* गरिमा पंकज
दिवाळी एक प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे सैर करणारा सण आहे. प्रकाशाचं हे पर्व चंद्रप्रकाशात उजळलेल्या पौर्णिमेला नाही तर चहुबाजुंनी पसरलेल्या अंधारालादेखील परिभाषित करणाऱ्या अमावस्येचा दिवस असतो. म्हणजेच जेव्हा चहूबाजूंनी अंधार पसरलेला असेल, तेव्हाच आपल्याला प्रकाश आणायचा आहे. आनंदाचा शोध करायचा आहे. आनंद आपल्या आजूबाजूलाच आहे, जो छोटयाछोटया गोष्टींमध्ये लपलेला आहे. आपल्याला तो जमा करायचा आहे. दिवाळी जुन्या, विस्मृतीत गेलेल्या नात्यांना जागविण्याचा आणि निभावण्याचादेखील सण आहे.
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे माणसं सतत एकटी होत चालली आहेत,
तिथे आपल्यासाठी दररोज नात्यांचे नवीन रोपटे लावणं खूपच गरजेचं झालंय.
दिवाळीच्या बहाण्याने आपण कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत अधिक छान वेळ घालवून घरदार अधिक उजळविण्याची संधी मिळते. तसंही सणवार आनंद वाटण्याचं एक माध्यम आहे. दिवाळीचा सण प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. यंदाचा हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत छोटया छोटया गोष्टींचा आनंद घेत साजरा करूया.
घराला द्या क्रिएटिव्ह लूक
* दिवाळीत आपल्या घराच्या सजावटीत थोडा बदल करा. पत्नी आणि मुलांसोबत २ दिवस अगोदरच या कामाला लागा. यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची संधी मिळेल. पत्नीसोबत थोडी मस्ती करण्याचादेखील आनंद मिळेल. मुलंदेखील तुमचं नवीन कौशल्य आणि खेळकर क्षण व्यतीत करून आनंदित होतील.
* घराच्या अडगळीतील जुन्या वस्तू फेकण्याऐवजी त्या रियुज करण्याचा प्रयत्न करा. त्यांची दुरुस्ती करा आणि त्यांना नवीन लूक द्या. जसं की तुम्ही जुन्या काचेच्या बाटल्यांचा लॅम्प बनवू शकता आणि जुन्या डब्यांना सजवून कुंडया बनवू शकता. अशाप्रकारे तुमच्या जुन्या सामानाने घराला नवीन लूक देऊ शकता. यामुळे तुमचं घर क्रिएटिव्हिटीसोबतच सजलेलं दिसेल. जे सर्वांना आवडेल देखील. या कामांमध्ये मुलांची मदत घ्यायला विसरू नका.
* अलीकडे तर साधारणपणे लहान मूल असलेल्या सर्वच घरांमध्ये क्ले गेम असतातच. हा एक प्रकारचं रबरासारखा हलका पदार्थ असतो, जो लहान मुलांची इमॅजिनेशन आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला लक्षात घेऊन बनविण्यात आलेला आहे. क्ले एक प्रकारचा खूपच फ्लेझिबल पदार्थ असतो, ज्याला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. शाळेतदेखील मुलांना क्लेच्या मदतीने नवनवीन वस्तू बनवायला शिकवलं जातं.
तर या दिवाळीत तुम्ही तुमच्या मुलांना होम डेकोरेशनसाठी काही नवीन कलाकृती वा मग डिझाईनर दिवे बनविण्याची प्रेरणा द्या. यासाठी तुम्ही त्यांना मदतदेखील करू शकता. यामुळे मुलांचं मन गुंतेल आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायलादेखील मिळेल आणि तुमचं त्यांच्यासोबत ट्युनिंगदेखील स्ट्राँग होईल.
* फुलं कायमच सर्वांना आकर्षित करतात. म्हणूनच दिवाळीत घराची सजावट फुलांनी करा. तुम्ही बाजारातून आर्टिफिशियल फुलं आणूनदेखील घराची सजावट करू शकता. यामुळे तुमचं घर सुंदर दिसण्याबरोबरच आकर्षकदेखील दिसेल.
