* प्रतिनिधी
मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, जो सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. टाइप एकचा मधुमेह लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अधिक सामान्य आहे, तर टाइप २ मधुमेह मुख्यत: तरुण आणि प्रौढांमध्ये आढळतो. मधुमेह असलेल्या मुलांची काळजी घेणे अवघड असू शकते, विशेषत: तेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती असते की, तुमच्या मुलाला आयुष्यभर मधुमेहासोबतच जगावे लागेल.
आईवडिलांप्रमाणेच मुलांच्या मनावरही मधुमेहामुळे परिणाम होतो. त्यांना नेहमी इतर मुलांपेक्षा वेगळे वाटते, कारण त्यांना अनेक गोष्टींसाठी थांबवले जाते. अशा परिस्थितीत या मुलांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.
या संदर्भात डॉ. मुदित सबरवाल (कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट आणि वैद्यकीय व्यवहार प्रमुख, बीटो) यांच्या काही सूचना :
मधुमेहाने ग्रस्त मुलाचे जीवन
टाइप १ मधुमेह हा एक जुनाट आजार आहे. या स्थितीत स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होत नाही किंवा कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे शरीराला बाहेरून इन्सुलिन द्यावे लागते.
टाइप १ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या मुलाला तणाव आणि थकवा जाणवतो. त्याला त्याच्या भविष्याची काळजी वाटू शकते. ‘डायबिटिस बर्नआऊट’ ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपला मधुमेह नियंत्रित करताना थकून जाते. अशा परिस्थितीत, मुले त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करू इच्छित नाहीत, ते त्याची नोंद ठेवू इच्छित नाहीत किंवा इन्सुलिन घेऊ इच्छित नाहीत.
मधुमेहग्रस्त मुलांची काळजी
मधुमेह व्यवस्थापनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात ठेवणे. यासाठी, तुमच्या मुलाला इन्सुलिन घ्यावे लागेल, प्रत्येक जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मर्यादित ठेवावे लागेल आणि सक्रिय राहावे लागेल.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज रक्तातील साखरेचे प्रमाण निर्धारित वेळेत मोजा. यासाठी तुम्ही बीटोचा स्मार्टफोन कनेक्टेड ग्लुकोमीटर वापरू शकता. यामुळे रक्तातील साखरेचे निरीक्षण करणे खूप सोपे होते. तुम्हाला वाटेल तेव्हा, अगदी कुठेही तुम्ही रक्तातील ग्लुकोज मोजू शकता.
आईवडिलांसाठी सल्ला
जास्त प्रमाणात रोखू नका : तुम्हाला तुमच्या मुलाला रोगाचा अतिरेक होण्यापासून सुरक्षित ठेवावे लागेल, पण असे करताना त्याला थोडी मोकळीकही द्या. तुमच्या मदतीने मुलाला स्वत:ची जबाबदारी समजेल आणि तो स्वत:हुन मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठीचे व्यवस्थापन करण्यास सक्षम होईल. यामुळे मुलामध्ये आत्मविश्वासही निर्माण होईल.
कोणी चिडवल्यास काय करावे हे त्याला शिकवा : अनेकदा मधुमेह झालेल्या मुलाला वर्गातील इतर मुले चिडवतात. त्यामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या गोष्टींचा मुलावर वाईट परिणाम होणार नाही, याकडे लक्ष द्या. यामुळे त्याने शाळेत रक्तातील ग्लुकोजचे निरीक्षण करणे थांबवले तर नाही ना, हे नीट पाहा. तुमच्या मुलाच्या बाबतीत असे घडत असेल तर अशा परिस्थितीत काय करावे हे त्याला शिकवा. इतर मुलांना समजावून सांगा की, त्यांनी असे वागू नये. यासाठी तुम्ही त्या मुलांचे आईवडील, पालक किंवा मुलांच्या इतर मित्रांची मदत घेऊ शकता.
त्याला शिकवा की त्याने पौष्टिक अन्नच खायला हवे : मुलांना चॉकलेट, फास्ट फूड खूप आवडते, मात्र मधुमेहाने त्रस्त असलेल्या मुलांनी खाताना थोडे सावध राहायला हवे. मुलाला रागावण्याऐवजी प्रेमाने समजवा की, पौष्टिक आणि सर्कस आहारामुळेच त्याला फायदा होईल. त्याला कडधान्य, ताजी फळे आणि भाज्या, पातळ प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स खायला सांगा.
मधुमेहाच्या एखाद्या गटाशी जोडले जा : मधुमेह असलेल्या मुलाची काळजी घेणे कठीण होऊ शकते. यासाठी तुम्ही कोणत्याही मधुमेही गटात सहभागी होऊ शकता जिथे तुम्ही तुमच्या समस्यांवर चर्चा करू शकता. गरज असेल तेव्हा मुद्दे नोंदवून ठेवा. एकमेकांच्या सूचना घ्या. याशिवाय जोडीदाराची मदत घ्या. अशा मुलासाठी कौटुंबिक पाठिंबा खूप महत्वाचे आहे.
लक्षात ठेवा : मुलामध्ये उदासीनता, चीडचिड, थकवा, भुकेच्या वेळेत बदल, झोपण्याच्या सवयींमध्ये बदल यासारखी नैराश्याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. नियमित स्मरणपत्रे आणि सूचनांसह तुम्ही मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता. बीटो अॅप मधुमेह व्यवस्थापनासाठी प्रत्येक आवश्यक उपाय उपलब्ध करून देते.