प्रतिनिधी

भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि आवडत्या मीडिया ब्रँड्सपैकी एक असलेल्या *झी ने २०.८ करोड घरांमधील ८५.४ करोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आपली नवीन ब्रँड ओळख आणि शक्तिशाली ब्रँड वचन “युअर्स ट्रुली झी” सह एका धाडसी नव्या युगात प्रवेश केला आहे. या गतीला पुढे चालना देण्यासाठी आणि या वैविध्यपूर्ण उद्योगामध्ये आपली भूमिका अधिक ठामपणे मांडण्यासाठी झीने एक महत्त्वपूर्ण उद्योगाभिमुख उपक्रम *‘झी व्हॉट्स नेक्स्ट’* सुरू केला आहे. कंटेंट आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ असलेला पॉवरहाऊस ब्रँड म्हणून होत असलेल्या नेटवर्कच्या रूपांतराचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

*‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ हा झी चा एक इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम असून इथे झीने आपल्या भागीदारांना धाडसी नव्या युगात प्रवेश देत, नवकल्पनांचा, बदलत्या दृष्टीकोनाचा आणि नव्याने साकारलेल्या मनोरंजनाचा प्रथम अनुभव दिला.* हा उपक्रम झी जगासाठी निर्माण करत असलेल्या त्या सर्व गोष्टींवर प्रकाशाचा झोत आणत आहे, जिथे कंटेंट कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आणि आपल्या सांस्कृतिक मुळांवर ठाम उभे राहूनही सहजपणे विभिन्न प्लॅटफॉर्म्स, डिव्हायसेस आणि हृदयांमध्ये मुक्तपणे संचार करू शकते. मार्केटर्ससाठी हे एक असे दालन होते ज्यातून कथाकथन हे केवळ ३०  सेकंदांच्या जाहिरातीपासून पात्र-आधारित चळवळीत कसे रूपांतरित होऊ शकते आणि त्याच वेळी झी हे केवळ बदलाला प्रतिसाद देत नसून स्वतः तो बदल घडवत आहेत आणि आपल्या भागीदारांना भारतीय मनोरंजनाचे हे भविष्य घडवायला आमंत्रित करत आहे.

प्रेक्षक कंटेंट पाहण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत अशा सातत्याने बदलणाऱ्या वातावरणात झी ने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले की टीव्ही आजही देशातील सर्वात प्रभावी कथाकथन माध्यम असून दररोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतो. आजचे प्रेक्षक हे प्लॅटफॉर्म-फ्लुइड झाले असून झी ने आपल्या प्रेक्षकांच्या गरजांसोबत रिअल-टाईममध्ये स्वतःला जुळवून घेतले आहे. विभिन्न प्लॅटफॉर्म्सवर सहजपणे जाऊ शकणाऱ्या आपल्या व्यक्तिरेखा, फॉर्मेट्स आणि कथानके यांसह ते असे कंटेंट निर्माण करत आहेत जे टेलिव्हिजनवरून ओटीटी ते आणि सोशल मीडियावर आरामात प्रवास करू शकते. या बदलत्या ट्रेंड्सच्या अनुरूप राहून आणि अग्रगण्य कंटेंट आणि तंत्रज्ञान पॉवरहाऊस असण्याच्या झी च्या वचनाशी सुसंगत राहून नेटवर्कने धोरणात्मक धोरणात्मकदृष्ट्या दोन नवीन हायब्रीड वाहिन्या झी पॉवर आणि झी बांगलासोनार यांचे ‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ या उपक्रमात अनावरण केले.

‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ या उपक्रमात झीने हेही अधोरेखित केले की कसे झी हे ११   भाषांमधील ५०  वाहिन्यांसह गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनासाठी देशभरातील प्रेक्षकांची आवडती निवड बनली आहे. यातून ह्या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यात आले की कसे झीचे जग हे शक्तिशाली, सांस्कृतिकदृष्ट्या सामर्थ्यवान अशा ब्रँड्सनी बनलेले आहे, अशा ‘भारता’साठी बनलेले आहे जो आत्मविश्वासाने भरलेला आहे, जो स्वतःला व्यक्त करतो आणि सतत पुढे जात राहतो.

