* अवनीश शर्मा

सीमाने ऑफिसमधून मोबाइलवरूनच आपल्या प्रमोशनची न्यूज आपल्या पतीला म्हणजेच राजीवला सांगितली. त्याने जेव्हा ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली, तेव्हा पूर्ण घरात आनंदाची लहर पसरली.

‘‘किती फरक पडेल आता तिच्या पगारात?’’ राजीवचे वडील रमाकांत यांच्या डोळ्यांत लोभाची चमक स्पष्ट झळकू लागली.

‘‘माझ्या मते निदान ३०-४० हजारांचा फरक तरी पडला पाहिजे. शेवटी, वहिनी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते,’’ त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मोठ्या मुलाऐवजी छोट्या मुलाने म्हणजेच संजीवने मोठ्या उत्साहात दिलं.

या नंतर काही वेळ हॉलमध्ये शांतता होती. मग एकेक करून प्रत्येकजण आपापल्या मनातील इच्छा प्रकट करू लागले.

‘‘आता माझं कोटामध्ये अॅडमिशन करून दे दादा,’’ सविताने मोठ्या आपुलकीने राजीवला आपली इच्छा सांगितली.

‘‘माझी बाइक ‘लिस्ट’ मध्ये सर्वात टॉपला असणार,’’ संजीवच्या आवाजात थोडा उच्च स्वर होता. ‘‘मेट्रोचे धक्के खाऊन खाऊन मी आता कंटाळलो आहे.’’

‘‘हे सगळे खर्च नंतर होतील. आधी टेरिसवर दोन रूमचा सेट बनेल,’’ रमाकांतच्या कठोर आवाजाने सविता आणि संजीवच्या डोळ्यांत नैराश्याचे आणि दु:खाचे भाव झळकले.

‘‘आपल्याला काही पैसे साठवूनसुद्धा ठेवले पाहिजेत,’’ राजीवच्या आईने सुचित्राने सगळ्यांना समजावले, ‘‘उद्या सविताचंसुद्धा लग्न करायचं आहे आपल्याला. हिच्या नावाने बँकेत काही पैसे प्रत्येक महिन्याला नक्की जमा झाले पाहिजेत.’’

राजीवने आपल्या मनातील इच्छा तोंडावर आणू दिली नाही. तो एका सरकारी शाळेत रसायन विज्ञान शिकवायचा. एखादी छोटी मोठी फॅक्ट्री किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट सुरु करण्याची इच्छा कित्येक वर्षांपासून त्याच्या मनात होती. सीमाच्या वाढलेल्या पगारावर आता बँकेतून लोन मिळेल. त्या पैशातून तो टेरिसवर २ ऐवजी ४ खोल्या बांधू इच्छित होता. निरुपयोगी असलेल्या खोल्यांमध्ये आधी कोचिंग सेंटर सुरु करण्याची इच्छा मनात खोलवर रुजत जात होती, पण राजीवने याविषयी सगळ्यांसमोर चर्चा केली नाही.

फक्त ४ वर्षाच्या असलेल्या सीमाच्या मुलाला आपल्या आईच्या वाढलेल्या पगारात काही रुची नव्हती आणि तो कार्टून चॅनल पाहण्यात मग्न होता. सीमा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आली, तेव्हा तिचं अगदी जल्लोशात स्वागत झालं. ऑनलाइन चायनीज ऑर्डर करण्यात आलं. ड्रॉईंग रूममध्ये तासभर चालणाऱ्या पार्टी दरम्यान सगळ्यांनी सीमासमोर आपापल्या मनातल्या इच्छा व्यक्त केल्या.

घरातले सगळे सदस्य इतके जास्त उत्साही आणि प्रसन्न होते कि, कोणालाच सीमाच्या डोळ्यांत तरळणारे टेन्शन आणि चिंतेचे भाव दिसले नाहीत.

