* प्रियंका यादव

जेवणाच्या टेबलवर बसलेला जयंत कुठेतरी हरवला होता. तो काही खातही नव्हता. ते पाहून पत्नी अपूर्वाने त्याला विचारले, ‘‘कुठे हरवलास?’’

‘‘कुठेच नाही,’’ असं म्हणत जयंतने उत्तर देणं टाळलं.

खरंतर जयंत रियाचा विचार करत होता. रिया जयंतची मैत्रीण होती. तिचे त्याच्यासोबत २ वर्षांपासून संबंध होते. जयंतला अलीकडेच व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे लग्न आणि विवाहबाह्य संबंध या दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या, असा प्रश्न त्याला पडला होता. रिया पूर्णपणे जयंतवर अवलंबून होती. व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे जयंतला आता रियाचा खर्च भागवता येत नव्हता. त्याने याबाबत रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही, कारण पुरुषांनी स्त्रियांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात, असे तिचे मत होते.

रियाच्या अशा विचारसरणीमुळे जयंत त्रासला होता. आता त्याला रियासोबतचे संबंध तोडायचे होते, पण अडचण अशी होती की, रिया यासाठी तयार नव्हती. यातून सुटका कशी करून घ्यायची, या पेचात जयंत होता.

व्यावहारिक नाही आणि परवडणारेही नाहीत

विवाहबाह्य संबंध व्यावहारिक किंवा परवडणारेही नसतात. त्यात अनेक खर्च आणि अडचणी येतात. विवाहबाह्य संबंधांचे अनेक प्रकार आहेत. ज्या लोकांचे जोडीदार भावनिक नसतात, असे लोक आपल्या वैवाहिक जीवनाबाहेर भावना शोधतात. हे लोक अशा जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात ज्याच्याशी ते भावनिकरित्या जोडले जाऊ शकतील. या प्रकाराला इमोशनल अफेअर्स म्हणजेच भावनिक विवाहबाह्य संबंध असे म्हणतात.

जे लोक आपल्या वैवाहिक जीवनाला कंटाळले आहेत आणि असे लोक ज्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळे काहीतरी हवे असते ते वन नाईट स्टँड म्हणजे एका रात्रीची संकल्पना स्वीकारतात. याशिवाय लोकांमध्ये सेक्स अॅडिक्ट अफेअर्सही असतात. अशी अफेअर्स सेक्स अॅडिक्ट लोक करतात. अशा लोकांसाठी, सेक्स सर्वकाही असते. काही लोक लव अॅडिक्ट अफेअर्सही करतात. असे अफेअर्स प्रेमाच्या आहारी गेलेले लोक करतात. त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे असते. सुमितच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत, तरीही तो त्याची जुनी मैत्रीण प्रियाला विसरू शकलेला नाही. त्याला त्याची पत्नी आणि प्रेयसी दोघांसोबत संबंध ठेवायचे आहेत, पण अडचण अशी आहे की, तो आपल्या पत्नीसोबत दिल्लीत राहतो आणि त्याची मैत्रीण बंगळुरुमध्ये काम करते. दोन्ही नाती सांभाळणे त्याला अवघड झाले आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...