कथा * इंदिरा दांगी

आधुनिक शाळांच्या एसी स्कुल बसमध्ये अवजड दफ्तर पाठीवर घेऊन मुलं बसमध्ये चढत होती. त्यांच्या मॉडर्न आया कॅपरी टीशर्टच्यावर घेतलेली ओढणी सांभाळत आपापल्या मुलांना बाय करत होत्या. रस्त्यावर कार ऑफिसेस, बिजनेसच्या दिशेने धावत होत्या. मागच्या सीटवर बसलेल्या साहेब लोकांचं सगळं लक्ष हातातल्या सेलफोनमध्ये असताना बाहेर गार्डने ठोकलेला सलाम त्यांच्या नजरेतून सुटलेला. ११, १३ आणि १५ वर्षांच्या मोलकरणी कामावर येत होत्या आणि कॉलनीचे सुरक्षा रक्षक त्यांची छेड काढत होते.

पॉश कॉलनीच्या समोरच्या हायवे लगतच्या झाडांवर ऊन अलगद उतरलेलं. त्यात रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीचे लोट मिसळलेले. पलिकडच्या बाजूला कलोनाइजरची यांत्रिक सेना उरलं सुरलं जंगल नेस्तनाबूत करण्यात व्यस्त. हायवेच्या दोन्ही बाजूला दोन उंच बोर्ड उभे होते. साकारते आहे नील जंगल सिटी, वसते आहे नील निझर सिटी.

कॉलनीच्या प्रवेशद्वाराशी दिमाखाने उभ्या पाम वृक्षांवरच्या पक्ष्यांनी का कोण जाणे अचानक मौन धारण केलं होतं. बाकी सगळं ठीक चाललं होतं. दुसऱ्या रांगेतल्या तिसऱ्या बंगल्यात राहणाऱ्या गृहिणीने आपल्या दोन्ही मुलांना स्कुल बसमध्ये सोडून आणि नवऱ्याला कारमध्ये टाटा करुन वरच्या बेडरुमच्या काचेच्या रेखीव जारमध्ये पाणी भरुन झालं होतं. आता ती आपल्या दोन्ही जर्मन शेफर्ड कुर्त्र्यांना उकडलेलं मांस खायला घालत होती. ती गप्प आणि उदास भासत होती. भारतीय लोकांना अशा स्त्रिया नेहमी पसंत पडतात ज्या सकाळी लवकर उठून सर्वांच्या जाण्याची तयारी करुन ठेवतात, घरातले लोक गेल्यानंतर त्यांची खरकटी भांडी आणि अंथरुणावर पडलेले ओले टॉवेल, कपडे गोळा करतात, घरी परतल्यावर सगळ्यांची बडदास्त ठेवतात आणि त्यांच्या अनुपस्थितीत घर नीटनेटकं ठेवतात. परिचित, शेजारी, नातेवाईक... जगात असं कोण नाही जे अशा गृहिणीचं उदाहरण आपल्या घरातल्या बायकांना देत नसेल. कव्हर्ड कँपस कॉलनीच्या मधोमध असलेलं गार्डन पार्क, गुळगुळीत रस्ते, त्यांच्या दुतर्फा लावलेली फुलझाडं, आणि ह्या सगळ्यांचं मिळून तयार झालेल्या निसर्गसुंदर परिसराने का कोणास ठाऊक पण एक शांतपणा धारण केला. बाकी सगळं चांगलं चाललं आहे. पहिल्या रांगेतल्या पहिल्या बंगल्यात राहणारे वयोवृद्ध दाम्पत्य आपल्या बाल्कनीत येऊन बसलं होतं. नुकत्याच घेतलेल्या नव्या कोऱ्या स्मार्टफोनवरुन ते आपल्या मुलांशी इतक्या उंच स्वरात बोलत होते, की वाटावं, ह्यांना सेलफोनची काय गरज आहे. ह्यांचा आवाज तर असादेखील त्यांच्या मुलांना ऐकू जात असेल. मग ते ऑस्ट्रेलियात असोत, वा नॉर्वे किंवा लंडनमध्ये.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...