* रवी शोरी नीना
तरुणाईच्या उंबरठयावर पाऊल टाकताच प्रत्येक तरुणाला वाटतं की त्याची एखादी प्रेयसी असावी, परंतु या तरुणांची खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा त्यांना एखादी तरुणी आवडते, परंतु त्यांना हे समजत नाही की ती सिंगल आहे की ऑलरेडी एंगेज्ड म्हणजेच त्या तरुणीला एखादा प्रियकर आहे की नाही. यासाठी इथे काही खास टीप्स देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे सहजपणे जाणून घेता येईल की जी तरुणी तुम्हाला आवडत आहे ती सिंगल आहे का वा अगोदरच तिचा एखादा मित्र आहे.
सम वयोगटातील मुलींमध्ये राहतात सिंगल मुली
सिंगल तरुणीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्या अनेकदा आपल्या मैत्रिणींसोबत असतात. जी तरुणी तुम्हाला आवडत आहे, ती मग बाजारात जात असो वा एखाद्या पार्कात फिरायला जात असो ती जर तुम्हाला सगळीकडे तिच्या मैत्रिणींसोबत दिसली तर याचा सरळ अर्थ आहे की तिला आतापर्यंत कोणताही प्रियकर नाही. अशा तरुणीशी तुम्ही मैत्री करण्याचा प्रयत्न करू शकता.
रेस्टॉरंटमध्ये सिंगल तरुणींचं वागणं
एखाद्या तरुणीसोबत मैत्री असणाऱ्या तरुणी रेस्टॉरंटमध्ये घुसताच अशी खास सीट शोधतात जिथे त्या दररोज आपल्या बॉयफ्रेंडसोबत बसतात. अशी सीट रिकामी मिळताच त्यांचा चेहरा आनंदाने चमकतो. अशा तरुणी वारंवार आपल्या घडाळयात वेळ पाहत बसतात, जणू काही प्रियकराशिवाय त्यांना प्रत्येक क्षण निभावणं कठीण होत आहे.
या उलट नाश्ता वा लंचसाठी रेस्टॉरंटमध्ये आलेली सिंगल तरुणी तिच्या आजूबाजूला बसलेल्या तरुण जोडप्यांकडे गुपचूप पाहत राहते. सिंगल तरुणी तिथे बसलेल्या जोडप्यांच्या गोष्टी आणि गप्पांमध्ये उत्सुकता दाखवते. तर ज्यांचा प्रियकर असतो त्या तरुणी आपल्यामध्येच मग्न असतात. त्यांचं लक्ष त्यांच्या प्रियकराची वाट पाहण्यात दरवाज्याकडे लागलेलं असतं.
कधी नजर मिळविता कधी नजर चोरता
सिंगल तरुणांनाच नाही तर सिंगल तरुणींनादेखील स्वत:साठी एक आकर्षक प्रियकरांचा शोध असतो. या शोधामुळे सिंगल तरुणींचं लक्षदेखील एका चांगल्या प्रियकराच्या शोधात असतं. जर एखादी तरुणी हळूच तुम्हाला पाहत असेल लक्ष तिने जर तुम्हाला पाहिलं आणि नेमकं तुम्ही त्यावेळी तिच्याकडे पाहिलं तर ती लाजून मान खाली घालते, परंतु तिच्या मनात घालमेल सुरू असते. याचा सरळ अर्थ आहे की ती तुमच्यावर मनातल्या मनात प्रेम करत आहे आणि तुम्हाला पसंत करत आहे.. तसंच ती अगोदरच एंगेज्ड नाही आहे म्हणजेच सिंगल आहे.
बॉडी लँग्वेज
बॉडी लँग्वेचा प्रेमाशी गाढ संबंध आहे. प्रेमाचे पारखी एखाद्या तरुणीची बॉडी लँग्वेज वाचून सहजपणे सांगतात की ती कोणाच्या प्रेम पाशात पूर्वीपासून आहे वा तिला एखाद्या प्रियकराच्या शोधात आहे.
कोणासोबत जोडलेल्या तरुणींमध्ये एवढा विश्वास येतो की पुरुषांच्या गर्दीतून एकट जाणं त्यांच्यासाठी सामान्य बाब असते, तर सिंगल तरुणी पुरुषांच्या गर्दीपासून दूर होतात.
सिंगल तरुणींचं तरुणांमध्ये स्वारस्य
आपल्या प्रियकराच्या प्रेमात पडल्यानंतर अनेक तरुणी इतर तरुणांशी जास्त बोलत नाहीत आणि इतर तरुणांसोबत त्या फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत नाहीत. एखादा तरुण त्यांच्याशी बोलण्यासाठी आला आणि फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करू लागला तर त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे असतात जणू काही त्या बोर होत आहेत.
परंतु सिंगल तरुणी सुंदर आणि आकर्षक अशा कोणत्याही तरुणाचं बोलणं मन लावून ऐकतात. या गप्पांचा विषय जर सिनेमा, फॅशन वा एखाद्या तरुण-तरुणीच्या प्रेमाशी संबंधित असेल, तर सिंगल तरुणी अशा गोष्टीं आवडीने ऐकतात आणि अशा गप्पीष्ट तरुणांना त्या बराच वेळदेखील देतात.
ब्रेकअप नंतर बनली सिंगल तरुणी
अनेक वर्षांपासून एखाद्या तरुणासोबत मैत्री केल्यानंतर जर त्या तरुणाशी तिचे सर्व संबंध संपले तर एकदा पुन्हा सिंगल झालेल्या तरुणीशी मैत्री करण्याची संधी मिळते. त्या तरुणीशी हा विचार करून दोस्ती करू नका की हिला अगोदर कोणीतरी सोडलं आहे वा ती मैत्री निभावेल का?
खरं म्हणजे अनेक वर्षांपासून कोणाशी मैत्री राहिल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल झालेली तरुणी मैत्री आणि प्रेमाच्या मुद्दयावर इतर साधारण तरूणींपेक्षा अधिक संवेदनशील असतात. अशा तरुणी मैत्री आणि प्रेमाच्या नात्याचा आदर करतात व धीरगंभीर होतात. अशा एखाद्या सिंगल तरुणीशी मैत्री करण्याची संधी मिळाली तर ती संधी सोडू नका. हे व्यावहारिक सत्य आहे.