- शोभा कटारे
माझ्या शेजारी राहणाऱ्या मीराला कशाचीच कमी नाहीये. सर्व काही तर आहे तिच्याकडे दोन दोन घरं, मोठमोठ्या गाड्या, भरपूर महागडे कपडे, दागिने. परंतु अलीकडे ती खूपच दु:खी दिसतेय, सर्व काही असून देखील ती आनंदी नाहीये. शेवटी अशी कोणती गोष्ट आहे, जी मिळताच ती आनंदी होईल. घरातील सर्व लोकं तिला समजून घेताहेत आणि शक्य तेवढे त्यावर उपाय करत आहेत. अलीकडच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण अशी गोष्ट शोधत आहे तर ती आहे आनंद आणि तो मिळवण्यासाठी सर्व काही करायला तयार आहेत. परंतु हे मिळविण्यात ते अयशस्वी होत आहेत. असं म्हटलं जातं की पैशाने सर्वकाही विकत घेतलं जाऊ शकतं परंतु कदाचित आनंद नाही. शेवटी कोणती आहे ती पद्धत वा मार्ग जे मिळवून तुम्ही आनंदी राहू शकता.
रहा निरोगी
जर आनंदी राहायचं असेल तर निरोगी राहणं गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की निरोगी शरीरानेच आनंदी राहू शकता. लक्षात ठेवा चांगलं आरोग्य पैशाने बनवता येत नाही परंतु एक चांगलं आरोग्य पैशाने कमावलं जाऊ शकतं आणि सोबतच आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात.
यासाठी नियमित व्यायाम करणं, समतोल आहार घेणं आणि भरपूर ६ ते ७ तासाची झोप घेणं गरजेचे आहे. परंतु अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये हे स्वीकारणं व करणं कठीण होत चाललंय. ज्यामुळे आपण कमी वयात देखील आजारी पडत आहोत आणि मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाहीत.
ओळखा आपला आनंद
सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद मिळतो, जसं एखाद्याला चांगलं खाण्याने आनंद मिळतो, कोणाला चांगले कपडे घालण्याने, कोणाला फिरायला जाण्याने, तर कोणाला मंदिरात जाऊन सेवा करण्याने, कोणाला अभ्यास करण्याने, कोणाला कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याने, तर कोणाला संगीत ऐकल्याने, तर कोणाला पैसा कमविण्याने आणि स्वत:चा बँक बॅलन्स वाढवण्याने इत्यादी. आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे की तुम्ही तुमचा आनंद ओळखा.





