* प्रियंका यादव

जेवणाच्या टेबलवर बसलेला जयंत कुठेतरी हरवला होता. तो काही खातही नव्हता. ते पाहून पत्नी अपूर्वाने त्याला विचारले, ‘‘कुठे हरवलास?’’

‘‘कुठेच नाही,’’ असं म्हणत जयंतने उत्तर देणं टाळलं.

खरंतर जयंत रियाचा विचार करत होता. रिया जयंतची मैत्रीण होती. तिचे त्याच्यासोबत २ वर्षांपासून संबंध होते. जयंतला अलीकडेच व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे लग्न आणि विवाहबाह्य संबंध या दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या, असा प्रश्न त्याला पडला होता. रिया पूर्णपणे जयंतवर अवलंबून होती. व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे जयंतला आता रियाचा खर्च भागवता येत नव्हता. त्याने याबाबत रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही, कारण पुरुषांनी स्त्रियांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात, असे तिचे मत होते.

रियाच्या अशा विचारसरणीमुळे जयंत त्रासला होता. आता त्याला रियासोबतचे संबंध तोडायचे होते, पण अडचण अशी होती की, रिया यासाठी तयार नव्हती. यातून सुटका कशी करून घ्यायची, या पेचात जयंत होता.

व्यावहारिक नाही आणि परवडणारेही नाहीत

विवाहबाह्य संबंध व्यावहारिक किंवा परवडणारेही नसतात. त्यात अनेक खर्च आणि अडचणी येतात. विवाहबाह्य संबंधांचे अनेक प्रकार आहेत. ज्या लोकांचे जोडीदार भावनिक नसतात, असे लोक आपल्या वैवाहिक जीवनाबाहेर भावना शोधतात. हे लोक अशा जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात ज्याच्याशी ते भावनिकरित्या जोडले जाऊ शकतील. या प्रकाराला इमोशनल अफेअर्स म्हणजेच भावनिक विवाहबाह्य संबंध असे म्हणतात.

जे लोक आपल्या वैवाहिक जीवनाला कंटाळले आहेत आणि असे लोक ज्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळे काहीतरी हवे असते ते वन नाईट स्टँड म्हणजे एका रात्रीची संकल्पना स्वीकारतात. याशिवाय लोकांमध्ये सेक्स अॅडिक्ट अफेअर्सही असतात. अशी अफेअर्स सेक्स अॅडिक्ट लोक करतात. अशा लोकांसाठी, सेक्स सर्वकाही असते. काही लोक लव अॅडिक्ट अफेअर्सही करतात. असे अफेअर्स प्रेमाच्या आहारी गेलेले लोक करतात. त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे असते. सुमितच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत, तरीही तो त्याची जुनी मैत्रीण प्रियाला विसरू शकलेला नाही. त्याला त्याची पत्नी आणि प्रेयसी दोघांसोबत संबंध ठेवायचे आहेत, पण अडचण अशी आहे की, तो आपल्या पत्नीसोबत दिल्लीत राहतो आणि त्याची मैत्रीण बंगळुरुमध्ये काम करते. दोन्ही नाती सांभाळणे त्याला अवघड झाले आहे.

तो सांगतो की, तो बंगळुरूला वारंवार येत असल्यामुळे त्याच्या पत्नीला त्याच्यावर संशय येऊ लागला आहे. आपला अनुभव कथन करताना तो विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. दोन नाती एकत्र सांभाळणे सोपे नाही आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा असायला हवा, असे त्याचे मत आहे.

लपवणं सोपं नाही

विवाहित असून अफेअर करणे सोपे नसते, कारण तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यापासून लपून ते करत असता. अशा परिस्थितीत तुमचे भांडे कधीही फुटू शकते. त्यावेळी तुम्ही ते कसे हाताळाल, याचा विचार आधीच करावा लागतो. वाणी प्रिया सांगते, ‘‘विवाहबाह्य वैवाहिक संबंध ठेवणे सोपे नाही, ते खूप धोकादायक असते. त्याचवेळी ते खूप महागडे ठरते. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते, शिवाय घटस्फोटही होऊ शकतो. पण जर तुम्हाला लग्न आणि अफेअर दोन्ही परवडत असेल तर तुम्ही विवाहबाह्य संबंध ठेवू शकता. जर तुमच्या वैवाहिक जीवनातील आकर्षण नाहीसे झाले असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला.’’

राहुल प्रजापतीची मैत्रीण इशिता ३ महिन्यांची गरोदर आहे. आता ती त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करत आहे, पण राहुलचे आधीच लग्न झालेले आहे. पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय तो इशितासोबत लग्न करू शकत नाही. इशिता त्याच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत आहे. राहुल आता त्या क्षणाला दूषणे देत आहे जेव्हा तो विवाहबाह्य संबंधात अडकला.