सीमाने आपल्या मनात चाललेली घालमेल काही वेळाने आपल्या बेडरूममध्ये एकांतात राजीवला सांगितली.

‘‘मी मिळालेलं प्रमोशन अजून एक्ससेप्ट केलेलं नाही आहे. परवा सोमवारी मला ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये कन्फर्म उत्तर द्यायचं आहे,’’ थकलेली सीमा बेडवर बसली.

‘‘आजचं ‘हो’ बोलण्यात तुला काय अडचण होती?’’ राजीवने आपली नाराजगी दर्शवली.

‘‘जर का मी ‘हो’ बोलली असती, तर मला हे शहर सोडून लखनऊला जायला लागेल. तिथे ओपन होणाऱ्या नव्या ब्रांचमध्ये पाठवण्यात येत आहे मला.’’

‘‘हे तर चुकीचं आहे,’’ राजीवला प्रचंड राग आला. ‘‘तू मॅरीड आहेस आणि एका ४ वर्षाच्या मुलाची आई आहेस, या दोन्ही गोष्टींची माहिती नाही आहे का तुझ्या सिनिअर ऑफिसर्सना?’’

‘‘आहे, पण आजकाल अशा गोष्टींना महत्व दिलं जात नाही राजीव. जर मला प्रमोशन हवं असेल, तर मला लखनऊला जावंच लागेल.’’

‘‘जर आता तू हे प्रमोशन स्वीकारण्यास नकार दिलास, तर हेचं प्रमोशन तुला काही काळानंतर पुन्हा मिळेल का?’’

‘‘माझ्या नकार देण्याने प्रमोशन निदान २ वर्षांसाठी तरी पोस्टपोन होईल. त्यानंतर सुद्धा हे प्रमोशन मिळेलच, याची काही गॅरेंटी नाही आहे.’’

‘‘हे प्रमोशन तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टन्ट आहे ना?’’ काही वेळेच्या शांततेनंतर राजीवने तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत विचारलं.

‘‘हा पण काही प्रश्न झाला का?’’ सीमा एक्साईट होऊन म्हणाली, ‘‘पूर्ण एकरूपतेने आणि मेहनतीने काम करण्याचं बक्षीस आहे माझ्यासाठी हे प्रमोशन. सोमवारी या प्रमोशनसाठी ‘नकार’ कळवताना मला वाटतंय मी रडेन.’’

‘‘आणि जर का ‘होकार’ दिला, तर खूप साऱ्या अडचणी लगेचच आ वासून समोर उभ्या राहतील,’’ राजीव गंभीर स्वरात म्हणाला.

‘‘सगळ्यांत मोठी अडचण तर ही येईल कि, तुम्ही सरकारी नोकरी सोडू शकत नाहीत आणि सगळ्यांपासून लांब एकटं राहणं मला जमणार नाही. माझ्या छोट्या रोहितमध्ये तर माझा जीव अडकला आहे.’’

‘‘आणि त्याच्या वडिलांमध्ये?’’ राजीवने विनोदी भावाने विचारले.

‘‘तू तर माझा जीव आहेसच,’’ भावुक झालेल्या सीमाने उठून राजीवला मिठी मारली.

‘‘जे होणार असेल ते होईल. तू टेन्शन घेऊ नकोस,’’ राजीवने प्रेमाने तिला फोरहेड किस केले आणि बेडरूममधून बाहेर आला.

प्रमोशनमुळे सीमाला लखनऊला जावं लागेल, ही गोष्ट काही सेकंदातच राजीवद्वारा घरातील सगळ्या सदस्यांना कळली. सगळ्यांच्या डोळ्यांत आता उत्साह आणि आनंदाऐवजी टेन्शन आणि अस्वस्थतेचे भाव तरळू लागले. रात्रीचं जेवण सगळ्यांनी नाराजीच्या अधिनतेखाली केलं. त्यानंतर सर्व ड्रॉईंग रूममध्ये येऊन बसले. प्रमोशन वरून एकमेकांशी चर्चा करण्याची सुरवात रमाकांतने केली.

