* डॉक्टर स्तुती मोदी, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच आयवीएफ एक्स्पर्ट, श्री मूलचंद हॉस्पिटल करणाल, हरियाणा
प्रश्न : माझ्या ओवरीत वारंवार सिस्ट बनतं. याचं कारण काय आहे आणि यामध्ये कॅन्सरचादेखील धोका संभवू शकतो का?
उत्तर : ओवरीमध्ये सिस्ट विविध कारणांनी बनू शकतो. मोनोपॉज याचं सर्वात प्रमुख कारण आहे. या व्यतिरिक्त पॉलिसीस्टिक ओवरी सिंड्रोम, एन्डो मॅट्रियोसिस, हार्मोन असंतुलन, क्रोनिक पेल्विक इन फ्लॅमेशन, ट्यूमर इत्यादीदेखील कारणं असू शकतात. सामान्य सिस्ट ज्याचा आकार ४ सेंटीमीटरपेक्षा कमी असतो, ते अनेकदा आपोआप कमी होतात. मोठया आणि गुंतागुंतीच्या सिस्टवर उपचाराची गरज असते. तसंही ओवेरियन सीस्ट कॅन्सरहित असतात, परंतु काही बाबतीत हे कॅन्सरयुक्तदेखील असू शकतात. खासकरून वाढत्या वयासोबत मेनोपॉजनंतर ज्या महिलांमध्ये ओवेरियन सीस्ट बनतं त्यामध्ये ओवेरियन कॅन्सरची शक्यता वाढू शकते.
प्रश्न : माझ्या वडिलांना लिव्हर आणि आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. मी असं ऐकलंय की हे पुढेदेखील कुटुंबात होऊ शकतं. माझं वय ३२ वर्षें आहे. यापासून वाचण्यासाठी मला कोणती काळजी घ्यायला हवी?
उत्तर : हे खरं आहे की अनुवंशिकता कॅन्सरचं प्रमुख रिस्पेक्टर मानलं जातं. जर तुमच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुमच्यासाठी हा धोका १२ ते १४ टक्के अधिक असतो. अशाच प्रकारे लिव्हर कॅन्सरमध्येदेखील अनुवंशिकता महत्त्वाची भूमिका साकारते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही गरजेची पावलं उचलू शकता जसं की शारीरिकरित्या सक्रिय रहा, स्वत:चे वजन वाढू देऊ नका, दारूचे सेवन करू नका, मुलांना स्तनपान करा, गर्भ निरोधक गोळयांचे सेवन करू नका. खासकरून ३५ वर्षांनंतर मोनोपोज नंतर हार्मोन थेरपी घेऊ नका.
प्रश्न : फायब्रॉइड्सच्या सर्जरीनंतर हे पुन्हा होऊ शकतं का?
उत्तर : फायब्रॉइड्स गर्भाशयात विकसित होणाऱ्या कॅन्सर रहित पिंड आहेत जे याच्या भिंतीच्या मासपेशी आणि संयोजि टिशूपासून बनतात. यांना सर्जरीद्वारे काढले जाते. ज्याला मायोमेकटोमी म्हणतात. सर्जरीनंतरदेखील हे फायब्रॉईड्स पुन्हा विकसित होण्याची शक्यता २५ ते ३० टक्के असते. यापासून वाचण्यासाठी मीठ कमी खा, रक्तदाब नियंत्रणात ठेवा, व्यायाम करा, कमरेच्या आजूबाजूची चरबी वाढू देऊ नका, पोटॅशियमचे सेवन वाढवा.