* प्रतिनिधी
गृहशोभिका मासिकाने आपल्या वाचकांसाठी अलीकडेच ‘कुकिंग क्वीन’ इव्हेंट्सचं आयोजन मुंबई लगतच्या तलावांचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे पूर्वेच्या आनंद बँक्वेट हॉलमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. या इव्हेंटला यशस्वी बनविण्यात स्पाइस पार्टनर एलजी हिंग, हेल्दी टिफिन पार्टनर एक्सो, टुरिझम पार्टनर उत्तराखंड राज्य, सोबतच असोसिएट पार्टनर पारस घी यांनी सहकार्य केलं.
या इव्हेंटमध्ये २०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. इव्हेंटमध्ये आरोग्यदायी खाण्याचे फायदे, स्त्रियांमध्ये पोषणाची कमतरता पूर्ण करण्यासंबंधी माहिती देण्यासोबतच अनेक मनोरंजक स्पर्धां देखील आयोजित करण्यात आल्या. कुकिंग स्पर्धेमध्ये महिला पूर्ण उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
शेफ सेशन
‘ऑल अबाउट कुकिंग’चे सुप्रसिद्ध शेफ निलेश लिमये यांनी महिला प्रतिस्पर्ध्यांचा उत्साह वाढविण्याबरोबरच त्यांना फास्टिंग म्हणजेच उपवासाच्या रेसिपी संबंधित नवीन माहिती देखील दिली. कुकिंगच्या जगतात १५ पेक्षा अधिक वर्षांपासूनचा अनुभव असणारे शेफ निलेश रेस्टॉरंट आणि केटरिंग बिझनेस कन्सल्टंट म्हणून देखील ओळखले जातात. शेफ निलेश प्रामुख्याने मेन्यू व रेसिपी डेव्हलपमेंट, किचन सेटअप, स्टाफ ट्रेनिंग आणि फूड स्टायलिंगसाठी प्रसिद्ध आहेत.
शेफ निलेश यांनी कुकिंग डेमो देण्यासोबतच महिलांनां जेवण बनवणं आणि सर्व्ह करणं या संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी कुकिंगशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं देखील विस्तारपूर्वक दिली. त्यांनी फास्टिंग रेसिपीजना हेल्दी आणि इंटरेस्टिंग बनविण्याच्या टीप्सदेखील महिलांना दिल्यात. शेफ सेशन सर्वांनी खूपच एन्जॉय केलं.
कुकिंग क्वीन सुपर जोडी
या स्पर्धेसाठी ड्रॉच्या माध्यमातून ५ कुकिंग क्वीन जोड्यांना निवडण्यात आलं. या सर्वांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गरजेचं सर्व साहित्य अगोदर पासूनच उपलब्ध करण्यात आलं होतं. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवणाऱ्या विजेत्यांची निवड रेसिपीची चव, कुकिंग स्टेशनची स्वच्छता, साहित्य कशा प्रकारे मांडलय, डिशचं प्रेझ्नटेशन इत्यादीच्या आधारावर शेफ निलेश यांनी केली.
स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मीनल पिंपळे आणि शिल्पा गजेंद्र या जोडीने बेसन चीला विथ पनीर सलाड बनवून जिंकला. द्वितीय पुरस्कार ज्योती लोखंडे आणि मनीषा गोसावी या जोडीने पनीर वेजी बनवून जिंकला. तर तृतीय पुरस्कार काजल करंबळकर आणि गौरी बोलके या जोडीने पनीर सलाड मंचुरियन बनवून जिंकला. तृप्ती जाधव आणि अल्पना मोरे या जोडीने व्हेज पनीर पॅटीस तर नलिनी मनवाडकर आणि माया करंबळकर यांनी थालीपीठ विथ पनीर बनवलं. या दोन्ही जोड्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
न्यूट्रिशनिस्ट सेशन
अलीकडे सर्वजण आरोग्यदायी खाणं आणि पोषणाबाबत जागरूक आहेत आणि याच्याशी संबंधित अनेक नवीन गोष्टी जाणण्यास उत्सुक असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन पोषणशी संबंधित सेशन ठेवण्यात आलं. रिलायन्स हॉस्पिटलच्या न्यूट्रिशनिस्ट वैशाली मराठे यांना या फिल्डमध्ये सतरा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी महिलांना योग्य डायट, पोषण इत्यादीशी संबंधित माहिती दिली.
मराठे यांनी थायरॉईड डिसऑर्डर्स, पीसीओडी, हार्मोन्स असंतुलन आणि पोषणसंबंधी समस्यांशी जोडलेल्या महिलांच्या प्रश्नांची उत्तरं विस्तार पूर्वक दिली. त्यांनी हे देखील सांगितलं की अशा प्रकारच्या त्रासामुळे स्त्रियांच्या आरोग्यावरती कोणता प्रभाव पडतो आणि अशा स्थितीत कोणत्या प्रकारचे डायट घ्यायला हवं. यासोबतच त्यांनी हे देखील सांगितलं की वेगवेगळ्या वयोगटातील महिलांच्या शरीरामध्ये पोषणची नेमकी कोणती गरज असते आणि त्यांनी कशा प्रकारचं डायट घेऊन पूर्ण केलं जाऊ शकतं.
वैशाली मराठे यांनी महिलांशी संबंधित हार्मोनल डिसबॅलन्सबद्दलदेखील सांगितलं. त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे आरोग्यदायी डायट घेऊन या स्थितीचा सामना केला जाऊ शकतो. यासोबतच त्यांनी आरोग्याशी संबंधित अधिक महत्त्वपूर्ण टीप्स दिल्यात.
गेमिंग सेशन
पूर्ण इव्हेंटच्या दरम्यान अँकरने महिलांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अनेक गेम्स, नृत्यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महिलांनीदेखील या सर्वांमध्ये सहभाग घेतला आणि विविध प्रकारचे पुरस्कार जिंकले. पूर्ण सत्रांमध्ये अँकरने महिलांना अनेक फनी आणि रोचक प्रश्नदेखील विचारले आणि हसतखेळत हा इव्हेंट पार पडला. प्रत्येक गेममध्ये सहभागी होण्यासाठी स्त्रियांमध्ये जणू काही स्पर्धाच लागली होती. सर्व महिला खूप आनंद घेत होत्या.
इव्हेंटच्या सर्व सेशनच्या समापनानंतर महिलांनी रुचकर जेवणाचा आनंद घेतला. भेटीदाखल सर्व महिलांना गुडी बॅग्स देण्यात आल्या.