‘‘डोकं शांत ठेवून विचारविनमय केला, तर सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळतं,’’ त्यांनी गंभीर स्वरात बोलायला सुरवात केली, ‘‘प्रमोशनचं २ वर्षांसाठी टळलं जाणं, सीमाच्या करिअरसाठी चांगलं ठरणार नाही. दुसऱ्या बाजूला तिच्या लखनऊला जाण्याने खूप अडचणी निर्माण होतील. आता प्रश्न हा उपस्थित होतो कि, आपण या सगळ्या प्रॉब्लेम्सवर काही सोल्युशन शोधून काढू शकतो कि नाही?’’

‘‘मला एकटीने लखनऊला जाऊन राहणं अजिबात शक्य होणार नाही,’’ सीमाच्या बोलण्यातून खोल दु:ख आणि निराशा जाणवली.

‘‘वहिनी, तुम्हाला अशी हिम्मत हारून चालणार नाही. लग्नाआधी तुम्ही हॉस्टेलला एकटं राहून तुमचं एमबीएसुद्धा पूर्ण केलं होतं. लखनऊला एकटं रहाणं कठीण तर असेल, पण या कामाला तुम्ही अशक्य समजू नका,’’ संजीवने अगदी जोशात सीमाची हिम्मत वाढवली.

‘‘सगळ्यांपासून लांब राहण्याचा विचार करून पण माझ्या मनाचा थरकाप उडतो. इथे सगळ्यांची किती मदत होते मला. ऑफिसवरून परत येते, तेव्हा जेवण तयार असतं. आजारी पडले तर, काळजी घेणाऱ्यांची काहीच कमी नाही आहे इथे. नाही कपडे धुण्याचं टेन्शन आहे, नाही त्यांना इस्त्री करण्याचं. ऑफिसमध्ये १०-१२ तास काम केल्यावर, तिथे ही सगळी कामं करण्याची हिम्मत व ताकद माझ्यात कुठून येईल?’’ सीमाचे डोळे पाणावले.

‘‘गरज पडली कि, हिम्मत आणि ताकद निसर्ग देतो,’’ सुचित्राने प्रेमाने आपल्या सुनेला समजावले, ‘‘सुनबाई, तू सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सकाळीच बनवत जा आणि रात्रीचा टिफिन बाहेरून मागव. शनिवार आणि रविवारच्या सुट्टी दरम्यान आठवड्याभराचे कपडे धुवून प्रेस करून ठेवू शकतेस. ऑफिसमध्ये काम करणारे लोक तुझ्या कोणत्याही प्रकारच्या आजारपणात तुझ्या मदतीला धावून येणार नाहीत का?’’

‘‘आणि राहिला प्रश्न एकटीने राहण्याचा, तर आठवड्यातील दोन सुट्ट्यांमध्ये तू कधी आम्हाला इथे भेटायला येत जा, तर कधी मी आणि रोहित लखनऊला येत जाऊ. असं केल्याने तुला कधी फारसा एकटेपणा जाणवणार नाही,’’ राजीवने अजून एका अडचणीवर तोडगा शोधून काढला.

राजीव तिच्या बाजूने बोलत नाही आहे, हे पाहून सीमाला आधी नवल वाटले आणि मग ती नाराज झाली. तिची ही नाराजी इतर लोकांच्या नजरेतून काही सुटली नाही.

‘‘वहिनी, आयुष्यात यश प्राप्त करायला माणसाला थोडे कष्ट सोसावे लागतात,’’ सविता अचानक पडखरपणे म्हणाली, ‘‘प्रमोशनचा अर्थ म्हणजे वाढलेला पगार जेव्हा जवळ असेल, तेव्हाच माणूस त्याची सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. तुम्हाला रोहितला चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवायची इच्छा नाही आहे का? उद्या तुम्हाला तुमचं स्वत:चं घर, कार, दागिने, कपडे सगळं पाहिजेय ना? जर छोट्यामोठ्या अडचणींना घाबरून तुम्ही हे प्रमोशन स्वीकारलं नाहीत, तर कशी होतील तुमची स्वप्न पूर्ण?’’