खिशावर भार

अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांचा घटस्फोट होण्याआधीच अर्जुन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. दरम्यान त्याची मैत्रीण गरोदर राहिली. त्यानंतर त्याने मेहरला घटस्फोट दिला, आज तो आपल्या लिव्ह-इन जोडीदारासोबत लग्न न करताही आपले नाते निभावत आहे. तो श्रीमंत असल्याने असे करू शकला, पण जर तुम्ही श्रीमंत नसाल तर विवाहबाह्य संबंधामुळे तुमच्या खिशावर भार पडेल.

‘ग्लेडन’ अॅप भारतात २०१७ मध्ये आले. त्याचे ३० टक्के वापरकर्ते भारतीय आहेत. हे डेटिंग अॅप केवळ मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित नाही तर मेरठ, भोपाळ, पाटणा यांसारख्या शहरातील लोकही त्याचा वापर करत आहेत. या अॅपवर २४ ते ३० वयोगटातील महिला पुरुषांचा शोध घेतात तर ३१ ते ४० वयोगटातील पुरुष हे महिला शोधतात. डेटिंग अॅप ग्लेडनच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, 53 टक्के भारतीय महिला त्यांच्या पतीशिवाय इतर पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवतात तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची संख्या ४३ टक्के आहे.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीवरून असे निदर्शनास आले आहे की, पुरुष स्त्रियांच्या तुलनेत अधिक विवाहबाह्य संबंध ठेवतात. आकडेवारीनुसार, अशा स्त्रियांची संख्या १२ टक्के तर पुरुषांची संख्या २८ टक्के आहे. सर्वेक्षणात, ७७ टक्के स्त्रियांनी मान्य केले की, त्यांचे वैवाहिक जीवन नीरस असल्याने त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. ७२ टक्के महिलांना त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कोणतीही खंत नाही.

कारण काय आहे

दिल्लीतील रहिवासी आदिती यादव (नाव बदलले आहे) हिच्यासाठी समस्या उद्भवली जेव्हा मयांकला समजले की, आदितीचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्याने या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला समजले की, तो आदितीला पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. तो सांगतो की, विवाहबाह्य संबंधांची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही ती ओळखणे आणि त्यावर विचार करणे महत्त्वाचे आहे.

झारखंड महिला हेल्पलाइन १८१ ‘अभयम’ने काही आकडेवारी सादर केली. त्यानुसार दर तासाला विवाहबाह्य संबंधांशी संबंधित एक प्रकरण नोंदवले गेले. २०१८ ते २०२२पर्यंत या हेल्पलाइनवर तक्रारी वाढू लागल्या. जिथे २०१८ मध्ये ३,८३७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तिथे २०२२ मध्ये ही आकडेवारी ९,३८२ वर पोहोचली. गेल्या ५ वर्षांत विवाहबाह्य संबंधांमध्ये अडीच पट वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

लोकांमध्ये विवाहबाह्य संबंध असण्याची अनेक कारणं असतात. शारीरिक गरज, भावनिक ओढ नसणे, घरगुती हिंसाचार, संवादातील अभाव, जोडीदाराने दुर्लक्ष करणे, एकटेपणा, मुलांची जबाबदारी, लैंगिक गरज पूर्ण न होणे, लहान वयात लग्न होणे, विचारांमधील तफावत, जीवनातील प्राधान्यक्रम वेगवेगळे असणे, नात्यात रुक्षपणा, आकर्षणाचा अभाव, बिछान्यावर खराब कामगिरी, करिअरला महत्त्व इत्यादी अनेक कारणांमुळे जोडीदार विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. परंतु या सर्वांमध्ये ‘शारीरिक गरज’ही सर्वाधिक समान बाब आहे.

कायदा काय सांगतो?

आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ नुसार जर एखाद्या विवाहित पुरुषाचे एखाद्या विवाहित स्त्रीशी शारीरिक संबंध असतील तर तिचा पती त्या पुरुषाविरुद्ध व्यभिचाराच्या नावाखाली गुन्हा दाखल करू शकतो. परंतु कोणीही स्वत:च्या पत्नीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही किंवा ज्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध आहेत अशा पुरुषाची पत्नी त्या दुसऱ्या स्त्रीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही.

भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करते. ते घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे. कलम ४९७ हे मनमानी करणारे आहे, कारण स्त्रीवर पुरुषाचे कायदेशीर सार्वभौमत्व मान्य करणे चुकीचे आहे.

पत्नी ही पतीची मालमत्ता नाही

विवाहबाह्य संबंधांमध्ये पैसा तर खर्च होतोच, शिवाय ते जास्त काळ लपवताही येत नाहीत. तुमच्या संबंधांबद्दल समजताच तुमचा जोडीदार तुमचे जीवन नकोसे करतो. अशा परिस्थितीत घटस्फोटाचा विचार केला तर ते तितकंसं सोपं होणार नाही. घटस्फोटानंतर तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागू शकते. तुम्ही श्रीमंत असाल तर ठीक, नाहीतर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...