* तुम्ही मुलांसोबत मिळून तुमचे नातेवाईक वा मित्रांसाठी हाताने बनवलेले हॅम्पर्सदेखील बनवू शकता. काही रंगीत थर्माकोल बॉक्स बनवू शकता. चॉकलेट, केक, सुकामेवा इत्यादी सजवून हॅम्पर बनवा. याव्यतिरिक्त काही दिवे, मेणबत्त्या वगैरेदेखील जोडा, जे दिवाळीची अनुभूती देतील. तुमच्या हम्परमध्ये विंड चाईम्स लावा आणि मग बघा मुलं अशी हॅम्पर्स बनवण्यासाठी किती उत्साहित होतात.
* दिवाळीसाठी तुम्ही सुंदर घरातल्या घरात रंगीबेरंगी मेणबत्त्या तयार करू शकता. ज्या तुम्ही स्वत: मुलांसोबत मिळून बनविलेल्या असतील.
* मुलांना सुंदर आणि रंगीत रांगोळीदेखील पहायला आवडते. तुम्ही सोबत असाल तर हे काम त्यांच्यासाठी अधिक छान आणि रोमांचक होऊ शकतं. तुम्ही त्यांना रांगोळी काढायला शिकवून दुसरी कामं करू शकता. रांगोळी काढण्यात मुलं व्यग्र होतील. काही क्रिएटिव्ह करण्याचा आनंददेखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल.
* दिवाळीच्या दिवसाला खास बनविण्यासाठी मुलांना दिवाळीशी संबंधित काही कथा सांगा. स्वत:च्या घरातील कुटुंबीयांसोबत या सणाशी संबंधित तुमच्या काही आठवणी ताज्या करा. दिवाळीशी संबंधित काही पुस्तकेदेखील मुलांना देऊ शकता.
दिवाळीच्या अनोख्या भेटवस्तू
* पत्नी आपल्या पतींना दिवाळीत घालण्यासाठी एक सुंदर डिझाईन केलेला पारंपारिक कुर्ता-पायजमा सेट भेट देऊ शकतात.
* तुम्ही तुमच्या कुटुंबियातील सदस्यांचं एक मेमरी कोलाजदेखिल बनू शकता. यामध्ये आतापर्यंतचे आवडते फोटो एक प्रेममध्ये बसवून तुमच्या भिंतीवर लावू शकता. हे सर्वांसाठी सुवर्ण क्षणांची एक संस्मरणीय भेट राहील.
* या दिवाळीत तुम्ही तुमच्या जीवनसाथीला पर्सनलाइज्ड ज्वेलरी सेट देऊन सरप्राईज करू शकता. ज्वेलरी सेटमध्ये पेंडेंट वा अंगठी वा स्वत:च्या आवडीची एखादी वस्तूच्या इनिशियलला जोडू शकता. यामध्ये त्यांचा आवडता रंगदेखील असू शकतो.
* मुलांची खोली वेगळया प्रकारे सजवून त्यांना सरप्राईज करू शकता.
* मुलांना पर्सनलाइज्ड वस्तू खूप आवडतात. जर त्यावर त्यांचा आवडीचा कार्टून बनलेलं असेल तर मग काय विचारूच नका. दुधासाठी कप, वॉटर बॉटल, मुलांचा टॉवेल, कलर्स, पेन्सिल इत्यादींवर स्वत:चं नाव तसंच आवडीच कार्टून बनविल्यास ते खूपच आनंदित होतील.
* मुलं सणावारी नवीन कपडे घालण्यासाठी खूपच उत्सुक असतात. या दिवाळीत तुम्ही त्यांना ट्रॅडिशनल लूक देऊ शकता. तुम्ही मुलं आणि मुलींच्या ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी कपडयांसाठी ऑनलाईनदेखील एक्सप्लोर करू शकता.
* मिठाई खासकरून ‘चॉकलेट’ मुलांसाठी सर्वात छान दिवाळीची भेट असेल. तुम्ही काही वेगळया स्टाइलच्या चॉकलेट्स घरच्या घरी बनवू शकता.
सोबत शॉपिंग करा
* दिवाळीसाठी खूप खरेदी करायची असते. हे खूपच थकविणारं काम असतं. परंतु या खरेदीत तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांनादेखील सहभागी केलंत तर तुम्हाला फार त्रास होणार नाही, उलट आनंदच मिळेल.