‘‘रोहितचं शिक्षण सोडलं, तर बाकी इतर गोष्टींशिवाय मी सहजपणे राहू शकते,’’ सीमाने सौम्य आवाजात स्पष्ट केले.

‘‘माणसाला अति स्वार्थी नसलं पाहिजे. आज तुमच्याद्वारा आमच्या गरजा आणि शॉक पुरवल्या गेल्या, तर उद्या आम्हीसुद्धा प्रत्येक गजरेच्यावेळी तुमच्यासोबत उभे असू. या वेळेस घरात जास्त पैसा येण्याची गरज आहे. तुमच्या बाकी सर्व अडचणींना नजरअंदाज करून फक्त या एका कारणासाठी तुम्हाला लखनऊला जाणं मान्य केलं पाहिजे.’’ जास्त एक्साईट झाल्याने संजीवचा चेहरा लाल झाला.

‘‘संजीव अगदी योग्य बोलत आहे सुनबाई. पूर्ण कुटुंबाच्या हिताचा जर विचार केलास, तर लखनऊला जाण्याचा निर्णय तुला अगदी सहज घेता येईल,’’ रमाकांतच्या या बोलण्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सहमती दिसली. ‘‘प्रमोशनच्या या चान्सला हातातून घालवणं म्हणजे वेडेपणा ठरेल,’’ राजीवने आपल्या पत्नीकडे पाहत स्मितहास्य केले, ‘‘तुझ्या करिअरप्रती तू पूर्णपणे समर्पित आहेस. छोट्यामोठ्या अडचणींमुळे पुढे भरपूर यश मिळवायच्या रस्त्यात स्वत:च अडथळे निर्माण करू नकोस, सीमा.’’

सीमाला आपल्या पतीसहित सगळेचं लोक आता स्वार्थी वाटू लागले. तिने रागावून सगळ्यांना सुनावलं, ‘‘ज्या अडचणी माझ्यासमोर आहेत, त्याची पर्वा कोणालाही नाहीय. माझ्या नवऱ्यापासून आणि मुलापासून मी लांब का राहू? माझ्या मनाची सुखशांती आणि आनंदाची किंमत त्या ४०-५० हजारांपेक्षा कमी आहे का? का मला दुसऱ्या शहरात एकटीने पाठवायला आतुर झाला आहात तुम्ही सगळे?’’

‘‘तुम्ही तर उगाचचं खूप भावुक आणि अस्वथ होत आहात वहिनी. आजकाल वशिला आणि पैशाने सगळं काही होतं. तुम्ही पण लवकरात लवकर इथे बदली करून घ्यायचा प्रयत्न करत राहा,’’ संजीवच्या आवाजात पडखरपणा आणि चिडचिडेपणा जाणवला.

‘‘इथे सगळं वातावरणचं बदललं. आपली नाराजी व्यक्त करत संजीव त्याच क्षणी तिथून उठून आपल्या रूममध्ये निघून गेला. सुचित्रा किचनमध्ये गेली आणि रमाकांत व सविता सीमाला इग्नोर करत टीव्ही बघू लागले.

रडवेली झालेली सीमा उठून आपल्या बेडरूममध्ये आली. तिला असं वाटतं होतं कि, राजीव तिच्या मागेमागे येईल, पण असं झालं नाही. पतीसुद्धा तिची साथ देत नाही आहे, या गोष्टीची खंत वाटणारी सीमा एकांतात अश्रू ढाळू लागली. जवळजवळ तासाभराने राजीव बेडरूममध्ये आला. तोपर्यंत रोहित झोपी गेला होता. सीमाने लखनऊला जाण्याच्या मार्गात असलेल्या अडचणींना शांतपणे पुन्हा एकदा राजीव समोर मांडून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

काही मिनिटानंतरच राजीवने तिला बोलता बोलता मध्येच टोकलं, ‘‘तू प्रमोशन न स्वीकारण्याचा एकतर्फी निर्णय जर का घेतलाच आहेस, तर या विषयवार पुन्हा चर्चा करण्याची काय गरज आहे. आता तूसुद्धा झोप आणि मलासुद्धा झोपू देत.’’

