* मिनी सिंह
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सुश्मिताने तिचा प्रियकर रोहमन शौलसोबत ब्रेकअप केले. सुश्मिताने ब्रेकअपनंतरची पहिली पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘‘शांतता सर्वात सुंदर आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.’’ यासोबत एक स्मायली इमोजी शेअर करत तिने लिहिले की, ‘‘हे नाते फार पूर्वीपासून संपले होते, पण तरीही आम्ही दोघेही मित्र बनून राहिलो.’’
माहितीनुसार, दोघांमध्ये काहीच ठीक नव्हते, त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.
सुश्मिता आणि रोहमनचे जवळपास ३ वर्षे प्रेमसंबंध होते. सुश्मिता आणि तिच्या मुलींना तो आपले कुटुंब मानायचा, असेही रोहमनने म्हटले होते. मग असे काय झाले की, दोघे वेगळे झाले? काहीही असो, सुश्मिता सेनच्या ब्रेकअपच्या बातमीने तिच्या चाहत्यांना दु:ख झाले.
प्रश्न असा पडतो की, प्रेम आणि विश्वासानंतर प्रेमी युगुल एकमेकांपासून वेगळे का होतात? त्यांच्यात ब्रेकअपची परिस्थिती का निर्माण होते? काही जण असा युक्तिवाद करतात की, आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही आणि काहीजण असा युक्तिवाद करतात की, आम्ही त्याला समजून घेण्यात चूक केली.
प्रेम जितके गोड तितके ब्रेकअप अधिक दु:खद असते. २ प्रेमळ लोक नात्यात इतके जोडलेले असतात की, त्यांना वेगळे करणे कठीण होऊन जाते. प्रेमाला लग्नाच्या मुक्कामापर्यंत नेण्यासाठी अनेकदा धर्म, लिंग आणि वयाचे अडथळे येतात, त्यामुळे दोन प्रेमी वाटेतच विभक्त होतात, पण काळानुसार बदल होत गेले. या सगळया गोष्टींवर आता लोकांचा विश्वास नाही. तरीही कधीतरी असे काही घडते की, प्रेम लग्नापर्यंत पोहोचत नाही आणि ब्रेकअप होते. हे नाते केवळ काही वर्षे टिकते आणि नंतर दोघे वेगळे होतात. अशा संबंधांबद्दल तज्ज्ञ सांगतात की, ७० टक्के अविवाहित जोडप्यांचे पहिल्या वर्षीच ब्रेकअप होते. असेही आढळून आले आहे की, ५ वर्षांच्या नात्यानंतर ब्रेकअपची शक्यता फक्त २० टक्के असते.
एका अहवालानुसार, बहुतेक जणांचा ब्रेकअप शुक्रवारी होतो. ज्यामध्ये असे दिसून आले की शुक्रवारी प्रेमी एकमेकांशी सर्वाधिक भांडतात. तसेच, या दिवशी नाते तुटण्याचा धोका सर्वाधिक असतो. अहवालानुसार, शुक्रवारी ७५ टक्के प्रेमींचा ब्रेकअप झाला होता, पण प्रश्न असा आहे की, पहिल्या १-२ वर्षांत असे काय घडते की, २ प्रेमी जीव वेगळे होतात?