हे नेटवर्क ‘भारता’च्या प्रत्येक भाषेला भावनिक, दृश्यात्मक आणि भाषिक पातळीवर सेवा देते. त्यांच्या कथासुद्धा स्थानिक वास्तविकता आणि उपसंस्कृतींमध्ये खोलवर रुजलेल्या असून त्या विशिष्ट आणि तरीही वैश्विकदृष्ट्या समजल्या जाणाऱ्या ओळखींचा उत्सव साजरा करतात. आणि या सर्व कथांच्या केंद्रस्थानी असतात व्यक्तिरेखा, ज्या आयुष्यांवर प्रभाव पाडतात. त्या *दिलफ्लुएन्सर्स* आहेत ज्या खऱ्या जगातील भावना, संवाद आणि वर्तन यांना आकार देतात!

नवीन उपक्रम आणि वाहिन्यांच्या सुरुवातीबद्दल *झील (ZEEL) चे चीफ मार्केटिंग ऑफिसर, कार्तिक महादेव* म्हणाले, “‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ सह आम्ही संस्कृती, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांच्या दृष्टिकोनातून मनोरंजनाला नव्याने साकारत आहोत. ‘झी’ हा ब्रँड ‘भारता’साठी सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचा पाया असणे निरंतर सुरु आहे. हा ब्रँड आपल्या प्रेक्षकांसोबत सतत प्रगल्भ होतो, पण त्याचवेळी त्यांच्या वास्तविकता, स्वप्ने आणि आकांक्षांशीही घट्ट जोडून राहतो. झी पॉवर आणि झी बांगलासोनार यांची सुरुवात ही या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे, भाषिक बाजारपेठांच्या ताकदीवरील आमचा ठाम विश्वास अधोरेखित करते आणि बदलत्या भारताच्या स्पंदनांचे प्रतिबिंब दर्शवणारे भविष्याभिमुख आणि मनाला भिडणारे कंटेंट देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचेही उदाहरण आहे.”

*झी पॉवर* ही कर्नाटकातील युवा आणि निमशहरी प्रेक्षकांसाठी निर्माण करण्यात आलेली नवीन पिढीची कन्नड हायब्रीड वाहिनी आहे. ही नवीन वाहिनी दमदार, शहरी कथाकथन आणि प्रेरणादायी फॉरमॅट्स यांचा मिलाफ सादर करते, जे आजच्या कन्नडिगांच्या आवाजाला प्रखरपणे प्रतिबिंबित करते आणि उच्च ऊर्जा असलेला कंटेंट अनुभव देते. ही वाहिनी अधिकृतपणे ऑगस्ट २०२५  मध्ये ऑन-एअर येणार असून, कर्नाटकमधील प्रत्येक जिल्ह्याला व्यापणाऱ्या व्यापक मल्टिमीडिया मोहिमेच्या माध्यमातून तिचा प्रचार केला जाईल. सुरुवातीच्या कार्यक्रमांमध्ये पाच फिक्शन शो, एक दैनंदिन नॉन-फिक्शन शो यांसह दररोज चित्रपटांचे प्रदर्शन आणि अधूनमधून वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर्स यांचा समावेश असेल.

*झी पॉवर* च्या सुरुवातीबाबत बोलताना झील (ZEEL) *चे चीफ क्लस्टर ऑफिसर – साऊथ आणि वेस्ट, सिजू प्रभाकरन* म्हणाले, “९९% टीव्ही उपस्थिती असलेल्या कर्नाटक बाजारपेठेमध्ये झी ही अग्रगण्य स्थानावर आहे. त्यामुळे प्रेक्षकांची भावना आणि त्यांच्या सांस्कृतिक बारकाव्यांची आम्हाला खोल समज आहे. आजचे कन्नड प्रेक्षक एकसंध राहिलेले नाहीत आणि त्यांच्या वेगळ्या कंटेंट प्राथमिकता उदयास येत असून त्यामुळे प्रगतीशील, उच्च-ऊर्जा कथांसाठी वाव निर्माण झाला आहे. प्रेक्षकांच्या या बदलत्या गरजांना ओळखून, आम्ही एक मजबूत दुहेरी वाहिनी धोरण तयार केले आहे — ज्यामध्ये झी कन्नड आमच्या मुख्य कौटुंबिक प्रेक्षकांसाठी सातत्याने सेवा देत राहील, तर झी पॉवर अधिक धारदार, साहसी आणि आधुनिक दृष्टिकोनातून सादर होणाऱ्या कंटेंटसह एक वेगळा ठसा उमटवेल. आमच्यासाठी झी पॉवर हे केवळ प्रादेशिक उपस्थिती वाढवण्याचे पाऊल नाही, तर कन्नड टेलिव्हिजनचे स्वरूप नव्याने परिभाषित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