‘‘तू असा नाराज असशील, तर मला झोप कशी येईल?’’ सीमाचे डोळे पाणावले.

‘‘तू माझा किंवा इतर कोणाची काळजी नको करुस.’’

‘‘माझ्यावर लखनऊला जाण्यासाठी असं प्रेशर टाकणं चांगलं नाही आहे.’’

‘‘समजून घेण्यासारख्या गोष्टी जर का तुला प्रेशराइज करत असतील, तर त्याला मी काय करू शकतो.’’

‘‘माझ्या मनाची घालमेल तुलासुद्धा नाही कळणार. मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून,’’ सीमाच्या आवाजात तक्रार होती.

‘‘आता उगाचचं माझं डोकं नको खाऊसं,’’ राजीवने तिच्यावर आवाज चढवला आणि मग डोळे बंद करून शांत पडून राहिला.

‘‘सीमासुद्धा राजीव आणि त्याच्या कुटुंबीयांचं वागणं पाहून मनातल्या मनात नाराज झाली. झोप येण्याआधी तिने सोमवारी प्रमोशन न स्वीकारण्याचा अंतिम निर्णय मनात पक्का केला होता.

सुट्टीच्या दिवशी सीमा बेड टी पिऊन काही वेळ अजून झोपायची. दुसऱ्यादिवशी तिला बेड टी देण्यासाठी ना सविता आली नाही तिची सासू.

सीमा मग स्वत:च चहा बनवून स्वत:साठी आणि राजीवसाठी घेऊन आली. कॉलजेलाला जाण्याची तयारी करत असलेली सविता ना तिच्याकडे पाहून हसली, किंवा नाही तिच्याशी काही बोलली. पाया पडल्यावर सुचित्राने तिला खिन्न मनाने आशीर्वाद दिला.

त्या दोघींच्या बदललेल्या वागण्याची चर्चा सीमाला राजीवसोबत करायची होती, पण तिच्या वारंवार उठवण्याने सुद्धा तो काही उठला नाही.

‘‘का त्रास देते आहेस मला, सारखं सारखं उठायला सांगून? मला निवांत झोपून दे, प्लिज,’’ राजीवने रागात सीमाचा हात झटकला. तसं सीमाला लक्षात आलं कि, राजीव अजूनही तिच्यावर नाराज आहे.

कपडे धुवायची मशीन लावण्यात त्या दिवशी तिच्या सासूने तिची अजिबात मदत केली नाही. स्वत:साठी आणि रमाकांतसाठी ब्रेडबटरचा नाश्ता तयार करून सुचित्रा आपल्या बेडरूमध्ये जाऊन बसली. जेव्हा रोहित आपल्या आजी आजोबांच्या रूममध्ये शिरला, तेव्हा सुचित्राने त्याला दटावून तिथून बाहेर पिटाळलं.

सीमाला आपल्या नवऱ्यासाठी आणि मुलासाठी स्वत: नाश्ता तयार करावा लागला. जेव्हा ती नाश्ता तयार करत होती, तेव्हा संजीव ऑफिसला जाण्यासाठी आपल्या रूममधून बाहेर आला. सीमा त्याला आवाज देत राहिली, पण तो नाश्ता करण्यासाठी थांबला नाही. त्याच्या हावभावांवरून हे स्पष्ट जाणवत होतं कि, त्याचा मूड अजूनही खराब आहे.