* तुम्ही तुमची जाऊबाई, दीर वा खास मैत्रीणींना शॉपिंग करण्यासाठी बोलावू शकता. त्यामुळे सर्वांचं आउटिंगदेखील होईल, सोबत वेळ घालविण्याचीदेखील संधी मिळेल. यासोबतच तुमची खरेदी बजेटमध्येदेखील राहील, कारण सर्वजणांनी मिळून शॉपिंग केली तर बचतदेखील होते.
* दिवाळीच्या तयारीच्या दरम्यान अचानक घरी पाहुणे आलेत आणि नेमकं कुटुंबीयांसाठी शॉपिंग करण्यासाठी निघायचं असेल, तर मेकअप करायलादेखील वेळ मिळत नाही. अशावेळी घाईघाईत निघायचं असतं आणि वेळ नसेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही बीबी क्रीम लावा. बीबी क्रीम तुम्हाला मेकअपसारखाच फिनिश देतं. हे लावून तासनतास बसावं लागत नाही. बस तुम्ही ते लावलं आणि तुमचा फेस ग्लो करू लागतो. मग हवं असल्यास पाहुण्यांसोबत बसा वा खरेदीसाठी जा. अशाप्रकारे उलट तुम्ही काही मिनिटात तयार व्हाल.
घरच्या फराळाचा आस्वाद घ्या
* दिवाळीत वेगवेगळया प्रकारचा फराळ घरोघरी बनत असतो. तुम्हीदेखील बाहेरून भेसळ युक्त मिठाई खरेदी करण्याऐवजी तुमचे पती आणि मुलांच्या आवडीचं काही स्पेशल ट्विस्ट फराळ बनवून खायला द्या.
* पती किचनमध्ये जाउन काही डिश तयार करू शकतात वा मदत करू शकतात. दररोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून हे सर्व शक्य होत नाही. परंतु दिवाळीच्या क्षणी या गोष्टीचा आनंद घ्यायला विसरू नका. विश्वास ठेवा मोठया आनंदाऐवजी अशा छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधू शकता.
* जर तुमचे मित्र व नातेवाईक खाण्यापिण्याचे शौकीन असतील, तर तुम्ही बनविलेला फराळ खाण्यासाठी त्यांना घरी बोलवा वा त्यांच्या घरी फराळ घेऊन जा. हवं असल्यास दिवाळी सेलिब्रेशनसाठी रात्री आपल्या सर्व नातेवाईकांना निमंत्रित करा. अशाप्रकारे गेट-टुगेदरदेखील होईल आणि मुलेदेखील या आनंदी वातावरणाचा आनंद घेतील. दिवाळीत सर्वजण मिळून टेस्टी फराळाचा आस्वाद
घेतील तेव्हा नात्यांमध्ये आपलेपणा अधिक वाढेल.
नातेवाईक आणि मित्रांना भेटा
* आजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त आयुष्यात आपल्याला आपल्या जिवलगांसोबत काही क्षणदेखील घालविण्याची संधी मिळत नाही. परंतु सणवार आपल्याला आपल्या लोकांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी देतात. दिवाळीदेखील असाच एक खास सण आहे, जो आपल्याला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना भेटण्याची संधी देतो. अशा प्रकारे पाहायला गेलं तर दिवाळी आपल्या नात्यांना सुमधुर बनविते. तुम्हीदेखील या दिवाळीत असा प्रयत्न करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आनंद अधिक द्विगुणित होईल .
* तुम्ही देखील तुमचा जिवनसाथी आणि मुलांसोबत मिळून आपल्या जवळच्या लोकांच्या घरी जा. त्यांनादेखील आपल्या घरी बोलवा. यादरम्यान खूप गप्पा मारा. जुन्या आठवणी उजळवा आणि नवीन आठवणींचे क्षण जतन करा.
* जर एखाद्या मित्र वा नातेवाईकांसोबत काही कारणामुळे जर दुरावा वाढला असेल तर अशा रागवलेल्या नातेवाईकांचा रुसवा दूर करा. त्यांच्या घरी भेटवस्तू घेऊन जा. त्यांना आपल्या आनंदामध्ये सहभागी करा. प्रत्येक रागरुसवा दूर करून आपलेपणाने हा क्षण साजरा करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यदेखील यामुळे खूप आनंदित होतील.