कथा * रवी चांदवडकर

रात्रीचे बारा वाजले तरी स्वातीच्या डोळ्यांत झोप नव्हती. शेजारी झोपलेला नवरा मजेत घोरत होता. दिवसभर दमल्यावरही स्वाती मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत झोपेची आराधना करत होती. पुन:पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो दुपारचा प्रसंग येत होता. ज्याला ती सहज, हलकाफुलका खेळ समजत होती तो साक्षात विस्तवाशी खेळ होता, या जाणिवेने ती हवालदिल झाली होती. पुरुषांशी मोकळेपणाने बोलणं, हलकेफुलके विनोद करणं, फ्लर्टिंग ही तिच्या मते फारसं गंभीरपणे घेण्याची बाब नव्हती.

स्वाती मैत्रिणींना, नातलगांना नेहमी सांगायची, ‘‘मार्केटमध्ये माझी इतकी ओळख आहे की कोणतीही वस्तू मला स्पेशल डिस्काउंटवर मिळते.’’

स्वाती आपल्या माहेरीही वहिनींना, बहिणींना सांगायची, ‘‘आज मी वेस्टर्न ड्रेस घेतला. खूप स्वस्त पडला मला. डिझायनर साडी घेतली दीड हजाराची, साडी मला फक्त नऊशेला मिळाली, हिऱ्याची अंगठी मैत्रिणींकडून ऑर्डर देऊन करवून घेतली. दोन लाखाची अंगठी मला दीड लाखात पडली.’’

माहेरच्या लोकांच्या नजरेत स्वातीविषयी हेवा, अभिमान अन् कुतूहल असायचं. तिची हुशारी, बारगेनिंग पॉवर अन् वाक्पटुता सगळ्यांना ठाऊक होती. कुणाला काही घ्यायचं असलं तर ते स्वातीला फोन करायचे अन् स्वाती त्यांना हवी असलेली वस्तू योग्य त्या किमतीत मिळवून द्यायची.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, शिकलेली, चतुर स्वाती लहानपणापासूनच खरेदी करण्यात हुशार होती. तिला खरेदी करायला फार आवडायचं. एखाद्याला वाचन आवडतं, कुणाला इतर काही आवडतं तसं स्वातीला खरेदी करायला आवडायचं. मोठमोठ्या रकमेच्या वस्तूही ती घासाघीस करून कमी किमतीत अन् थोडक्या वेळात खरेदी करायची. सासरी, माहेरी सर्वत्र तिचं कौतुक व्हायचं.

स्वातीचं माहेर तसं मध्यमवर्गीय. त्यातही निम्न मध्यमवर्गीय. पण लग्नं झालं ते मात्र एका व्यावसायिक घराण्यातल्या अत्यंत श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी. कोट्यधीशांच्या घरात येऊन इथले रीतिरिवाज तिने शिकून घेतले पण मुळची काटकसरी वृत्ती मात्र सोडली नाही. घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवणं अन् त्यातून मनसोक्त खरेदी करणं तिला फार आवडायचं. नवरा भरपूर पैसे हातात देत होता. शिवाय त्याच्या पाकिटातून पैसे लांबवणं हाही स्वातीचा लाडका उद्योग होता. शिकलेल्या, संस्कारवान अन् समजूतदार स्वातीला एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती...पुरुषांना काय आवडतं, त्यांचा ‘वीक पॉइंट’ काय असतो, त्यांच्याकडून कमी भावात वस्तू कशी खरेदी करायची हे गणित तिला बरोबर जमलं होतं. ज्या दुकानात किंवा शोरूममध्ये पुरुषमालक असेल तिथेच ती खरेदीला जायची. सेल्समन, सेल्सगर्ल्सना ती म्हणायची, ‘‘तुम्ही फक्त सामान दाखवा. मालकांशी बोलून मी किंमत ठरवीन.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...