राजीवनेसुद्धा अगदी खिन्न मनाने नाश्ता केला. सीमाने खूप प्रयत्न केले, पण ती आपल्या पतीसोबत कोणत्याही प्रकारचं सुरु संभाषण करण्यात असमर्थ ठरली. रमाकांतसुद्धा घरात गाल फुगवून फिरत होते. मग ११ वाजता बँकेत काहीतरी काम करण्यासाठी निघून गेले. राजीव १२ च्या दरम्यान शिकवण्यासाठी शाळेत निघून गेला.

सीमाने त्याच्या जाण्यानंतर त्याचा लाँच बॉक्स तिथेच डायनिंग टेबलवर राहिलेला पाहिला. राजीव मुद्दाम लंच बॉक्स घेऊन गेला नाही, हे कळाल्यावर सीमाला खूप दु:ख झालं.

सुचित्रा ना सीमाशी काही बोलली, नाही रोहितशी. तिचा नातू जेव्हा केव्हा तिच्या रूममध्ये शिरायचा, ती लगेचचं त्याला बाहेर पिटाळायची.

‘‘आजी आज मला इतकं का ओरडते आहे?’’ आपल्या मुलाच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणून सीमाने त्याला आपल्या छातीशी कवटाळलं आणि आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करू लागली.

दुपारचं जेवण सासूसुनांनी नेहमीप्रमाणे एकत्र न जेवता, त्या आपापल्या रूममध्ये जाऊन जेवल्या. सीमाला किती वेळा वाटलं कि, आपल्या सासूकडे जाऊन आपलं मन मोकळं करावं, पण तिची पाऊलं सुचित्राच्या रूमपर्यंत नाही पोहचू शकली. ‘या सगळ्यांना जर माझ्या दु:खांना आणि अडचणींना समजून घ्यायचं असतं, तर कधीच समजून घेतलं असतं… मी निर्णय घेतला आहे आणि आता कोणालाही लाडीगोडी लावण्याचा किंवा कोणाचीही समजूत घालण्याचा प्रयत्न मी अजिबात करणार नाही,’ मनातल्या मनात असा विचार करून सीमा बेडवर पूर्ण दुपारभर आपली कूस बदलत राहिली.

घरातून बाहेर पडलेले सदस्य आता संध्याकाळी एक एक करून परतू लागले. रमाकांतसुद्धा बँकमधून एका मित्राच्या घरी गेल्यामुळे संध्याकाळीच परतले. सीमाशी कोणीही चांगल्या पद्धतीने वागत नव्हतं. तिच्या प्रश्नाचं कोणीही नीट उत्तर सुद्धा देत नव्हतं. कंटाळून सीमा आपल्या बेडरूमने जाऊन बसून राहिली. सीमासाठी रात्रीचं जेवण तिच्या नणंदेने आणि सासूने बनवलं होतं, पण जेवणासाठी तिला बोलवायला मात्र कोणीही आलं नाही. पूर्ण घरात शोकाकुल वातावरण पसरत चाललं होतं. प्रत्येकाकडून ओरडा खाऊन आलेला रोहितसुद्धा तिच्या बाजूला येऊन झोपला.

सीमाचं जेवण ताटात वाढून जेव्हा राजीव बेडरूममध्ये आला, तोवर रोहित झोपी गेला होता.

‘‘माझी तब्बेत बरी नाही आहे,’’ दु:खी असलेल्या सीमाने खोटं कारण सांगून जेवण्यास नकार दिला. तसा राजीव भडकला.

‘‘फालतूचा ड्रामा करून माझ्या अडचणी आणखी वाढवू नकोस,’’ दबलेल्या रागाने राजीवचा आवाज कापू लागला, ‘‘तुझ्या मुर्खपणामुळे तिथे घरातले माझ्यावर नाराज आहेत आणि इथे तू मला त्रास देतेयस. चांगलं झालं असतं, जर का मी लग्नानंतर तुला नोकरी करण्याची परवानगीचं दिली नसती.’’