तर दुसरीकडे, झी बांगलासोनार ही बंगाली भाषिक प्रेक्षकांसाठी देशभरात सादर होणारी पहिलीवहिली हायब्रीड वाहिनी आहे. फिक्शन, नॉन-फिक्शन, चित्रपट आणि नवीन फॉरमॅट्स यांचा मिलाप असलेली झी बांगलासोनार ही वाहिनी सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेली, आणि तरीही आधुनिक दृष्टिकोन असलेल्या प्रेक्षकांसाठी तयार केली गेली आहे. या ब्रँडमध्ये संबंधित आणि खोलवर स्थानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ही वाहिनी अधिकृतपणे ऑन-एअर देखील सुरू केले जाईल आणि कोलकातासह बंगालच्या सर्व जिल्ह्यांना व्यापणारी एक व्यापक मल्टी-मीडिया मोहीम राबवली जाईल.

झी बांगलासोनारच्या सुरुवातीबाबत आपला उत्साह व्यक्त करताना झील *(ZEEL) चे चीफ क्लस्टर ऑफिसर – ईस्ट, नॉर्थ आणि प्रीमियम क्लस्टर, सम्राट घोष* म्हणाले, “पश्चिम बंगाल हे विशेषतः बंगाली जनरल एंटरटेनमेंट श्रेणीत झपाट्याने वाढणारी टीव्ही बाजारपेठ आहे. हे मार्केट आता नवकल्पनांसाठी आणि मनोरंजनाकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी तयार आहे. झी बांगलासोनारची सुरुवात ही आमची मुख्य वाहिनी झी बांगलाला पूरक ठरेल अशा धोरणात्मक दृष्टीकोनातून आखलेली आहे जी बदलत्या आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षकवर्गासाठी वेगळे आणि नाविन्यपूर्ण कंटेंट देणार आहे. झी बांगलासोनार ही केवळ विविध कार्यक्रमांची मालिका घेऊनच नव्हे, तर खास पुरुष प्रेक्षकांसाठी बनवलेल्या कंटेंटसह धोरणात्मकपणे सादर केली जात आहे. झी बांगलासोनार या वाहिनीच्या सुरुवातीच्या माध्यमातून आम्ही परंपरेशी जोडलेले आणि प्रेक्षकांना जवळचे वाटणारे कथाकथन घेऊन फिक्शन, नॉन-फिक्शन आणि चित्रपटांच्या स्वरूपात एक संपूर्ण वेगळा अनुभव देण्याचं उद्दिष्ट राखत आहोत. झी बांगलासोनारच्या माध्यमातून आम्ही एक अद्याप न टिपल्या गेलेल्या शक्यतांच्या प्रचंड क्षेत्राला हात घालण्याच्या तयारीत आहोत.”

जसजसे झी नेटवर्क नव्या भारताच्या वैविध्यपूर्ण कथा सातत्याने समोर आणणे सुरु राखेल आणि प्रत्येक स्क्रीनवर प्रेक्षकांसोबत दृढ नाते निर्माण करत राहिल तसतसे ते एक गतिशील कंटेंट-टेक पॉवरहाऊस म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत आहेत, जे आधुनिक तंत्रज्ञानातील नवकल्पनांबरोबर विकसित होत आहे आणि मनोरंजनाच्या भविष्यातील शक्यता नव्याने साकारत आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...