कथा * राधिका साठे

आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येऊ लागलं होतं. गेला आठवडाभर ज्या ऑफिसमधून कामं बंद पडली होती, ती ऑफिसं आता सुरू झाली होती. रस्त्यांवरून सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या रडत-खडत, उखडलेल्या, खचलेल्या रस्त्यांवरून चालू लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला हॉकर्सनी पुन्हा आपली दुकानं मांडायला सुरूवात केली होती. रोज मजूरी करून पोट भरणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीही पुन्हा रस्त्यांवर दिसू लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात चेन्नईत चक्रीवादळानं केलेला विध्वंस सगळीकडे आपली छाप ठेवून होता. अजूनही अनेक भागांमधलं पाणी ओसरलं नव्हतं. खोलगट भागातल्या वस्त्या अजूनही पाण्याखाली होत्या. एयरपोर्ट अजून सुरू झाला नव्हता. मधल्या काळात रस्त्यांवर कंबरभर पाणी होतं. नेटवर्क बंद होतं. फोन, वीज, जीवनावश्यक वस्तू काही म्हणता काहीच नव्हतं. गाड्यांच्या इंजिनात पाणी भरल्यामुळे लोक गाड्या तिथंच टाकून जीव वाचवून पळाले होते. काही ऑफिसमधून सायंकाळी निघालेले लोक कसेबसे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी पोहोचू शकले होते. कॉलेज, होस्टेल्स आणि युनिव्हसिर्टीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना लष्कराच्या मदतीनं बाहेर काढलं गेलं.

चेन्नई तसंही समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं शहर आहे. इथं अनेक सरोवरंही आहेत, पण त्याच्यावर अतिक्रमणं करून रस्ते आणि बिल्डिंगांची बांधकामं उभी केली गेली. या सात दिवसात त्या सरोवरांनी जणू आक्रोश करून आपला कोंडून घातलेला श्वास मोकळा केला असावा असं सगळं दृष्य दिसत होतं. शहराची पार दुर्दशा झाली होती.

गरीबांच्या वस्त्या झोपडपट्ट्या खोलगट भागात असल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. कुठंतरी कशीबशी रात्र काढल्यावर सकाळी उपाशी पोराबाळांचा अन्नासाठी अक्रोश सुरू झाल्यावर त्यांनी समोर दिसलेल्या दुकानावर हल्लाच चढवला. भूक माणसाला चोर आणि आक्रमक बनवते.

रात्रीचे अकरा वाजले होते. जिथं जागा मिळेल तिथं लोक जीव वाचवण्यासाठी उभे होते. पाऊस कोसळत होता अन् सगळीकडे पाणी तुंबायला सुरूवात झाली होती. ऑफिसातून पायी चालत निघालेली रिया पाऊस पाण्यात अडकली होती. एका स्टोअर्सच्या पार्किंगला ती कशीबशी उभी होती. अजून काही लोक तिथं होते. तेवढ्यात दारू प्यायलेले काही तरूण तिथं आले. तरूण मुलगी बघून ते काही बाही बरळायला लागले. इथं आपण सुरक्षित नाही हे रियाला कळलं. पण तिथून अजून कुठं निघून जाणं तिला शक्यही नव्हतं. तिथं असलेली इतर माणसंही हे सगळं कळून काहीच न कळल्याचा आव आणून उभी होती. कारण दारू ढोसलेल्या गुंडांशी लढणं त्यांना शक्य नव्हतं. कोसळणारा पाऊस, उसळणारा समुद्र आणि समोर हे मानवी देहाचे लांडगे...रिया फार घाबरली होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...