‘‘माझ्या घरच्यांनी आजवर प्रत्येक सुखसुविधा पुरवल्या आहेत. संसारातल्या सगळ्या त्रासापासून तू नोकरी असल्यामुळेच वाचली आहेस.’’

‘‘मी लखपती नाही बनली आहे नोकरी करून. स्वत:चा केवळ ४ हजार रुपये खर्च सोडला, तर बाकी सगळी कमाई मी प्रत्येक महिन्याला तुमच्या वडिलांच्या हातात ठेवत आली आहे.’’

‘‘अगं, त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये आपण दोघे हातभार नाही लावणार, तर कोण लावणार?’’

‘‘पण त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी माझा एकटेपणा, दु:ख आणि अशांति स्वत:च्या पदरी पाडून घेण्याची तयारी नाही आहे.’’

‘‘काही वर्ष तुझ्याकडून समजूतदारपणे वागण्याची मी आता अपेक्षासुद्धा नाही ठेवत आहे. बस, तुझ्या स्वार्थी वागण्यामुळे माझं या घरात राहणं मुश्किल बनवू नकोस.’’

‘‘मला स्वार्थी म्हणणं, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, जसं कि उलट, चोर पोलिस अधिकाऱ्यालाचं सुनावतो आहे.‘‘

‘‘अच्छा बाबा, आम्ही सगळे चोर आहोत बस आणि तू पोलीस,’’ राजीवने व्यंगमय शैलीत तिच्या समोर आपले दोन्ही हात जोडले, ‘‘आता गूपचूप जेव आणि मला त्रास देणं बंद कर.’’

नाराज झालेला राजीव बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघून गेला. दोन-चार घासांपेक्षा जास्त जेवण काही सीमाच्या घशाखाली उतरलं नाही. घरातल्या कोणत्याही सदस्यांच्या नजरेपासून वाचण्यासाठी ती उरलेलं जेवण ठेवायलासुद्धा गेली नाही.

राजीव परतल्यावरसुद्धा नाराज आणि शांतच होता. दोघेसुद्धा रात्री उशिरापर्यंत डोळे मिटून बैचैन होऊन कूस बदलत राहिले.

रविवारचा दिवस शनिवारपेक्षासुद्धा खराब होता. रमाकांतने सकाळीच छोट्या मुलाला म्हणजेच संजीवला ओरडत संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं.

‘‘नालायक, लफंगा,’’ रमाकांत छोट्या मुलावर भडकले, ‘‘आज तू शिकवून सवरून एखादी चांगली नोकरी करत असला असतास, तर मला आज कोणाचे उपकार घेण्याची गरज नसली असती. फक्त १४ हजार कमावून तू बाईक आणि कारची स्वप्न पाहतोस? तू तर आयुष्यभर लोकांची हाजी हाजी करण्यासाठी तयार असशील.’’

‘‘दादा आणि वहिनीचा राग माझ्यावर काढून मला शिव्या देण्याची काही गरज नाही आहे,’’ संजीवने क्रोधात प्रतिउत्तर दिले. ‘‘मला कोणाकडून काहीही नको आहे. मी माझ्या गरजा आणि शॉक स्वत: पूर्ण करू शकतो.’’

‘‘ते तर कोणीही करू शकतं, पण तुझ्या बहिणीच्या कोटाच्या कोर्सचं आणि लग्नाचं काय होणार? मी माझं सगळं काही जर तुमच्या दोघांवर खर्च केलं, तर आम्हा म्हाताराम्हातारीचं पुढे जाऊन दिवाळं निघेल.’’

‘‘हा डायलॉग मला नाही, दादा आणि वहिनीला ऐकवा.’’

‘‘जास्त बोललास, तर जीभ कापून टाकेन तुझी,’’ रमाकांत भडकले.

