कथा * कृष्णकुमार

हात-तोंड धुऊन झाल्यावर राजीव कल्पनासोबत जेवायला बसला, तेवढयात मोलकरीण बीना आत आली आणि म्हणाली, ‘‘साहेब, बाहेर एक गृहस्थ उभे आहेत, ते स्वत:ला बाईसाहेबांच्या ओळखीचे असल्याचे सांगतात.’’

‘‘तू त्याला सन्मानपूर्वक आता घेऊन का नाही आलीस? ही काय विचारायची गोष्ट होती का?’’ राजीवने ताटात भाजी घेत विचारले आणि कल्पनाकडे पाहिले.

कल्पनाला आश्चर्य वाटले. अंग थरथरल्यासारखे तिला वाटले. न कळवता अचानक कोण आले, असा प्रश्न तिला पडला.

‘‘नमस्कार,’’ पाहुण्याने असे म्हणताच कल्पना गोंधळली. ही व्यक्ती कधी आपल्या समोर येऊन उभी राहील, अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

मंद स्मित करत राजीव कल्पनाच्या चेहऱ्यावरचे विविध भाव काळजीपूर्वक न्याहाळत होता. घरी आलेला पाहुणा कल्पनाच्या परिचयातला आहे, एवढेच त्याच्यासाठी पुरेसे होते. तो सोफ्यावरून उठत उत्साहाने पुढे गेला, त्याने पाहुण्याशी हस्तांदोलन केले आणि त्याला सोफ्यावर आपल्या जवळच बसायला सांगत म्हणाला, ‘‘ये, तुझे स्वागत आहे.’’

‘‘धन्यवाद,’’ पाहुणा बसत म्हणाला.

कल्पना अजूनही त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहात होती.

तो उत्साही स्वरात म्हणाला, ‘‘कल्पना, हे काय ओळख करून देण्याऐवजी, मी भूत असल्यासारखे तू माझ्याकडे पाहात आहेस.’’

कल्पनाने ताबडतोब स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि हसण्याचा प्रयत्न करत ती राजीवला म्हणाली, ‘‘राजीव, हा माझा बालपणीचा मित्र आणि महाविद्यालयातील सोबती कमल आहे.’’

‘‘तुला भेटून आनंद झाला,’’ राजीव हसत कमलला म्हणाला.

‘‘आणि हा माझा वकील पती राजीव आहे,’’ कल्पना कमलला म्हणाली.

‘‘ओळखतो मी,’’ कमल हसत म्हणाला.

‘‘तू याला ओळखतोस, पण कसं?’’ कल्पनाच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले, तिचा चेहरा फिका पडला.

‘‘अरे, म्हणजे काय? हे काय विचारतेस?’’ कमल हसत म्हणाला, ‘‘विसरलीस का? तू मला पाठवलेल्या तुझ्या लग्न पत्रिकेवर तुमची नावं होती.’’

‘‘अरे, मी विसरले,’’ कल्पनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

‘‘विसरणे ही तुझी जुनी सवय आहे, हे मला चांगलं माहीत आहे,’’ कमल म्हणाला आणि कल्पनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो हसत पुढे म्हणाला, ‘‘चहामध्ये साखर किंवा भाजीत मीठ आणि मिरपूड घालायला विसरल्याबद्दल काकूंकडून तुला शिव्या पडायच्या. मित्रांसोबत गप्पा मारताना वर्गात शिकवलेले तू विसरायचीस आणि नंतर घरी आल्यावर माझे डोकं खायचीस.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...