कथा * विभा साने

विनिता ज्या घरात भाड्यानं राहत होती, तिथंच एक नवीन भाडेकरू म्हणून पल्लवीही राहायला आली. या आधुनिकेला बघून ही बया आपला संसार मोडणार असंच विनिताला वाटलं...पण घडलं उलटंच. त्या दोघी पक्क्या मैत्रिणी बनल्या...

प्रमोशनवर बदली होऊन निशांत पुण्यात आला. महत्त्वाकांक्षी निशांतला तिथल्या पॉश एरियात कंपनीने सुंदर घर घेऊन दिलं होतं. पंढरपुरातून बस्तान हलवून त्याची बायको विनिता व मुलगा विहान प्रथमच अशा मोठ्या शहरात आली होती. दुमजली बंगल्याच्या वरच्या भागात हे कुटुंब राहत होतं अन् खालच्या तेवढ्याच मोठ्या घरात घरमालक व त्याची पत्नी राहत होती.

घरालगतच्या गॅरेजच्या वरही एक वन बेडरूम किचन हॉल असा सुंदरसा फ्लॅट होता. विनिताचं घर अन् तो रिकामा फ्लॅट यासाठी सुंदर कठडे असलेला संगमखरी जिना होता.

इथं येताच एका चांगल्या शाळेत विहानचं अॅडमिशन केलं. शाळा तशी फार लांब नव्हती. पण विनिताला स्कूटी चालवता येत नसल्यानं निशांतलाच मुलाला शाळेतून आणणं, पोहोचवणं करावं लागे. काही दिवस सुरूवातीला हे जमलं, पण ऑफिसच्या कामाची जबाबदारी जशी वाढत गेली तसा निशांतला ऑफिसमध्ये अधिकाधिक वेळ घालवावा लागायचा. तो पार दमत होता.

एक दिवस त्यानं विनिताला म्हटलं, ‘‘तू स्कूटी चालवायला शिकून घे ना, निदान विहानला शाळेत सोडणं, शाळेतून परत आणणं आणि इतर बारीक सारीक कामं तू करू शकशील.’’

‘‘छे बाई, मी कशाला शिकू स्कूटी? मला गरजच नाहीए बाहेरची कामं करायची. ही कामं पुरूषांनीच करायची. आमच्या घरी तशीच पद्धत आहे...मी घरातच बरी!!’’ विनितानं म्हटलं.

नाइलाजानं विहानसाठी ऑटोरिक्षाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर पुन्हा हा विषय निघाला नाही. विनिता हौशी होती. उत्तम गृहिणी होती. बोलकी अन् मनमिळावू होती. पण घराच्या बाहेरचं क्षेत्र तिला अपरिचित होतं. दोन महिन्यांत तिनं घर मनासारखं लावून घेतलं. घरमालकिणीच्या मदतीनं मोलकरीणही चांगली मिळाली.

घर मांडून झाल्यावर विनितानं शेजारपाजारच्या घरात राहणाऱ्या लोकांशी ओळख करून घेण्याची मोहीम उघडली. पण लहानशा गावातून आलेल्या विनिताला मोठ्या शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांना फार संबंध वाढवायला आवडत नाही, त्यांचे संबंध फक्त हाय, हॅलो अन् तोंडभरून हसणं एवढ्यापुरते मर्यादित असतात हे कळायला थोडा वेळ लागला. एक दोन बायकांशी ओळख झाली, पण तीसुद्धा अगदी औपचारिक...त्यामुळे घरकाम आटोपलं की ती टीव्ही लावून बसायची. अधूनमधून खाली मालकीणबाईंकडे जायची.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...