भांडण वाढलेलं पाहून सुचित्रामध्ये बोलली, तर रमाकांत तिच्या मागे लागले. काही वेळाने त्यांनी सविता आणि राजीववरसुद्धा त्यांच्या कडव्या शब्दांचे बाण बरसवण्यास सुरवात केली आणि त्यांना देखील खूप खरीखोटी सुनावली.

सीमा तिच्या रूममधून बाहेरच आली नाही. तिला भेटायला सुद्धा कोणी आत आलं नाही. घाबरलेला रोहित सुद्धा आपल्या आईच्या बाजूलाच बसून राहिला. त्या रात्रीसुद्धा राजीव आणि सीमा दोन अनोळखी व्यक्तींप्रमाणे बाजूबाजूला झेपले. एकमेकांना समजून न घेण्याच्या मनाला झालेल्या घावाच्या विचारांनी त्यांना रात्री उशिरापर्यंत जागवत ठेवले.

ऑफिसला पोहोचल्यावर काही वेळाने सीमाला तिच्या बॉसने जतीनने त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं. प्रमोशन बद्दल ‘हो’ किंवा ‘नाही’ बोलण्याची वेळ आता आली होती.

‘‘तुझा निस्तेज चेहरा पाहूनच मला तुझा निर्णय समजला आहे. सीमा लखनऊला जाणं तुझ्यासाठी कठीण होईल, मला वाटलंच होतं,’’ जतीनने सहानभूती दर्शवत चर्चा सुरु केली.

‘‘सर, मी लखनऊला जाईन,’’ सीमाने मोठ्या मुश्कीलने हे शब्द आपल्या तोंडून बाहेर काढले.

‘‘अगं, मी तर विचार करत होतो कि, तू हे प्रमोशन स्वीकारण्यास नकार देशील,’’ जतीनला नवल वाटलं.

‘‘माझ्या प्रमोशनसोबत माझ्या पतीचं आणि सासरच्या मंडळीचंसुद्धा प्रमोशन झालं आहे. त्या सगळ्यांच्या प्रमोशनला ‘नाही’ बोलणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.’’

‘‘मी काही समजलो नाही सीमा?’’ जतीन गोंधळात पडला.

‘‘सर, प्रमोशनममुळे माझा पगार वाढेल आणि त्याच कारणामुळे त्या सगळ्याच्या गरजा, इच्छा आणि मागण्यासुद्धा विस्तारल्या गेल्या, आणि म्हणूनच माझ्यासाठी प्रमोशनला ‘नकार’ देणं शक्य झालं नाही.’’

‘‘आपल्या छोट्या मुलाला सोडून लखनऊमध्ये एकटी कशी राहशील सीमा?’’ जतीन चिंतेत वाटला.

‘‘सर, सगळ्यांसाठी मी नोटा छापणारी मशीन आहे. माझी चांगल्या प्रकारे काळजी करण्याची योजना त्या सगळ्यांनी तयार ठेवली आहे. मशीनमध्ये कमी काम करण्याचं किंवा स्वत:हून काम बंद पाडण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसते. तिच्या सुखदु:खाला सहन करण्याच्या शक्तीला कोणीच ओळखत नाही. कोणीही महत्व देत नाही,’’ बोलता बोलता सीमाचे स्वर जड झाले.

‘‘वेळ बदलते आहे आणि कदाचित आता स्त्रियांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने कष्ट सहन करण्याची ताकद आपल्यात निर्माण करायला हवी. बेस्ट ऑफ लक, माय डिअर. प्रमोशन स्वीकारल्याबद्दल माझ्याकडुन तुला खूप खूप शुभेच्छा.’’

जतीनला एक फेक स्माईल देत त्यांचे आभार मानून सीमा त्यांच्या केबिनमधून बाहेर आली. आपल्याला मिळालेल्या या प्रोमोशनच्या कोणत्याही प्रकारे आंनद व्यक्त करण्याऐवजी तिला आता जोरजोरात रडावसं वाटतं होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...