्यास उपयुक्तदेखील ठरतो. सरतशेवटी, आपल्या आहारात टोमॅटो नक्की सामील करा.
अंडी
अंड्यात शरीरासाठी आवश्यक असणारे सगळे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात. अंड्यांमध्ये स्वास्थवर्धक फॅटसुद्धा असतात. यामुळेच जरी आपण अंडी कमी प्रमाणात खाल्ली, तरीसुद्धा पोट भरलेलं वाटतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही उकडलेल्या अंड्याच्या सफेद भागाचा तुमच्या नाश्त्यात समावेश करू शकता.
हंगामी फळे फ्रूट्स
बदलत्या हंगामानुसार उपलब्ध असलेल्या फळांचं सेवन करा. सिझनल फ्रूट्समध्ये नैसर्गिक शुगर असते, जी भूक नियंत्रित करण्यास मदत करते, तसेच या फळांमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाणसुद्धा सर्वाधिक असते. आंबा, डाळिंब, स्टॉबेरी, संत्री, पपई, पेरू इत्यादी फळे खाल्याने त्वचेला कोलोजन नावाचा प्रोटीनयुक्त घटक मिळतो व त्वचा तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यांमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एक्सट्रा फॅट बर्न होते. फळांचं सेवन वजन कमी करण्यात खूप लाभदायी ठरतं.
दलिया
भरपूर प्रमाणात फायबर असल्याकारणाने फॅट कमी करणारं सर्वात शक्तीशाली तत्व म्हणून दलियाला संबोधलं जातं. यामध्ये विरघळणारे फायबर असतात, जे पचनयंत्राच्या माध्यमाद्वारे धीम्या गतीने बाहेर पडतात, ज्यामूळे खूप वेळ भूक लागत नाही. दलिया रक्तातील शुगर लेवलला स्थिर ठेवते. दलिया जलद गतीने वजन घटवण्याच्या प्रक्रियेत फायदेशीर ठरते. दलिया शरीरातील एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास तसेच धमण्यांना स्वच्छ आणि साफ ठेवण्यासदेखील मदत करते.
डाळी
डाळींमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटिन्स असतात. डाळींचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात. डाळींमध्ये कोणत्याही प्रकारचं फॅट नसतं. डाळीचे सेवन केल्याने शरीरात असलेले अतिरिक्त फॅटसुद्धा कमी होते. डाळींमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या पेशींनासुद्धा पूर्ववत करण्याची क्षमता असते. म्हणून दिवसातून एकदा तरी डाळीचं सेवन जरूर करा. डाळी फक्त वजन कमी करण्यास उपयोगी नसतात, तर संपूर्ण शरीराच्या हेल्थच्या दृष्टीनेसुद्धा लाभदायी असतात.
सफरचंद
सफरचंदात कॅलोरी, फॅट आणि सोडियमचे प्रमाण कमी आणि व्हिटॅमिन, खनिज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. सफरचंदात असलेले हे सगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतात. कमी कॅलोरीचा अर्थ असा आहे कि, तुम्ही अधिक ऊर्जा न खपवता खूप प्रमाणात सफरचंद खाऊ शकता. कच्या कापलेल्या एक बाउल सफरचंदात ६५ कॅलोरीज असतात. फॅट अजिबात नसतं. एका मध्यम आकाराच्या सफरचंदात ११० कॅलोरीज असतात.
आळशी
आळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबरसारखे घटक असतात. हे घटक वजन नियंत्रित करायला मदत करतात. आळशीचे सेवन जेवणाच्या आधी अथवा जेवणासोबत केले, तर पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकदेखील कमी लागते. आळशीमधील तंतूमय घटक पचन सुलभ करतात. त्यामुळे वजन नियंत्रण करण्यात आळशी गुणकारी आहे. आळशीच्या सेवनाने लिवर निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते.
सोया
सोया खूप चविष्ट आणि लिन प्रोटीनने परिपूर्ण स्रोत आहे. त्यामुळे काही लोकांच्या जेवणात याचे अमूल्य स्थान असते. सोया मिल्कमध्ये १ वाटी दलिया आणि पूर्ण तृणधान्यांऐवढे गुण असतात, जे खाल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट हृदय आणि त्वचेसाठी सगळ्यात चांगला स्रोत आहे. हे पचनयंत्राच्या गतीला धीमी करतं. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल, तर डार्क चॉकलेट खाल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. जर तुम्हाला खूप वेळ कामानिमित्त बाहेर राहावं लागणार असेल आणि तिथे जेवणाची कोणतीही सोय नसेल, तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता





