* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर डॉ. भारती तनेजा
माझे हात खूपच कोरडे राहतात. मॉइश्चरायझर लावूनदेखील ते निस्तेज दिसतात. एखादा उपाय सांगा ज्यामुळे ते मऊ मुलायम राहतील?
हाताच्या त्वचेवर ऑइल ग्लॅन्डस नसल्यामुळे त्यांना ऑइल द्यावं लागतं. म्हणून ते मऊ आणि मुलायम राहण्यासाठी हात धुतल्यानंतर नेहमी एखादं घट्ट क्रीम लावा. हे तुमच्या त्वचेतील तेलकटपणा कायम राखण्यास मदत करेल.
तुम्ही हात धुण्यासाठी कोणता साबण वापरता याकडेदेखील लक्ष द्या. अनेकदा साबण तुमच्या हातांना कोरडं बनवतो, म्हणून लिक्विड सोप योग्य आहे. रात्री तुम्ही थोडसं व्यासलीन तुमच्या हातावर लावून ते एक ओव्हरनाईट ट्रीटमेंटप्रमाणे वापरू शकता. फक्त हात धुतल्यानंतर तुमच्या हातांवर लावा आणि कॉटनचे हात मोजे घालून झोपा.
माझं वय २२ वर्षे आहे. माझी त्वचा खूपच सेन्सिटिव्ह आहे. मी जेव्हादेखील एखादं क्रीम, मेकअप प्रॉडक्ट वापरते तेव्हा चेहऱ्यावर पुरळ येतं. अशावेळी मला खूप त्रास होतो. सांगा मी काय करू?
यासाठी तुम्ही प्रयत्न करा की वापरण्यात येणारी क्रीम सुगंधित नसावी. कदाचित त्याच्या सुगंधाची तुम्हाला एलर्जी असावी, म्हणून तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनसाठी वापरणारी जाणारी क्रीम विकत घ्या. जेव्हादेखील हे क्रीम वापराल तेव्हा ते लावण्यापूर्वी स्किन टोनर लावून सुकू द्या. त्यानंतर क्रीम लावा. जर तुम्हाला पुरळ येत असेल तर ब्रॅण्डेड प्रायमरचा वापर केल्यामुळे तुमची अडचण सुटू शकते. तुम्ही तेलमुक्त प्रायमरचा वापर करायला हवा.
माझं वय ३० वर्षे आहे. माझ्या आय लॅशेज खूपच विरळ आणि लहान आहेत. मला एखादा उपाय सांगा ज्यामुळे त्याची वाढ होईल?
दाट आयलॅशेजसाठी एरंडेल तेल खूपच फायदेशीर मानलं जातं. यामध्ये रिसीनोलिक अॅसिड आढळतं. हा केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढवतो आणि पापण्यांच्या वाढीसाठी उत्तेजित करतं.
एरंडेल तेलाने तुम्ही तुमच्या पापण्या दाट बनवाल. त्याबरोबरच या पापण्या तुटणारदेखील नाहीत. हे लावण्यापूर्वी तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. लक्षात ठेवा की तुमच्या डोळयांवर कोणत्याही प्रकारचा मेकअप नसावा. आता स्वच्छ मस्कारा ब्रश घ्या. हा ब्रश एरंडेल तेलमध्ये बुडवा आणि पापण्यांवर लावा. हे रात्रभर पापण्यांवर राहू दे आणि सकाळी गुलाब पाण्याने वा नंतर मेकअप वाइप्सच्या मदतीने स्वच्छ करा.
माझं वय १६ वर्षे आहे. माझ्या चेहऱ्यावर पुटकुळया आल्या आहेत. त्या मी फोडल्या होत्या. आता त्याचे डाग राहिले आहेत. जे दिसायला खूपच वाईट दिसतात. एखादा घरगुती उपाय सांगा. ज्यामुळे हे डाग निघून जातील. तसंच माझ्या चेहऱ्यावरची चमकदेखील परतेल.
अनेकदा पुटकुळया फोडल्यामुळे त्वचेवरती गडद डाग बनतात. तुम्ही घरच्या घरी दररोज सकाळ संध्याकाळ तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. एएचए सिरमने फेस मसाज करू शकता. असं केल्यामुळे डाग खूपच कमी होतील. परंतु जर असं झालं नाही तर तुम्ही मायक्रोडर्मा एब्रेजर व लेझर थेरेपीच्या सीटिंगदेखील घेऊ शकता. या थेरपीमध्ये लेझर किरणांनी त्वचेला रिजनरेट करून नवरूप दिलं जातं. यानंतर यंग स्किन मास्कने तुमची त्वचा उजळवू शकता.
वॅक्सिंगनंतर माझ्या त्वचेवरती लाल पुरळ येतं. नको असलेले केस काढण्यासाठी दुसरा एखादा उपाय सांगू शकता का?
तुम्ही वॅक्सिंग करण्यापूर्वी अँटी एलर्जी टॅबलेट घेऊ शकता. तसंही या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी पल्स लाईट ट्रीटमेंटची सेटिंग्स घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्रज्ञान आहे, जे नको असलेले केस काढण्याचं सर्वात प्रभावी सुरक्षित व वेदना रहित साधन आहे. लेझर अंडर आर्मच्या केसांवरती अधिक इफेक्टिव्ह असतं.
यामुळे याच्या काही सेटिंग्जमध्ये केस नसल्यास सारखेच असतात. यामुळे ८० टक्के नको असलेले केस जातात आणि उरलेले इतके पातळ आणि हलक्या रंगाचे असतात की ते दिसूनदेखील येत नाही.
माझ्या चेहऱ्यावरती ब्लॅकहेड्स आहेत जे सहजपणे काढता येत नाहीत. सांगा मी काय करू?
ब्लॅकहेड्स फेस पॅकच्या माध्यमातून काढणं शक्य नाही आहे कारण ते पोर्सच्या आतमध्ये असतात आणि पोर्स खोलून क्लीन केल्यानंतर स्क्रब करणं गरजेचं असतं. हे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून वेज वा फ्रुट पील करू शकता. पंधरा दिवसातून एकदा पील केल्यामुळे ब्लॅकहेड्स व व्हाईट हेड्स निघून जातील आणि सोबत चेहरादेखील उजळेल. यासोबतच दररोज तुमचा चेहरा क्लीन करण्यासाठी स्क्रब बनवा. घरच्या घरी बदाम व भरड जाडसर वाटून पावडर बनवा त्यात चिमूटभर हळद, गुलाब पाणी एकत्रित करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमचं नाक आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी स्क्रब करा आणि थोडयावेळानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.